कारण

भारताच्या HCQ लसीवर WHO ची बंदी का? चिनचा मास्टरप्लॅन काय?

कोरोनावर मात करण्यासाठी अजूनतरी कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. मुंबईत कोरोनाचा पादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर कोणतीच ठोस लस नसल्याने भारताने आणि जगाने अनेक लसींची चाचणी रुग्णांवर करून पाहिली. काही लसींचा परिणाम रुग्णांवर चांगल्या पद्धतीने होताना दिसत होता, त्यापैकी एक लस म्हणजे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन. 
जेव्हा कोरोनाचा पादुर्भाव वाढत होता तेव्हा पासून या लसीची सर्वत्र चर्चा होती. या लसीमुळे भारताच्या वैदकीय व्यवस्थेची चर्चा संपूर्ण जगात होत होती. हे औषध गेले अनेक वर्षे मलेरियावरील औषध म्हणून प्रसिद्ध होते. कोरोनाचा पादुर्भाव कमी व्हावा म्हणून राज्य सरकारने देखील धारावीसारख्या हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये रुग्णांना ही लस दिली होती. याला मुंबई महापालिकेतील काही अधिकारी सहमत नव्हते. हे औषध भारतासह जगाला चांगल्या प्रकारे माहीत होतं परंतु WHO ने हे औषध कोरोना रुग्णांना देण्यास बंदी घातलेली आहे.
जेव्हा औषधांची लस देत होते तेव्हा या औषधाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेम चेंजर म्हणून म्हटलं होतं त्याच प्रकारे त्यांनी स्वतः मान्य केलं होतं की हे औषध मी स्वतः घेत आहे. इतकंच नाही तर भारताने या औषधावरील निर्याती संबंधीत नियम बदलावे यासाठी त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. जगामध्ये अनेक देशांना या औषधाने कोरोनापासून थोडेफार रोखण्याचा प्रयत्न झाला होता, त्यामुळे अनेक देशांना भारताने हे औषध निर्यात केले होते. हे सर्व असताना जागतिक आरोग्य संघटनेने HCQ च्या चाचण्यांवर बंदी का घातली? वैदकीय जगतात अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या लँसेट या नियतकालिकेत अलीकडेच एक संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यामध्ये असं म्हटलं होत की HCQच्या गोळ्यांचा कोरोनाच्या रुग्णांना बर करण्यासाठी फायदा होऊ शकतो, असे कुठेही पुरावे हाती लागलेले नाहीत. उलट या गोळ्यांमुळे कोरोनाचा रुग्ण दगवण्याची शक्यता जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटना कोरोनावर कोणते औषध उपायकरी ठरेल, याच्या शोधात आहे त्यातून HCQ हे औषध वगळले आहे.
लँसेटमध्ये जो अभ्यास प्रकाशित झाला होता त्यामध्ये 96 हजार रुग्णांचा अभ्यास केला होता. यातील 15 हजार रुग्णांनी हे औषध घेतलं होतं. याबरोबरच त्यांना अँटीबायोटिकसुद्धा दिली गेली होती. आता ज्या रुग्णांनी क्लोरोक्वीनच्या गटातील औषध घेतली होती, त्याच्यातला मृत्यूदर हा ही औषध न घेतलेल्या रुग्णापेक्षा जास्त होता असे आढळून आलं आहे. HCQ जे रुग्णांनी घेतला होता त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण हे 18 टक्के होते. ज्यांनी हे औषध घेतलं नाही त्याचे प्रमाण हे 9 टक्के होते. म्हणून या गोळ्या देऊन फायदा होण्यापेक्षा अपाय जास्त आहेत असं या अभ्यासात सामोर आलं आहे.
जगभरात HCQ च्या वापराबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण असताना भारतात मात्र याच्या वापराला परवानगी आहे. त्यासाठी ICMR ने नवीन नियमावली काढली होती त्यामध्ये जवान, कर्मचारी, पोलीस यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही गोळी घेऊ शकतात. गर्भवती महिला लहान मूलं आणि ज्यांना हृदयाच्या ठोक्यांचा त्रास आहे, त्यांनी हे औषध घेऊ नये. कोणत्याही रुग्णाला डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हे औषध देऊ नये असं सांगीतल आहे.
या सगळ्यामागे चिनचा हात असू शकतो, असे मत अनेक वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे, तशाप्रकारच्या बातम्याही समोर आल्या आहेत, काहीदा डोनाल्ट ट्रम्प यांनीदेखील आपल्या पत्रकार परिषदेतून चिनवरती ताषेरे ओढले आहेत, तर इतर देशांनीही उघडरित्या चिनवर आरोप केले आहेत, मात्र WHO संघटनेमध्ये चिनचा हस्तक्षेप आहे का? हे स्पष्ट  होणे अजून बाकी आहे.

हा लेख कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा, अशा अनेक वंटास पोस्ट वाचण्यासाठी आणि पाहाण्यासाठी आमच्या वंटास मुंबईच्या सोशल मिडीयाशी नक्की भेट द्या.

हेही वाचाच…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments