कारण

मुंबईचा आकडा 50 हजारांच्या पार; यासाठी एकटी मुंबई जबाबदार आहे का?

‘विपरीत गोष्ट घडला टाळी दोन्ही हातांनी वाजते’ असे म्हटले जाते, आज कोरोना संकटाच्या काळात हे वाक्य हुबेहूब शोभणारे आहे. नको होत्याचे होते झाले आणि मुंबईचा आकडा हा 50 हजारांच्या पुढे गेलाय. आता हा आकडा वाढण्याला जबाबदार कोण? एकट्या राज्य सरकारला दोष देऊन जमेल काय? त्रुटी कुठेही असेना, पण भोगत आहे ती आपली मुंबई, यात तीळमात्र शंका नाही. आज वंटास मुंबई, कोरोनाचा मुंबईतील आकडा 50 हजारांच्या पार जाण्याला जबाबदार कोण? यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुंबईतील कोरोनाची परिस्थिती
आपण आधी कोरोना रुग्णांचा आकडा काय म्हणतो हे पाहूया, मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकड्याने 50 हजारांचा टप्पा क्रॉस केला असून मुंबईतील (9 जून 2020) कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा 51,100 पर्यंत वाढला आहे. यांपैकी बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा पाहिला तर तो 22,943 इतका असून कोरोना आजराने 1760 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 26,399 हे ॲक्टीव्ह रुग्ण आहेत.
मुंबईतल्या वाढत्या आकडेवारीला जबाबदार कोण?
2019 च्या डिसेंबर महिन्यात चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवायला सुरू केला असताना, ‘आपल्या देशात हा रोग पसरला तर काय करता येईल?’ हा विचार समोर ठेवून तसं नियोजन करणे गरजेचे होते, याशिवाय आपल्या देशात कोरोना संकट येऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे होते. 2020 च्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करायला हव्या होत्या. कोरोनाचे संकट देशभरावर ओढावले असताना सुरुवातीच्या काळात सरकारला योग्य ती खबरदारी घेता आली नाही.
खर म्हणजे, कोरोणाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही. कालांतराने रुग्ण वाढत गेले आणि सरकारला जाग आली. पुण्यानंतर मुंबई हे कोरोनाचे शहर बनत गेले. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये नक्कीच सुरुवातीपासून खबरदारी घेतली असती, तर वाचवता आले असते. घरोघरी कोरोना टेस्टिंग होणे गरजेचे होते.
एका टोकाहून दुसऱ्या टोकाला वारादेखील जाऊ शकणार नाही, अशी धारावीसारखी बडी झोपडपट्टी आणि मोठ्या आकड्यातली लोकसंख्या मुंबईत राहाते. मुंबईत कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे धारावी सारख्या अनेक झोपडपट्या होय. तेथील गर्दी कमी करून विशेष काळजी घेणे आवश्यक होते.
भविष्याचा विचार करून आरोग्याच्या दृष्टीने विचार करता कोरोनाची चाहूल लागताच अनेक उपाययोजना राबविल्या गेल्या पाहिजे होत्या. गरिबांचा विचार करून तसेच मुंबईत असणाऱ्या स्थलांतरित मजुरांचा देखील सरकारने लवकर विचार करून योग्य पाऊले उचलणे गरजेचे होते. आता प्रश्न उपस्थित होतो, सर्व चूक ही सरकारचीच का? तर याचे उत्तर आहे, नाही.
कोरोना रुग्णांची संख्या वाढायला मुंबईकरही तितकाच जबाबदार आहे. अजूनही आपण पाहू शकतो, लोकांची गर्दी तसेच कोरोनाचे नसलेले काही प्रमाणात गांभीर्य. सोमवारपासून सुरू झालेला पहिला अनलॉक हादेखील तितकाच जबाबदार आहेच. सुरुवातीला अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर दुकानात एक प्रमाणात गर्दी जमायची. यामधून सरार्स कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. सरकारने दिलेल्या अटी शर्थीचे पालन हे काटेकोरपणे करताना दिसले नाही. तसेच आपल्या आरोग्य सेवेत, कोरोना टेस्टिंगचा रिपोर्ट येण्यास विलंब होत असतो. यामुळे देखील कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे. क्लोज कॉन्टॅक्ट विचारात घेऊन त्यांना विलीगिकरण कक्षात ठेवले जाते. कोरोना उपचारासाठी मुंबईत कमी हॉस्पिटल उपलब्ध आहेत, ज्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. अनेक खाजगी दवाखाने कोरोना रुग्णांना उपचारासाठी नाकारत आहेत. सध्या, रुग्णांच्या उपचारासाठी हॉस्पिटल, कोरोना टेस्टिंग, बेड्स यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तरीही मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही.
याव्यतिरिक्तही तुमचं काही मत असेल, तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच आपल्या तसेच आमचा लेख कसा वाटला, हे आम्हाला नक्की कळवा.

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments