आपलं शहर

हॉटेल्स सुरू झालेत; ‘या’ दहा गोष्टी असतील तरच तिथे प्रवेश करा…

8 जूनपासून सगळीकडे अनेक गोष्टी नियम व अटींच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत, त्यामुळे अनेक लोकांना स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे, जेणेकरून बाहेर फिरताना कोणाच्या संपर्कात येणार नाही किंवा दुसऱ्यामुळे आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही. सध्या हॉटेल्सदेखील सुरू झाल्यामुळे आता मोठी खबरदारी घेणे गरजेचे आहे, कारण या ठिकाणी अन्नाच्या माध्यमातून संक्रमण होण्याचं प्रमाण जास्तच आहे.
सरकारने हॉटेलधारकांसाठी काही नियम व अटी घालून दिल्या आहेत, ज्यांचं त्यांना पालन करावं लागणार आहे, त्याचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करूयात.
●हॉटेलच्या एकूण क्षमतेच्या निम्मे कस्टमर्स आणि त्यांना सेवा पुरवण्यासाठी निम्म्याहून कमी कामगार त्या हॉटेलमध्ये असावेत.
● हॉटेलमध्ये कस्टमर्स प्रवेश करताना थर्मल चेकिंग होणे गरजेचे आहे. तसेच हँड सॅनिटायझर ठेवणे, गरजेचे. त्यातच कोणी संशयास्पद वाटत असेल, तर त्याला प्रवेश नाकारून लवकरात लवकर डॉक्टरांना कळवणे, गरजेचे आहे.
● हॉटेलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर मास्क, चेहऱ्यावर प्लास्टिक शिल्ड आणि हातात मोजे असणे बंधणकारक असणार आहे.
● जर एखादे पार्सल खाद्य पुरवणारे हॉटेल्स असेल, तर थेट ग्राहकाच्या हातात पॅकिंग केलेले पदार्थ न देता, एखाद्या टेबलावर ठेवावेत.
● तपसणी झालेला किंवा रोज थर्मल चेकिंग होत असलेल्या कामगारांना होम डिलिव्हरीसाठी पाठवावे, यामध्ये कोणी संशयास्पद अढळला, तर ग्राहकाला तक्रार करण्याचे अधिकार आहेत.
●हॉटेलमध्ये सेवा पुरवणाऱ्या सगळ्या स्टाफला कोणताही आजार नसला पाहिजे.
● हॉटेल्समध्ये कोरोना संदर्भातील जनजागृती करणारी टिव्ही अथवा स्क्रिन लावावी, जेणेकरून ग्राहकांना त्याबद्दली माहिती होईल.
● जितकं होईल तितकं, हॉटेल्समध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणे खूप गरजेचे.
● हॉटेलमधले असे कर्मजारी, ज्यांचं वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे अशांना, गर्भवती महिला, आजारी लोक, किंवा ज्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी इलाज सुरू आहे, अशांना जमत असल्यास वर्क फ्रॉम होम किंवा अशांना ग्राहकांपासून दुर ठेवणे, अवश्यक आहे.
●जमल्यास अनेक हॉटेल्सधारकांनी व्हायोलेट पार्किंगचा पर्याय काही दिवस टाळावा,
● पार्सलसाठी रांग लागत असेल, तर योग्यरित्या सोशल डिस्टंसिंग पाळण्याची जबाबदारी हॉटेल मालकाची असेल,
●सोशल डिस्टंसिंगचे पालन होत असेल तर बफर सिस्टम चालू करण्यास कोणतीच हरकत नाही,
● ऑर्डर घेत असताना किंवा बील पेड करत असताना काँटॅक्टलेस किंवा डिजीटली पर्यायांना निवडा.
 
कोरोनाचे संक्रमण वाढत असतानादेखील काही व्यवहार सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कारण एकच की राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित करण्यासाठी, या सगळ्यात तुमचा बळी जाऊ नये, इतकच. हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा, अशा अनेख लेखांसाठी वंटास मुंबईला भेट द्या.
हेही वाचाच…
 
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments