आपलं शहर

विद्यापीठ परीक्षांबाबत सगळ्यात मोठे 12 निर्णय

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनात विद्यापीठ परीक्षा होणार की नाही, या संदर्भात चिंता लागून होती. आता या संपूर्ण चिंतेच निरसन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे, पाहुयात याच संदर्भातील काही महत्वाचे 11 निर्णय…
 • तृतीय वर्षाच्या सर्व परीक्षा सोडून प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द, मागील वर्षीच्या गुणतक्त्यानुसार याहीवर्षी गुण देणार
 • अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या लांब असल्याने महाराष्ट्र शासनाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला आहे, UGC ने आखून दिलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहे.
 • यावर्षी दिलेल्या गुणांमध्ये विद्यार्थ्यांना कमी वाटत असेल, तर पुढच्या वर्षी विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकतात.
 • मागील वर्षी जे विद्यार्थी नापास झाले होते, त्या विद्यार्थ्यांनी  पुढच्या वर्षी संबंधित पेपर देणे बंधनकारक आहे.
 • ज्यांच्या परीक्षा यावर्षी झाल्यात त्याच्यात विद्यार्थ्यांना गुण जास्त असतील तर ते गुण पकडले जातील.
 • आता झालेल्या पेपरमध्ये जरी विद्यार्थ्यांना ATKT लागली तरी विध्यापीठ सुरू झालेल्या 120 दिवसांच्या आत त्या पेपरची परीक्षा घेतली जाईल.
 • कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर संपला, तर पुन्हा 20 ते 25 जूनमध्ये परत UGC च्या नियमानुसार निर्णयात बदल करण्याची शक्यता आहे.
 • अनेक विद्यार्थ्यांच्या CET परीक्षा आहे, त्या तालुका स्तरावर होण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे,त्यासाठी कमिटीचा येत्या 8 दिवसात निर्णय होणार
 • SNDT च्या परीक्षा होणार आहेत, त्या परीक्षा परराज्यात असल्याने संबंधित राज्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
 • ज्या विध्यार्थ्यांच्या अटेंडन्सचा प्रॉब्लेम होता, त्या विद्यार्थ्यांची लॉकडाऊन दरम्यानची 45 दिवसांची संपूर्ण हजेरी दाखवण्यात येणार आहे, याच्यातून देखील विद्यार्थ्यांची हजेरी भरत नसेल तर युनिव्हर्सिटीने त्या विद्यार्थ्यांचा विचार करावा.
 • चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विद्यापीठांना अधीकार देण्यात आलेत, ते निर्णय घेऊन तिथल्या महत्वाच्या परीक्षा घेऊ शकतात.
 • या सगळ्यात, विद्यार्थ्यांना काही समजत नसेल तर कुलगुरू सचिव आणि विद्यापीठाने विद्यार्थ्यांना समजून दिलं पाहिजे, ताशाप्रकारे सेल लावले जातील आणि विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल.

 

विद्यापीठ परीक्षा संदर्भात अजून काही माहिती असेल तर वंटास मुंबईला नक्की भेट द्या, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हेही कमेंटमध्ये जरूर कळवा.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Tariq

Std 5th student chi pan Re- exam ghet aahet schools ( English, marathi ,maths ) ya subject chi mala msg aala aahe school kadhoon …
(Mast Shaikh Aamir T.
has to attend re-exam as his progress is not satisfactory. Details about re- exam will be informed later.) 14 may 15may 16may dates diley aahe ya baddal kahi updets…..

vantas team

बॅकलॉग असलेल्यांना पुढच्या वर्षात जाता येणार, मात्र विद्यापिठे सुरू झाली की त्यांनी पेपर देणे गरजेचे असेल…

Unknown

Backlog sathi khi karayla havv hota…????