फेमस

सु’शांत’ची 50 Dreams & caunting 1,2,3… जी कधी पुर्णच झाली नाहीत…

ज्या कलाकाराने आयुष्य जगायचा शिकवलं, त्या कलाकाराने आपल्याच आयुष्याचा शेवट केला. ज्याने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले, त्याच हसमुख चेहऱ्याने अनेकांना मोठं करण्याची स्वप्नेदेखील पाहिली होती. जी स्वप्ने फक्त स्वप्नेच म्हणून राहिली.
सुशांत सिंह राजपुतने आपल्या आयुष्यातली TOP50 स्वप्ने लिहून ठेवली होती. त्याच्यातील काही स्वप्नांना त्याने पुर्ण केलं मात्र निम्म्याहून अधिक स्वप्ने त्याची अपुरीच राहिली. अर्ध्यावर आयुष्य संपवणारा एखाद्या कलाकाराला त्याच्या अपुर्ण स्वप्नांचा विचार करूनही जगावसं वाटलं नाही! हे आश्चर्य म्हणावं लागेल.
सुशांतने करिअर करत असताना top50 स्वप्नांची यादी बनवली होती. आज तीच यादी आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सुशांतने स्वप्नांच्या यादीची पहिली ओळ लिहली होती की My 50 Dreams & caunting 1,2,3…
1. सुशांतनं विमान उडवण्याचं पहिलं स्वप्न लिहलं होतं.
2. सुशांतला आयर्न मॅन ट्रॅथलॉन या स्पर्धेत सहभागी व्हायचे होतं.
3. त्याला डाव्या हाताने क्रिकेट खेळायचं होतं.
4. सुशांतला मार्स कोर्स ही भाषा शिकायची होती.
5. अनेक मुलांना अंतराळाबद्दल माहिती करून देणं, हे त्याचं पाचवं स्वप्न होतं.
6. सुशांतला एका चॅम्पियनसोबत टेनिस खेळायचं होतं.
7. सुशातचं 4 क्लॅप्स पुशअप्स करायचंही एक स्वप्न होतं, ज्यासाठी तो प्रयत्न करत होता.
8. सुशांतला चंद्र, मंगळ आणि गुरू या ग्रहांवर फिरत त्यांचं निरिक्षण करायचं होतं.
9. समुद्रातल्या ब्ल्यु होलमध्ये पोहोणे, हे त्याचं नववं स्वप्न होतं.
10. त्याला अवकाशातून येणाऱ्या प्रकाशांमध्ये डबल स्लिटचा प्रयोग करायचा होता.
11. त्याच्या आयुष्यात 1 हजार झाडांच वृक्षापोपणदेखील करायचं होतं.
12. त्याने शिक्षण घेतलेल्या दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधल्या हॉस्टेलमध्ये त्याला पुन्हा एकदा राहायचे होते.
13. इस्रो किंवा नासाच्या होणाऱ्या वर्कशॉपमध्ये त्याला 100 मुलांना घेऊन जायचं होतं.
14. कैलास पर्वतावर त्याला मेडिटेशन करायचं होतं.
15. त्याला एका चॅम्पियन खेळाडूसोबत पोकर हा खेळ खेळायचा होता.
16. त्याला एक पुस्तक लिहायचं होतं.
17. युरोपमधल्या CERN ला त्याला भेट द्यायची होती.
18. अंतराळतल्या धृविय प्रकाशाचं चित्र काढणे, हे त्याचं स्वप्न होत.
19. नासाच्या कार्यशाळेत त्याला स्वत:ला सहभागी व्हायचं होतं.
20. त्याने ठरवलेल्या सहा महिन्यात सिक्स पॅक अॅप बनवनं, हेदेखील त्याचं स्वप्न होतं.
21. समुद्रातल्या सिमोट्समध्ये पोहोणं, हेदेखील त्याचं एक स्वप्न होतं.
22. पाहाता न येणाऱ्या लोकांना कोडींगची भाषा शिकवणे, हे त्याने आयुष्यात ठरवलेलं 22 वं स्वप्न होतं.
23. त्याला सलग एक आठवडा जंगलात राहायचं होतं.
24. जगात सांगण्यात येणारं वैद्यकिय ज्योतिष शास्त्र त्याला समजून घ्यायचं होतं.
25. त्याला डिजने लॅंड पाहायचं होतं.
26. सुशांतला अमेरिकेत गुरुत्वाकर्षण केंद्रावर अभ्यास करणाऱ्या लिगो केंद्राला त्याला भेट द्यायची होती.
27. त्याला स्वत:चा एक घोडादेखील पाळायच्या होत्या.
28. देशातले दहा नृत्यप्रकार शिकायचे होते.
29. अनेक विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणासाठी प्रयत्न करणे, हे त्याचं एक स्वप्न होतं.
30. अॅंड्रोव्हेना गॅलेक्सि पाहाण्याचं तिसावं स्वप्न त्याचं अधुरच राहिलं.
31. त्याला क्रिया योग शिकायचं होतं.
32. जगातला अंटाल्टिका खंड फिरायचा होता.
33. अनेक महिलांना स्वयंसौरक्षणाचे धडे देणं, हेदेखील त्याचं स्वप्न होतं.
34. एका सक्रिय ज्वालामुखीला कॅमेरात कैद करणं, त्याचं स्वप्न होतं.
35. त्याला आयुष्यात शेतीदेखील करायची होती.
36. लहान मुलांना डान्स शिकवणे, हे त्याचं छत्तीसावं स्वप्न होतं.
37. सुशांतला दोन्ही हातांनी तिरंदाजी करायची होती.
38. रेन्सिक हॉलिडेचं पुस्तक वाचणे, हे त्याचं स्वप्न होतं.
39. सुशांतला पॉलिनिसी अॅस्ट्रॉनॉमी शिकायची होती.
40. त्याच्या आतापर्यंतच्या 50 गाण्यांना त्याला गितारवर वाजवायचं होतं.
41. त्याला एका चॅम्पियन खेळाडूसोबत बुध्दिबळ खेळायचं होतं.
42. सुशांतला लॅम्बोरगिनी गाडी खरेदी करायची होती.
43. व्हिएतनाम येथे असलेल्या स्टेफन कॅथलिक चर्चला भेट देणे, हे त्याचं आणखी एक स्वप्न होतं.
44. भौतिकशास्त्रातील सायमॅटिक्सवर त्याला प्रयोग करायचा होता.
45. भारतीय तट रक्षक दलात अनेक मुलांना पाठवायचं, त्याचं स्वप्न होतं.
46. सुशांतला स्वामी विवेकानंद यांच्यावर डॉक्युमेंट्री बनवायची होती.
47. समुद्राच्या लाटांवर बोट सफरिंग करणे, हे त्याचं स्वप्न होतं.
48. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर काम करणे.
49. एकोपन्नासव्या स्वप्नात तो ब्राझिलचा डान्स शिकणे आणि मार्शल आर्ट्स शिकण्याचं नोंदवतो.
50. रेल्वेमधून संपुर्ण युरोप फिरणे, हे त्याचं अखेरचं आणि पन्नासावं स्वप्न होतं.
माणूस आयुष्यात किती स्वप्न ठेवू शकतो याला पूर्णविराम नसतो, मात्र त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तो आणखी आयुष्य देवाकडे मागत असतो, मात्र अशी अर्धवट स्वप्न सोडून जाणारा हरहुन्नरी कलाकार पहिलाच असेल. सु’शांत’ होण्यामागची कारण जरी अनेक असली तरी त्याची अनेक स्वप्न हे एका आयुष्यात पूर्ण झाली नाहीत, याचीच खंत अनेकांना वाटत आहे, हे नक्की।
IMG 20200613 WA0013

 

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments