कारण

खरच चीनचे 43 जवान मारले गेलेत का? वाचा, काय आहे सत्य

[et_pb_section admin_label=”section”] [et_pb_row admin_label=”row”] [et_pb_column type=”4_4″][et_pb_text admin_label=”Text”]
15 जून रोजी चीन आणि भारत यांच्यात विनाशस्त्र चकमक झाली आणि भारताचे तीन जवान शहीद झाले. गेल्या पन्नास वर्षांनंतर पहिली वेळ ही चकमक झाल्याने आता या दोन देशांचं पुढचं पाऊल काय?  यावर सगळ्या जगाचं लक्ष लागून आहे. पहिलीवेळ भारत आणि चीनच्या सिमेवर झालेल्या या वादामुळे संपुर्ण देशभरात आक्रोश निर्माण होत आहे.
पहिला तीन आणि नंतर लगेचच भारताचे 20 जवान शहीद झाले, हे वृत्त देशभर पसरत असताना या चकमकीत चीनचेदेखील 43 जवान मृत पावल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरू लागलं. देशाची सर्वात मोठी मिडीया एजन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एएनआयने एक ट्विट केलं, ज्यात असं नमुद केलं होतं की भारत आणि चीनच्या सिमेवर झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद तर चीनचे 43 जवान गंभीर जखमी अथवा मृत पावले आहेत.
या सगळ्या माहितीवर गंभीररित्या अनेक ठिकाणांहून संशय व्यक्त केला जात आहे. नेमके ते कोणते सवाल आहेत, जे अनेक क्षेत्रातून उठवले जात आहेत, हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ANI रिपोर्टच्या मते या संघर्षात चीनचे 43 सैनिक मारले गेले किंवा जखमी झालेत. ANI च्या इनपूट्सच्या (सोअर्स) आधारावर सर्व प्रसारमाध्यमे हे वृत्त चालवत आहे. मात्र काही प्रश्न अनुत्तरीत आहेतच, ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एका जेष्ठ पत्रकारांनी मांडलेले काही मुद्दे, पुढीलप्रमाणे
1. चीनी कम्युनीस्ट पक्ष (जो आता सत्तेत आहे) तो अनेक गोष्टींमध्ये कमालीची गुप्तता पाळतो. अगदी वुहानमधून पसरत असणाऱ्या कोरोना संसर्गाच्या बातम्याही सुरुवातीच्या इथे दडपण्यात आल्या होत्या.
2. वुहानमधील कोरोना विषाणू जगभर कसा पसरला, कुणी पसरवला, याचा पत्ता अजून CIA सारख्या गुप्तचर संस्थेला लागला नाही. मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी तसा दावा केला होता. मात्र त्याचे पुरावे मात्र ते देऊ शकले नाहीत. किंबहूना CIA ने त्यांने तशे सांगितले. त्यामुळे आरोपाच्या पुढे हे प्रकरण गेले नाही.
3. चीनमध्ये नेमके काय चालते, कशा प्रकारे यंत्रणा चालते, बंडखोरांना कशे गायब केले जाते, याची जवळपास योग्य रिपोर्टींग करण्याची ताकद, कुवत न्युयॉर्क टाईम्स, वॉशींग्टन पोस्ट, द वॉल स्ट्रीट जर्नल सारख्या वृत्तपत्रांमध्ये आहे. मात्र अलिकडे कोरोना संसर्गाबद्दल चुकीचे वृत्त पसरवल्याचा आरोप ठेवून या वृत्तपत्रांच्या प्रतिनीधींना चीनने देशाबाहेर हाकलले. त्यामुळे निष्पक्ष फॉरेन मिडीयाचे चीनमध्ये सध्या काही अस्तित्व नाही.
4. चीनमध्ये वरच्या स्तरावर कसा भ्रष्टाचार माजला आहे, कम्युनीस्ट पक्षाचे नेते कशे युरोप, अमेरिकेतील व्यवसायात मोठाली गुंतवणूक करताहेत. हॉलीवूडमध्ये काहींनी पैसा गुंतवला. या स्वरुपाचे रिपोर्टींग न्युयॉर्क टाईम्सने करताच, या वृत्तपत्राच्या बेवसाईटवर बंदी घालण्यात आली. तरीही अलिकडे उगेर प्रांतात मुस्लीमांना डिटेशंन कॅम्पमध्ये हलवण्याचे सरकारी आदेशचं न्युयॉर्क टाईम्सने पब्लिश केले होते.
5. असोशीएट प्रेस, रॉयटर, एएफपीसारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थाना अलिकडे चीनमध्ये नेमके काय सुरु आहे. त्याचे फॅक्चुअल रिपोर्टींग करणे अवघड होऊन बसले आहे.
6. मग  ANI सारख्या कमी क्षमतेच्या, कुवतीच्या खाजगी वृत्तसंस्थेला या संघर्षात चीनचे नेमके किती सैनिक मारले गेले, ते अतिशय वेगाने कसे कळाले, हा प्रश्न आहे.
7. ANI चे भारताबाहेर फार कमी ठिकाणी करस्पॉंडंट (वार्ताहर) आहेत. भारताबाहेरच्या बातम्यांसाठी ANI चे काही असोशीएट प्रेस, रॉयटर्ससारख्या वृत्तसंस्थाशी टायअप आहेत. म्हणजे देशाबाहेरच्या वृत्तासाठी/बातम्यांसाठी  ANI परदेशी वृत्तसंस्थेवर अवलंबून असते.
8. परदेशातील वृत्तसंस्थानीदेखील गलवान संघर्षात नेमके किती चीनी सैनिक मारले. त्याचे कंन्फर्म वृत्त दिले नाही. मग ANI ला हे इनपूट्स, सोअर्स कुठून मिळाले? इतर परदेशी वृत्तपत्रांनी या बातम्यांसाठी भारतीय मिडीयाला कोट केले आहे, हे विशेष.
9. ANI ने  चीनी सैनिकांच्या इंंटरसेप्ट केलेल्या संभाषणातून ही माहिती मिऴाल्याचे सांगितले. (म्हणजे हे संभाषण आपल्या लष्करी इंटलीजंसनी केले असेल) मात्र जर आपण चीनचे इंटर्नल लष्करी संभाषण इंटरसेप्ट करु शकतो. तर मग चीनच्या गेल्या काही दिवसातल्या हालचाली, स्टॅटेर्जी आपण का टिपू शकलो नाही. हा प्रश्न उद्भवतो. दुसरी बाब मिडीयाने म्हटली, ती म्हणजे हेलिकॉप्टर घिरट्या घालत होते. या भागात चीनने मोठ्या प्रमाणात लष्करी संसाधनाची जमवाजमव केली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर घिरट्या घालण्यावरुन शत्रुपक्षाच्या कॅजुल्टीज किती झाल्या त्याचे अनूमान लावणे कठिण आहे.
10. ANI या वृत्तसंस्थेचे वृत्त संकलनातील रेप्युटेशन तेवढे चांगले नाही. सरकारी पक्षाकडे झुकण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जो त्यांनी नाकारलादेखील नाही. अनेकवेळा सरकारी पक्ष अडचणीत आल्यावर, ANI च्या माध्यमातून मुलाखती घेतल्या जातात. हे सर्वांना माहिती आहे. भारताचे 20 सैनिक शहीद झाले, हे लोकांच्या मनातून बाहेर काढण्यासाठी चीनचे 43 सैनिक मारले गेले, ही बाब लोकांच्या मनात बिंबवण्यासाठी कदाचित हे वृत्त पब्लिश केल्याचा आरोप यावर केला जात आहे.
11. इतर काही मिडीयाच्या वृत्तानूसार चीनने अतिशय नियोजनपुर्वक, म्हणजे घात लावून,  बेसावध ठेवून आपल्या सैनिकांवर हल्ला चढवला. नेटवर्क 18 च्या वृत्तानूसार चीनी सैनिकांनी काटेरी तारा बांधलेले रॉड तयार ठेवले होते. अतिशय क्रूर पध्दतीने भारतीय सैनिकांवर वार केले. नेमके काय झाले, या संघर्षात जखमी झालेले सैनिक बोलतीलच, त्यातून काय ते सत्य पुढे येईल, मात्र ते आपल्यापर्यंत पारदर्शीपणे पोहोचेल का, हा प्रश्न कायम आहे. शेवटी लष्करी संघर्षातील इतिवृत्त जनतेपुढे कुठलाही देश जशाचे तशे वृत्त मांडत नाही.
मात्र सरकारने आपली कमजोर बाजू लपवण्यासठी लष्कराचा वापर करू नये, हे नक्की. कारण भारताचे 20 जवान शहीद झाले, हे सारकरी खात्यातून सांगण्यास उशीर झालाच, मात्र भारतीय प्रशासनाने अजून ठामपणे ‘चीनच्या 43 जणांना आम्ही ठार केलं’, हे वृत्त दिलंच नाही.
IMG 20200613 WA0013
[/et_pb_text][/et_pb_column] [/et_pb_row] [/et_pb_section]

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments