फेमस

बिजनेस तर सगळेच करतात, पण अर्जूनात वेगळं काही तरी होतं, म्हणून टाटांनी…

As happy as I am to support this venture, it has been a minority token investment.
I have not purchased 50% stake in the company. pic.twitter.com/RXbC5aabiB

— Ratan N. Tata (@RNTata2000) May 8, 2020

चांगल्या कामाला मेहनत आणि चांगल्या माणसाची साथ मिळाली तर ते काम अगणित यश मिळवू शकते. आज वंटास मुंबई अशाच एका चांगल्या कामाला आणि मेहनतीला प्रेरणा देणारी खबर तुमच्यासाठी घेऊन आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाना ही खास खबर गर्व आणि प्रेरणा देणारी आहे.

तर मित्रांनो खबर अशी आहे…
कोरोना संकटात सर्वात जास्त मदतीचा हाथ पुढे करणारे आपले टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एका 18 वर्षीय अर्जुन देशपांडे याने स्थापन केलेल्या फार्मासिटिकल उपक्रमात अज्ञात रक्कम गुंतविली आहे. आता एवढा मोठा बिझनेस मॅन, चक्क रतन टाटा यांनी फक्त 18 वयवर्ष असणाऱ्या मुलाच्या फार्मासिटिकल उपक्रमात रक्कम गुंतविली. असे काय वेगळे काम करतात हे मोठे ब्युजिनेस मॅन, ज्याला एवढ्या मोठ्या बिझनेस मॅनची साथ मिळत आहे. पाहूया सविस्तर…
18 वर्षीय अर्जुनचे जेनेरिक आधार
जेनेरिक आधार म्हणजे सर्वसामान्यांना आधार. जेनेरिक आधार हे अर्जुनच्या मेडिकलचे नाव. अर्जुनचे जेनेरिक आधार हे सगळ्यांपासून वेगळे ठरते, कारण या मेडिकलद्वारे तो एक प्रकारे समाजसेवा करतो. लोकांपर्यंत त्यांच्या खिशाला परवडणारी औषधे देने हे मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या मेडिकल स्टार्टअपचे उद्दीष्ट आहे. अनेकवेळा आपण पाहातो, औषधाची एम. आर. पी. खूप असते आणि ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. हा मेडिकल व्यवसाय सुरू करण्यामागचा अर्जुनचा हेतू लोकांना कमी पैशांत आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे.
जेनेरिक आधारची वैशिष्ट्य
मुंबईमध्ये असलेले मेडिकल हे एकत्रीकरण फार्मा व्यवसाय करतात. ज्यामध्ये औषधांच्या कंपनीतील माल हा मध्यस्ती अनेक मेडिकलमध्ये पुरवतो. यामध्ये तीन विभागात पैसे वाटणी होते, त्यामुळे सर्वसामान्यांना औषधे, आहे त्या दरात विकली जातात. जेनेरिक आधार थेट निर्मात्यांकडून जेनेरिक औषधांचा स्रोत तयार करतात आणि किरकोळ विक्रेत्यांना ते पुरवतात, ज्यायोगे मध्यस्थांना पूर्णपणे बाजूला केले जाते. त्यामुळे पैसे वाचून सर्वसामान्य माणसाला कमी किमतीत आवश्यक औषध मिळतात.
∆ जेनेरिक मेडिकलची काम करण्याची पद्धत B2B2C मॉडेल आहे. देशभरातील मेडिकल स्टोअरला परवडणारी औषधं पुरविणे हे त्याचे उद्धिष्ट आहे. जेणेकरून मोठ्या ब्रॅण्ड्स आणि ऑनलाइन फार्मेसीजकडून जास्त लूटमार केली जाणार नाही.
∆ जेनेरिक आधार मधुमेह आणि उच्च रक्तदाब औषधांचा पुरवठा कमी किंमतीत करतात.
∆ लवकरच बाजारपेठेच्या किंमतीपेक्षा अगदी कमी दराने कर्करोगाच्या औषधांची ऑफर देण्याची त्यांची योजना आहे.
∆ जेनेरिक आधार मेडिकल थेट WHO-GMP सुविधेमधून औषधे प्रदान करतो. GMP म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस (जीएमपी) ही एक गुणवत्ता आहे. जी गुणवत्तेच्या मानकांनुसार उत्पादने सातत्याने उत्पादित केली जातात आणि नियंत्रित केली जातात. हे औषधी उत्पादनांमधील जोखीम कमी करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
∆ पालघर, अहमदाबाद, पांडिचेरी आणि नागपूर येथे चार WHO-GMP प्रमाणित उत्पादकांशी कंपनीचा करार आहे. यामुळे बाजार भावापेक्षा 20-30 टक्के कमी दराने औषधे विक्रीस मदत होते.  ही औषधे WHO-GMP प्रमाणित उत्पादकांकडून खर्च कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना अनुकूल बनवण्यासाठी तयार केली जातात.
∆ वार्षिक 6 कोटी रुपयांचा महसूल असल्याचा जेनेरिक आधार मेडिकल कंपनीचा दावा आहे.
∆ राज्यभरात 35 फ्रँचायसीज् असून मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि ओडिशाच्या 30 किरकोळ विक्रेत्यांशी करार केला आहे.  जेनेरिक आधार मेडिकल ही फ्रँचायसीज् आधारित मॉडेलवरील 1000 फार्मसीपर्यंत वाढविण्याची आणि गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, नवी दिल्ली, गोवा आणि राजस्थान या राज्यांमधील विस्तार वाढविण्याची योजना आहे.
∆ कंपनीकडे ऑनलाइन फार्मसी सुविधेसाठी सुमारे 55 कर्मचारी आहेत. यामध्ये फार्मासिस्ट, आयटी अभियंता आणि मार्केटिंग व्यावसायिकांचा समावेश आहे.
नुकतीच १२वीची परीक्षा दिलेल्या ठाण्याचा १८ वर्षीय अर्जुन देशपांडे या युवकाच्या मेहनतीला रतन टाटा यांची साथ मिळाली. या गोष्टीतून प्रेरणा घेऊन नक्कीच आपणही नवीन सुरुवात कराल अशीच वंटास मुंबई आपल्याकडून अपेक्षा करते.
बाकी, कशी वाटली आमची खबर, आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा आणि आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याबद्दलही आम्हाला सुचवा… आम्हाला कंमेंट सेक्शन मधूनजरूर कळवा.

हेही वाचाच…
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments