एकदम जुनं

युपी-बिहारवाले आता घरी जात आहेत, मात्र ते 2000 वर्षांपूर्वी आले होते म्हणे…

महाराष्ट्रात येणारे भैय्ये म्हणजेच मुख्यत्वे बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात आणि बाकी राज्यातून आलेले अनेक लोक आता मुंबईतल्या लॉकडाऊनमुळे घराकडे जात आहेत. कारण त्यांच्या पोटापाण्यासह राहाण्याचीही गैरसोय होत आहे. इथे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर अनेकांचे छोटेमोठे व्यवसायदेखील बंद झाले आहेत. हे अनेक लोक कालपरवा म्हणजेच काही वर्षांपुर्वीच आले आहेत, मात्र तसं पाहिलं गेलं ते 2000 वर्षांपासूनच मुंबईत ठान मांडून आहेत, असा इतिहास सांगतो.
 
मुंबईतला असा कोणताच भाग, परिसर नाही; जिथे परप्रांतिय भैय्ये नाहीत, मात्र आता मुंबईतले अनेक भैय्ये ज्यांचे कोणतेच अस्तित्व मुंबईत नाही, असे लोक आता मुंबईबाहेर जात आहेत. अनेक छोट्यामोठ्या व्यवसायांमध्ये हे लोक रुजू झाले आणि ते इथलेच स्थायिक झाले. मुंबईत असलेल्या अनेकांचं तर त्यांच्या गावाकडे कोणतेच वास्तव उरलं नाही, त्यांच्या आधारकार्डापासून सगळाच पत्ता आता इथला बनला आहे.
 
पुर्वी म्हणजे जेव्हापासून व्यवहाराची भाषा सुरू झाली, तेव्हापासून हे परंप्रांतिय लोक मुंबईत येऊ लागले होते, त्यावेळेस परप्रांतिय असा कोणताच उल्लेख नव्हाता, मात्र देशाच्या फाळणीनंतर हे सीमाप्रश्न, परप्रांतिय असे प्रश्न सुरू झाले. पहिला म्हणजेच देशात जेव्हा मौर्यांचं राज्य होतं, तेव्हा व्यवहारांच्या आणि इतर उद्देशाने देशातल्या देशात असं स्थलांतर होतच असे. तो काळ 2000 वर्षांपासून चालत आलेला.
 
मुंबईच का?
समुद्र किनारी असलेला भाग म्हणजेच कोकण हे बड्या व्यापारांचा केंद्रबिंदू असायचा. त्यामुळे व्यापार करणाऱ्या जितक्या पिढ्या होऊन गेल्या त्यांनी कोकणाला जास्त पसंती दिली होती (आताही काहीसं तसच चित्र आहे). बडे व्यापारी जरी या कोकणात व्यवहार करत असले तरी त्यांच्या हाताखाली छोटीमोठी कामं करणारे कामगार आताही आणि त्याकाळीही गरजेचे होते. त्यामुळे अशिक्षीत, व्यवहारातील कोणतेच ज्ञान नसलेले अनेक लोक देशातून कोकणात येऊ लागले, काहींनी आपल्या कुटुंबाला सोबत आणलं आणि जशी सोय होईल, तसं तिथेच कायमचं वास्तव केलं.
 
परंप्रांतियांची मुंबईला सवय झाले का?
मुंबईतले अनेक लहानसहान उद्योगही भैय्या, म्हणजेच युपी, बिहारी, बंगाली यांच्यावर अवलंबुन आहे, काही ठिकाणी सोडलं तर मुंबईतल्या अनेक ठिकाणी घरापर्यंत जाऊन दुधविक्री करण्यापासून मोठं-मोठी कामं हे परप्रांतिय करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक खाद्यांच्या दुकानांवरदेखील परप्रांतियांचा कब्जा असतो, मात्र तेच परप्रांतिय आता आपल्या गावी निघाले आहेत. त्यांच्या जागी कामं  कोण करणार? हा प्रश्न तसा ऐरणीवर आहेच. कारण मुंबईतील किंवा राज्यातील मराठी लोक असे छोटेमोठे व्यवसाय करतील का, असा सवाल सगळी विचारला जात आहे. मुंबईतल्या छोट्यामोठ्या व्यवसायांमध्ये आपल्याला परप्रांतियांना भैय्या म्हणून सवय झालेली असते, तशीच ती मुंबईलाही झालेय, हे नक्की.
 
ही सवय जर मुंबई आणि मुंबईकरांची मोडण्याची खूप गरज आहे, कारण राज्यातल्या अनेक शिक्षीत, अशिक्षीत तरुणांना आता नोकरीची गरज आहे. हा लेख कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा, याव्यतिरिक्त अजून काही विषय सुचवायचे असतील, तर तेही आम्हाला कळवा.
हेही वाचाच…
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments