फेमस

बापरे!!! एका चित्रपटासाठी ‘या’ अभिनेत्री घेतात एवढे मानधन

बॉलीवूड क्षेत्र म्हणजे सर्वांची पसंत. बॉलीवूडमधील गॉसीप आणि खऱ्या आयुष्यातील सिनेतारिकांबद्दल जाणून घेण्यास आपण नेहमीच उत्सुक असतो. चित्रपटांची कमाई हादेखील आपल्या उत्सुकतेचा प्रश्न असतो, तसेच चित्रपटात काम करण्याऱ्या सिनेतारकांच्या कमाई बद्दल देखील आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असते. 
चित्रपटाच्या कमाईबद्दल आपल्याला सहज खबर मिळते; पण सिनेतारकांच्या चित्रपट मागच्या मानधनाबद्दल सहसा माहिती आपल्याला मिळत नाही. आज वंटास मुंबई आपल्या वाचकांसाठी एक खास खबर घेऊन आली आहे. बॉलीवूडमधील टॉप टेन सिनेतारीका एका चित्रपटाच्या मागे किती मानधन आकारतात, हे आज आपण वंटास मुंबईच्या खास खबर मधून जाणून घेणार आहोत.
कंगना रानौत
पदश्री पुरस्कार विजेती कंगना रानौत ही बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक यशस्वी अभिनेत्री आहे. एका चित्रपटासाठी कंगना किती मानधन घेते हे ऐकून आपण सर्व चकित व्हाल. कंगना ही एक चित्रपट साईन करण्यासाठी चक्क 15 कोटी रुपये मानधन घेते. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणारी ही पहिली अभिनेत्री आहे. खरे पाहाता, पद्मश्री पुरस्कार विजयानंतर कंगनाच्या मानधनात वजन आले.
WhatsApp%2BImage%2B2020 05 31%2Bat%2B11.02.55

 

दीपिका पदुकोण
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने वेड लावणारी दीपिका ही आजच्या घडीला सर्वात टॉपची अभिनेत्री मानली जाते. बॉलीवूडसोबत तिने हॉलीवूडमध्ये देखील आपले नावलौकिक केले आहे. दीपिका ही तिच्या एका चित्रपटासाठी 14 कोटी एव्हढे मानधन घेते. दीपिकाचे मानधन जरी जास्त वाटत असले तरी अनेक निर्माते तिला चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर करत असतात. आजवर तिने चाहत्यांना अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
WhatsApp%2BImage%2B2020 05 31%2Bat%2B11.02.56

 

प्रियंका चोप्रा
मिस वर्ल्ड 2000 विजेती प्रियंका चोप्रा ही बॉलीवूडमध्ये आपल्या एका वेगळेपणामुळे प्रसिद्ध आहे. या देसी गर्लने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये ही तिने अनेक चित्रपट हिट बनविले आहेत. नॅशनल फिल्म अवॉर्ड विजेती प्रियांका एका चित्रपटासाठी 13 कोटी इतके मानधन घेते. प्रियंका ही एक सिंगरदेखील आहे.
WhatsApp%2BImage%2B2020 05 31%2Bat%2B11.02.56%2B%25281%2529

 

करीना कपूर
बेबो म्हणून बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असणारी करीना कपूर आज कोट्यवधींची मालकीण आहे. लहानपणापासूनच अभिनयाचे धडे गिरवणारी करीना कपूर आज एका चित्रपटासाठी 12 कोटी इतके मानधन घेते. स्टायलिश लुक आणि वेगळ्या अंदाजामुळे बॉलिवूडमध्ये आज करीनाची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळेच करीना एका चित्रपटासाठी इतके मानधन घेते.
WhatsApp%2BImage%2B2020 05 31%2Bat%2B11.02.57

 

कॅटरीना कैफ
हाँगकाँगमध्ये जन्मलेली कॅटरीना कैफ ही एक इंग्रजी अभिनेत्री आहे, जीला अभिनेता सलमान खान याने बॉलीवूडमध्ये एन्ट्री मिळवून दिली. चिकणी चमेली म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखली जाणारी कॅट ही अभिनयासोबत अनेक सामाजिक कामेदेखील करते. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत कॅट भारतात अनेक सोशल प्रोजेक्ट चालविते. आज कॅटरीना कैफ एक चित्रपट साईन करण्यासाठी 11 कोटी रुपये इतके मानधन घेते.
WhatsApp%2BImage%2B2020 05 31%2Bat%2B11.02.52

 

सोनम कपूर 
आपल्या स्टायलिश लुक आणि फॅशनमुळे सोनम कपूर नेहमीच चर्चेत असते. उत्कृष्ट अभिनयासोबत अनुष्का आपल्या लाइफस्टाइलसाठी जास्त प्रसिद्ध आहे. आयकॉनीक बॉलीवूड स्टार म्हणजे सोनम कपूर ही तिच्या एका चित्रपटासाठी 10.5 कोटी इतके मानधन आकारते.
WhatsApp%2BImage%2B2020 05 31%2Bat%2B11.02.55%2B%25281%2529

 

विद्या बालन
बॉलीवूडमध्ये महिलांच्या भूमिकेत बदल घडवून आणण्यासाठी प्रख्यात नामक असणारी विद्या बालन ही एकमेव अभिनेत्री आहे. विद्या बालन ही आपल्या एका चित्रपटासाठी 9.5 कोटी इतके मानधन घेते.
WhatsApp%2BImage%2B2020 05 31%2Bat%2B11.02.54

 

श्रद्धा कपूर 
आपले सौंदर्य तसेच अभिनयामुळे बॉलीवूडमध्ये श्रद्धा कपूरचा एक वेगळा फेम आहे. श्रध्दामध्ये डान्स तसेच सिंगिंगचे देखील टॅलेंट आहे. ‘आशिकी २’ या चित्रपटानंतर श्रद्धाचे खरे बॉलीवूडमध्ये करिअर सुरू झाले. त्यांनतर श्रद्धाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. श्रद्धा आज एका चित्रपटासाठी 9 कोटी इतके मानधन आकारते.
WhatsApp%2BImage%2B2020 05 31%2Bat%2B11.04.13

 

 
अनुष्का शर्मा 
मिसेस विराट कोहली म्हणजे आपली अनुष्का शर्मा. अनुष्का शर्मा नेहमीच अभिनयामध्ये आपली एक वेगळी धमक प्रेक्षकांना दाखवत असते. अनेक चित्रपटांसह अनुष्का जाहिरातींमध्ये काम करताना पहायला मिळते. आजच्या घडीला अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी 8 कोटींचे मानधन घेते.
WhatsApp%2BImage%2B2020 05 31%2Bat%2B11.02.53
आलिया भट
कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आलिया भट आज सर्वात क्युट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आलिया भटने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आलिया ही एक चांगली सिंगरदेखील आहे. आज आलिया भट एका चित्रपटासाठी  7.5 कोटी इतके मानधन घेते. नुकतीच फिल्मफेअर विजेती आलिया अनेक जाहिरातींद्वारे देखील अनेक पैसे कमवते.
WhatsApp%2BImage%2B2020 05 31%2Bat%2B11.02.57%2B%25282%2529
कशी वाटली आमची ही खास खबर हे आम्हाला जरूर कळवा आणि अशाच वंटास पोस्टसाठी आमच्या इतर सोशल मीडियाशी देखील कनेक्टड राहा. बाकी, आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही ती आपल्यापर्यंत पोहचविण्याचा नक्की प्रयत्न करू.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments