आपलं शहर

सावधान! जेवन टाकलेला आणि मुर्दाबाद म्हटलेला व्हिडीओ तुमच्याकडे आला असेल…

सावधान! प्लॅटफॉर्मवर जेवन टाकलेला एक व्हिडीओ तुमच्याकडे आला असेल; तर तो महाराष्ट्रातला नाही.
कालपासून कोरोना पसरल्यासारखा एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला येईल आणि सोबतच एका मॅसेजमधून सांगितलं जाईल की यात मुर्दाबाद म्हणणारे महाराष्ट्राला शिव्या देतायेत. त्या व्हिडीओमध्ये हेदेखील स्पष्ट दिसत आहे की प्रवासामध्ये लागणारे जेवनदेखील त्या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या लोकांनी प्लॅटफॉर्मवर टाकुन दिलं आहे.
तुमच्यापर्यंत आलेला व्हिडीओ हा पुर्णरित्या खरा आहे, मात्र तो महाराष्ट्रातील नाही, हेदेखील तितकच खरं आहे. या व्हिडीओत दिसणारं रेल्वे स्टेशन हे पश्चिम बंगाल येथील आसनसोल जंक्शन आहे. पश्चिम बंगाल येथे काही वर्षांपुर्वी आलेल्या अनेक कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्यात आलं, मात्र प्रवासादरम्यान खाण्यासाठी दिलेलं जेवनदेखील त्यांनी प्लॅटफॉर्मवर फेकून दिलं, सोबतच मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचं त्या व्हिडीओमधून समजून येतय, मात्र त्यात महाराष्ट्राचा उल्लेख कुठेही केलेला नाही. व्हायरल करणारे अनेक लोक मात्र याची खातरजमा न करता तो महाराष्ट्रातील समजूनच व्हायरल करत आहेत.
व्हिडीओ महाराष्ट्रात व्हायरल का होतोय
महाराष्ट्रात जास्तकरून मुंबई आणि कोकणपट्ट्यात परप्रांतिय लोकांची संख्या जास्त आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने यांच्याबद्दल महाराष्ट्रातील लोकांच्या मनात तिरस्कार आहेच, मुंबईकरांच्या मनात सर्वाधिक आहे. त्यातच असे व्हिडीओ व्हायरल होणे म्हणजे हाती आयतं कोलीत मिळल्यासारखी परिस्थिती झालेय. खोटं सांगून प्रांतवाद निर्माण करणे असादेखील अनेकांचा उद्देश असू शकतो, मात्र अनेक मराठी जनता तरी परप्रांतियांच्या मनात असलेली चिड बाहेर काढण्यााठी कोणतीही शहानीशा करण्याआधी हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत.
जेवन का टाकलं?
जन्मभूमी इतकीच कर्मभूमीदेखील अनेकांना महत्वाची असते, कर्मभुमी देवासमानच असते, तिचा मान प्रत्येकाने राखलाच पाहिजे, पण या व्हिडीओत मिळालेलं अन्न टाकून देण्याची वेळ त्यांच्यावर का आली? हा कदाचित संशोधनाचा विषय असू शकतो. त्या जेवणाची क्वालिटी काय असेल? ते खरंच माणसाच्या खाण्याच्या लायक होतं का? हा देखील विचार आपण करायला हवा.
राज्यातील काही समाज कंटकांकडून असे अनेक व्हिडीओ जाणीवपुर्वक व्हायरल केले जात आहेत का? असले व्हिडीओ या परिस्थितीत व्हायरल करणे किती योग्य? शहानिशा न करता आलेले व्हिडीओ दुसरीकडे फॉरवर्ड करणे सोयीचे आहे का? यावरदेखील महाराष्ट्रातील जनतेने विचार करणे आता गरजेचे आहेच.

हा लेख तुम्हाला कसा वाटला; ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इतर कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला तो विषय कमेंटमधून सुचवा, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.

हेही वाचाच…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments