कारण

शिकण्याचा पॅटर्न बदलला; या 9 योजना करतील क्रांतीकारी बदल…

एक संकट येतं आणि संपूर्ण आयुष्य बदलून जातं. अशीच काहीशी गत या कोरोनामुळे अनेक तरुणांची होत आणि होणार आहे. कधी न होणाऱ्या गोष्टी आपण वास्तवात जगत आहोत. बळकट असलेले हाथ कोरोनाने हतबल केले आहेत.
असो, संकटातही पर्यायी मार्ग शोधणे एक सुलक्षण. लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रुपयांच विशेष पॅकेज जाहिर केले आहे. या विशेष पॅकेजची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत सीतारमण यांनी शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या उपाययोजनांबद्दल सांगितल आहे. तरुण पिढी नेहमीच देशाचे भवितव्य घडवत असतात आणि यामध्ये शिक्षण खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आपण कोरोना परिस्थितीत शिक्षण क्षेत्रातील नवीन कल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शिक्षण क्षेत्रासाठी नवीन योजना
● अर्थातच, आता डिजिटल एज्युकेशन हाच टॉप मोस्ट पर्याय असणार आहे. इंटरनेटद्वारा मोबाईल तसेच आता शिक्षकांचे LIVE वर्ग टीव्ही चॅनलवर दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये टाटास्कायसारखे डिश आणि एअरटेल आत शैक्षणिक एपिसोड आपल्या प्रेशकांना दाखवण्यास सुरुवात करतील.
● ई-स्कूलमध्ये २०० नवीन पुस्तकांचा समावेश करण्यात येणार आहे.
●  ग्रामीण भागात शिक्षणासाठी ऑनलाईनवर भर देण्यात येणर आहे
● देशातील टॉप १०० विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.
● पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे.
● विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार आहे.
● दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. त्यासाठी चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल.
● वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील.
● डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनल तयार करणार आहेत. सध्या असे तीन चॅनल असून यामध्ये आणखी १२ चॅनलची भर पडणार आहे.
अशा प्रकारे आता घरी बसून असलेले विद्यार्थी टीव्ही आणि इंटरनेटद्वारे आपले शिक्षण पूर्ण करू शकतात. या सर्व योजनांमध्ये एक त्रुटी अशी आहे की, ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेटच्या सुविधा नाहीत, त्यांच्यासाठी हे फायद्याचं ठरणार आहे. तसेच, आतापर्यंत अनेक ऑनलाईन स्टडीच्या सुविधा उपलब्ध होत्या परंतू अनेकांनी शाळेत प्रवेश घेऊन शिकणे पसंत केले. शाळेत विद्यार्थी शिक्षक एकत्र असतात. अभ्यासा व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींचे ज्ञान आपण शाळेद्वारे प्राप्त करतो. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारा मंच म्हणजे शाळा असते. पण आता परिस्थिती बदलत आहे, नवीन योजनेनुसार आता सर्व शिक्षण विद्यार्थी घर बसल्या घेणार आहेत.

ही होती शिक्षण क्षेत्राबद्दल माहिती, अशाच अनेक स्पेशल माहितींसाठी आमच्याशी जोडले रहा. वंटास मुंबईच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, हॅलो, यूट्यूब या सोशल मिडीयाशी देखील कनेक्ट राहा, याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयाची माहिती हवी असेल, तर त्याबद्दलही कमेंटमधून जरूर कळवा.

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments