एकदम जुनं

भारताच्या 1 कोटी 10 लाख लोकांना ठार करणारा रोग; महात्मा गांधींची सूनही यात…

जगभरात कोरोनाचे वादळ पसरलं आहे. त्यात अनेकजण संक्रमित होत आहेत तर काहींचा दुर्दैवाने मृत्यू होत आहे. जगाचा विचार जरी सोडला तरी भारत यात मागे नाही. देशात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. कोरोनाचं महासंकट जरी जगावर असलं तरी विकसित गोष्टींमुळे आपण यावर मात करत आहोत किंवा वेगवेगळे पर्यायतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
या आधी म्हणजेच सन 1918 मध्ये एक साथीच्या रोगाने जगात थैमान घातले होते. हा रोगही कोरोनासारखाच बाहेरच्या देशातून आला होता. सुरूवातीला याची ओळख, नाव काहीही नसलेल्या या रोगाचा स्पेनने शोध घेतला, त्याला ओळख दिली आणि तेव्हापासून हा रोग स्पॅनिश फ्ल्यू म्हणून ओळखला जाऊ लागला.
न्यूयॉर्कमधले जुने आणि महान लेखक जॉन बेरी यांनी या रोगावर आणि भारतातल्या रोग संक्रमनावर एक पुस्तक लिहलं होतं. ज्याचं नाव आहे ‘द इनफ्ल्युएन्स – द स्टोरी ऑफ द डिडलिस्ट पेंडामिक इन हिस्ट्री. यात त्यांनी स्पॅनिश फ्ल्यू बद्दलच्या जगभरातल्या सगळ्या हालचाली मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
बंधराच्या साहाय्याने बाहेरच्या देशातला हा रोग मुंबईत येऊन धडकला (कोरोना विमानाने). त्याकाळी देशभरात रेल्वे सुरू असल्याने रेल्वेच्या माध्यमातून हा रोग देशभर पसरला. जॉन यांनी त्यांच्या पुस्तकात नमुद केल्याप्रमाणे भारतात रेल्वेचा प्रवास करताना अनेक प्रवासी बरे असायचे मात्र शेवटच्या वेळी म्हणजे ते त्यांच्या ठिकाणी उतरताना समजायचे की त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे.
6 ऑक्टोबर 1918
देशभरात पसरलेल्या या स्पॅनिश फ्ल्यूने एका दिवशी म्हणजे 6 ऑक्टोबर 1918 रोजी मुंबईतल्या 768 लोकांचा जीव घेतला होता. परदेशामध्ये जर 1000 रुग्णांच्या मागे 40 जणांचा मृत्यू होत असेल तर भारतात याचं चित्र भयाण होतं, कारण भारतात 1000 रुग्णांच्या मागे 200 रुग्णांचा मृत्यू होत होता. याचं एकमेव कारण म्हणावं लागेल की त्याकाळी पडलेला दुश्काळ आणि शरिरात असलेली प्रतिकारक क्षमतेची कमतरता. जगभरात 5 ते 10 कोटी लोक या महाभयंकर आजाराने मारले गेले होते. त्यातील कमीतकमी 10 टक्के म्हणजे 1 कोटी 10 लाख लोख हे एकट्या भारतातले होते.
या रोगाने अनेकांना ग्रासलं होतं, सोशळ डिस्टन्स, तोंडावर मास्क हाच एकमेव काय तो पर्याय त्या आजारावर होता, असं म्हटल जातय. महात्मा गांधी यांची सून आणि नातू याच रागामुळे मारले गेले, तर महात्मा गांधी या रोगातून बरे होऊन बाहेर आले होते, असादेखील इतिहास काही ठिकाणी आज सांगितला जात आहो किंवा तसा तो नमुद आहे.

 

काय होती लक्षणे
या रोगाची लागण ज्या रुग्णाला झालेली असायची त्याची लक्षणे अती भयंकर होती. त्याला मोठ्या प्रमाणात खोकला होत असे, त्यामुळे जोरजोरात फुफुसामध्ये दुखायला लागलायचं. हे सगळं सुरू असताना नाक, तोंड आणि जास्त परिणाम झालेल्या रुग्णांच्या कानातूनही रक्त येत असे. रुग्णाला उभे राहाणे लांबच, पण पाठीच्या कण्याच्या आधारे बसण्याची ताकददेखील त्या रुग्णांमध्ये नव्हती. संपुर्ण शरिर निळं, जांभळं आणि काही दिवासांनी काळं पडायला लागायचे. ज्यावेळेस त्वचा काळी होऊ लागते, तेव्हा लोक समजून जात होते की यावर/रुग्णावर उपचार करूनही काही फायद्याचं नाही.
1918 च्या सुरूवातीला सुरू झालेलं हे रोगाविरुध्दचं महायुध्द मार्च 1920 मध्ये शेवटाकडे जात होतं. त्यामुळे जग अशा अनेक रोगांशी सामना करत अजूनही टिकून आहे, त्यामुळे काही देशावर आलेलं कोरोनाचं नवं संकटही लवकर निघून जाईल. गरज आहे, ती फक्त आपल्याला कही नियमांचं पालन करण्याची, हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा, याव्यतिरिक्तही काही विषयांची माहिती तुम्हाला हवी, असेल तर त्याबद्दलही कमेंटमधून नक्की कळवा.

हेही वाचाच…
 
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments