खूप काही

परदेशातून अनेक लोक मुंबईत यायला सुरूवात; अशी आहे राहाण्याची सोय…

प्रशासन शर्थीचे प्रयत्न करूनदेखील मुंबईत अनेक रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आज राज्य शासन अनेक भागांत अडकलेल्या नागरिकांचा विचार करून त्यांना त्यांच्या राहत्या घरी पाठविण्याची सोय करत आहेत. तसेच आपले भारतीय नागरिक जे परदेशात अडकले आहेत त्यांनादेखील मायदेशी आणण्याची मोहीम केंद्र सरकारने आखली आहे. प्रवासाचा मद्यबिंदू म्हणून मुंबईमध्ये अनेक परदेशी लवकरच दाखल होतील, त्यामुळे मुंबईसाठी कोरोना विषाणूचा धोका आणखी वाढविण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. याबाबतचा सविस्तर आढावा आपण जाणून घेऊ वंटास मुंबईच्या या रिपोर्टमधून…
लवकरच परदेशात अडकलेले परतणार मायदेशी; हॉटस्पॉट मुंबईत
पासपोर्ट वाल्यांनी आणलेला कोरोनाचा फटका बसतोय रेशनकार्ड धारकांना आणि पुन्हा एकदा हे वाक्य मुंबईकरांना बोलण्यास संधी मिळणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या 14 हजार भारतीयांना परत आणण्याची मोहीम आखली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, प्रवासापुर्वी या नागरिकांची कोरोना चाचणी होणार नाही, केवळ साधी वैद्यकीय तपासणी होणार आहे. आधीच कोरोनाशी दोन हात करणाऱ्या मुंबईच्या डोक्याला आणखी एक ताप होणार असल्याचं यामुळे स्पष्ट झालं आहे.
सविस्तर माहिती अशी आहे की, परदेशातून मायदेशी येताना त्यांची कोरोना चाचणी न करता प्रवाशांची साधी वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशांमध्ये खोकला, सर्दी, तापाची लक्षणे आढळून येतील, त्यांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही. मायदेशी परतल्यानंतर मात्र प्रत्येक प्रवाशाची संबंधीत वैद्यकिय चाचणी होणार आहे, सोबतच त्यांना 14 दिवस रुग्णालयात किंवा संस्थात्मक क्वारंटाइन करुन ठेवण्यात येईल.
कोरोना काळातील ही सर्वात मोठी मोहीम
लॉकडाऊनमुळे प्रवासाला बंदी घालण्यात आली होती परंतु आपल्या नागरिकांचा विचार करता परदेशातून भारतीयांना परत आणण्यासाठी प्रवासाची आखणी केली गेली आहे. कोरोना काळातील ही सगळ्यात मोठी आणि तितकीशी धोका पत्करणारी मोहीम म्हणावी लागेल. या मोहिमेद्वारे 64 विमानाद्वारे जवळपास 14, 800 प्रवाशी मायदेशी येणार आहेत.
मुंबईत काय असेल परिस्थिती?
परदेशातून परतणाऱ्या भारतीयांसाठी मुंबईत ८८ हॉटेलमध्ये ३,३४३ खोल्या विलगीकरणासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन/ तीन/ चार /पाच तारांकित तसेच वेगवेगळ्या हॉटेल्स सोबत अपार्टमेंट हॉटेल, ओयो बजेट हॉटेलचा देखील समावेश असणार आहे. मुंबईमध्ये एकूण सात विमानातून सुमारे १,९०० नागरिक येतील. यामध्ये बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हे नागरिक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळत आहे.
ही मोहीम 7 मे ते 13 मे, अशी सहा दिवस चालणार आहे. यातील 7 मे ते 10 मे या दिवसांत अनेक प्रवासी मुंबईमध्ये प्रवेश करतील. या मोहीमेद्वारे 12 देशात अडकलेल्या 14 हजार 800 लोकांना मायदेशी परत आणले जाणार आहे. यासाठी एयर इंडियाची 64 विमान उड्डाण भरणार आहेत. दिवसाला 2 हजार लोक देशात दाखल होणार आहेत.
मुंबईकरांच्या चिंतेत वाढ
परदेशातील प्रवासी नागरिकांमुळे कोरोनाचा धोका हा मुंबईकरांच्या गळ्याशी बांधला गेला आहे. आखाती देश आणि अमेरिकेतून आलेल्या भारतीयांमुळे मुंबईत कोरोनाचा फैलाव अधिक झाला होता. या मोहिमेमुळे आता मुंबईकरांची चिंता वाढणार आहे. या मोहिमेमध्ये  सर्वाधिक कोरोना रुग्णाचे मृत्यु झालेल्या अमेरिका, इंग्लडमधून भारतीय मायदेशी दाखल होणार आहेत.
कोणत्या देशात, किती विमाने पाठवली जाणार 
● अमेरिका- 07
● सिंगापूर-05
● इंग्लड- 07
● सौदी अरेबीया- 05
● युयेई- 10
● कतार-02
● बहरीन-02
● कुवैत-05
● ओमान-02
● बांगलादेश-07
● मलेशिया-07
● फिलीपाईन्स-05
काय असणार प्रवासी भाडे 
◆ लंडनहून मुंबई ते अहमदाबाद प्रवासी भाडे वाहतूक असणार 50 हजार रुपये
◆ शिकागोपासून दिल्ली ते हैदराबाद प्रवासी भाडे वाहतूक असणार 1 लाख रुपये
◆ ढाकापासून मुंबई शहरात येण्यासाठी प्रवासी भाडे वाहतूक असणार 12 हजार रुपये

 

कशी वाटली माहिती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि आपल्याला आणखी मुंबईविषयी बातम्या व इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला जरूर सांगा, आम्ही ती आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments