फेमस

Sonali Suspense : साखपूड्याची बातमी 3 महिने लपविण्याचे ‘हे’ होते कारण

अभिनेते आणि त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा नेहमीच चाहत्यांमध्ये असते. मग सर्व सोशल मीडियावरती आवडत्या अभिनेत्यांना फॉलो करून त्यांच्या जीवनाबद्दल चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आज वंटास मुंबई अशाच एक अभिनेत्रीची चटकदार खबर आपल्यासाठी घेऊन आली आहे.
साऱ्या महाराष्ट्राला आपल्या सौंदर्य आणि लावणीने वेड लावणारी आपली अप्सरा “सोनाली कुलकर्णी”. नुकतीच चर्चेचा विषय ठरली आहे. सोनाली हिने तिच्या वाढदिवशी तब्बल 3 महिने आपल्या साखरपुड्याबद्दल लपवलेली माहिती सोशल मीडियाद्वारे जगजाहीर केली. याबद्दलची सविस्तर माहिती, पाहुयात वंटास मुंबईच्या या खास रिपोर्टमध्ये…
02.02.2020 सोनालीचा खास दिवस
18 मे या दिवशी अप्सरा सोनाली कुलकर्णी हिचा वाढदिवस. याच दिवशी तिने तिच्या चाहत्यांना ‘जोर का झटका धीरेसे दिला’ आणि बातम्यांना उधाण आले. तर खबर अशी आहे की 2 फेब्रुवारी 2020, रोजी  सोनालीचा साखरपुडा पार पडला. हा साखरपुडा दुबईत संपन्न झाला. आता तुम्ही म्हणाल, कोण आहे तो लकी मॅन? तर मित्रांनो मिस अप्सराचा मिस्टर बनला कुणाल बेनोडेकर.
InstaSave

 

कोण आहे कुणाल बेनोडेकर
अत्यंत साधा आणि चित्रपट सृष्टीपासून दूर असलेला कुणाल बेनोडेकर. ‘केनो’ या नावानेही त्याची ओळख आहे. अभिनय आणि चित्रपट सृष्टीपासून दूर असलेल्या कुणाल ने सोनाली कुलकर्णीसोबत साखरपुडा करून चांगलीच बाजी मारली, असे चाहते म्हणतात. कुणाल हा मूळचा लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. कुणालचं शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झालं. त्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं.
वाढदिवसादिवशी सोनालीने दिला चाहत्यांना धक्का
सोनाली कुलकर्णी हिने तिच्या साखरपुड्याचे फोटो वाढदिवसादिवशी सोशल मीडियावर पोस्ट केले आणि “आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही, असं मला वाटतं, असं ती म्हणाली. आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या…!!!” असा कॅप्शन देत चाहत्यांना वाढदिवसाचे रिटर्न्स गिफ्ट दिले. आता लग्नानंतर सोनाली दुबईत स्थायिक होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप सोनालीने काही अधिकृत माहिती दिली नाही.
InstaSave%2B%25285%2529

 

3 महिने साखपूड्याची बातमी लपवायचे कारण
आता सगळे ह्याच विचारात पडले की, चक्क 3 महिन्यांपर्यंत सोनालीने तिच्या एंगेन्ज होण्याची खबर का लपवली. यावर अनेक चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले. चांगली बातमी जाहीर करण्यास दिरंगाई होण्यामागील कारणांबद्दल इन्स्टाग्रामवर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सोनाली म्हणाली, “मी नक्की योग्य प्रसंगी जाहीर होण्याची वाट पाहत होते आणि माझ्या वाढदिवसापेक्षा यापेक्षा चांगले काय मिळू शकेल?”
सोनालीच्या लग्नाबद्दल पसरत होत्या अनेक अफवा
सोनाली कुलकर्णी हिच्या लग्नाविषयी याआधी अनेक अफवा पसरल्या होत्या. ‘क्लासमेंट्स’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सोनालीचं लग्न कोल्हापूरच्या एका मोठ्या राजकीय व्यक्तीशी तिचं लग्न झाल्याच्या बातम्या वेगाने पसरत होत्या. याबाबत सोनालीने खुलासा देखील केला होता.
ती म्हणाली की,
“सुरूवातीला चित्रपटाच्या सेटवर हा विषय गंमतीने घेतला गेला. तिने आधी दुर्लक्ष केलं; पण जेव्हा तिच्या चुलत बहिणीने तिला फोन करून तिला याबाबत विचारलं, तेव्हा सोनालीच्या लक्षात आलं की ही साधी अफवा नाही.” शेवटी या अफवेला कंटाळून त्यावेळी राजकीय ओळख असणारा तिचा मित्र अभिनेता सुशांत शेलारला या प्रकरणाबाबत माहिती काढण्यास सांगितले. तेव्हा लक्षात आले की त्या राजकीय नेत्याची प्रतिमा खराब व्हावी, याकरता त्याच्या विरोधकाने ही बातमी पसरवली होती. यावर सोनाली म्हणते की, ‘यात माझं नाव का गोवण्यात आले हे मात्र एक कोडं आहे’. अफवांमुळे एखाद्याला किती मनस्ताप होऊ शकतो, याची प्रचिती या घटनेतून येते.

हा लेख कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा, सोबतच यासारख्या आणखी काही विषयाची माहिती तुम्हाला हवी असेल, त्याबद्दल नक्की कळवा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments