फेमस

‘हिंदुस्थानी भाऊ’बद्दल या गोष्टी माहित आहेत का; हा तर मुंबईतच…

प्रसिद्धी हा एक प्रत्येक माणसाच्या जीवनातला आवडता भाग असतो. काही लोक आपल्या कलाशैलीमुळे प्रसिद्ध होतात तर काही आपले वेगळेपण सादर करून जगप्रसिध्द बनतात.
वंटास मुंबई आपल्यासाठी अनेक रिपोर्ट्स तसेच मुंबईत होणाऱ्या अनेक घडामोडींबद्दल माहिती देत असते. परंतु, आज वंटास मुंबई आपल्यासाठी काहीशी वेगळी खबर घेऊन आली आहे. ती म्हणजे, इंटरनेटच्या जगात एक वेगळा आणि प्रसिद्ध चेहरा असलेल्या “हिंदुस्थानी भाऊ” यांची खास ओळख आणि त्यांचा काहीसा जीवन प्रवास आज आपण या विशेष खबरमध्ये पाहाणार आहोत.
कोण आहे हिंदुस्तानी भाऊ
टिकटॉक, यूट्युब, इंस्टाग्राम, फेसबुकवरती लाखो फॉलोअर्स असणारा, आपल्या वेगळ्या आणि अनोख्या शैलीत आपले काम करणारा परिचित चेहरा म्हणजे “हिंदुस्थानी भाऊ”. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची आपल्या शैलीत फिरकी घेण्यासाठी तो फेमस आहे. हिंदुस्थानी भाऊचे मूळ नाव विकास जयराम पाठक हे आहे. तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल; पण हिंदुस्थानी भाऊ हा एक मुंबईकर आहे, शिवाय त्याचा जन्मदेखील मुंबईत झाला आहे. गरीब कुटुंब, लहान वयात घराची जबाबदारी असा सगळा त्याचा आतापर्यंतचा जीवनप्रवास आहे.
आता एक साधा गरीब घरातील विकास पाठक कसा बनला हिंदुस्थानी भाऊ असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, चला तर मग पाहुयात विकास पाठक ते हिंदुस्थान भाऊपर्यंतचा प्रवास.
2019 साली झालेला पुलवामा आतंकी हल्ला आपल्या लक्षात असेलच, याच पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी अनेक लोकांच्या प्रतिक्रिया उमटल्या, याच भारताविषयी वाईट बोलणाऱ्यांवर हिंदुस्थानी भाऊने एक व्हिडीओ बनवला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि याच व्हिडीओनंतर विकासचं नामकरण ‘हिंदुस्थानी भाऊ’ असे झाले. तेव्हापासून नेटकऱ्यांनी हिंदुस्थानी भाऊला उचलून धरले. बिग बॉस-13 या सीझनमध्ये देखील बेधडक स्वभाव आणि बिनधास्त बोलण्याच्या शैलीमुळे तो सहस्पर्धकांच्याही चांगलाच पसंतीस उतरला होता. खरे तर ‘बिग बॉस’नंतर हिंदुस्थानी भाऊला सर्वात जास्त फेम मिळाली.
हिंदुस्तानी भाऊचा खडतर जीवनप्रवास
मराठमोळा मुंबईकर असलेला विकास पाठक लहान वयातच आर्थिक परिस्थितीमुळे जबाबदार बनला होता. लहान वयातच त्याच्यावर घरची जबाबदारी पडली. शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचे शिक्षण सातवीपर्यंतच होऊ शकले. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कमी वयात त्याने काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्याने खार जिमखान्यात 20 रुपये प्रतिदिन म्हणून बॉलबॉयची पहिली नोकरी केली. पुढे जाऊन चायनीजच्या गाडीवर काम केले आणि कालांतराने बारमध्ये वेटर म्हणून काम केले. मेहनतीच्या बाबतीत तगडा असलेल्या विकासने लोकलमध्ये आणि दारोदार जाऊन अगरबत्त्याही विकल्या. 2019 मध्ये आपल्या व्हिडीओद्वारा प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पैसे कमावतो.
सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊ आपल्या व्हिडीओ सोबत लोकांमार्फत तयार करण्यात आलेल्या मीमच्या माध्यमातून तो आणखी प्रसिद्ध झाला. मीमच्या जगातही ‘हिंदुस्थानी भाऊ’ला  खूप पसंती दिली जाते.
सध्या ‘या’ कारणामुळे आहे हिंदुस्थानी भाऊ चर्चेत
नुकतेच एका चर्चेत निर्माती आणि दिग्दर्शक एकता कपूर हिच्या भारतीय लष्कराच्या वादग्रस्त विधानावर हिंदुस्थानी भाऊने आवाज उठवल्यावर गेल्या काही दिवसांपासून तो चर्चेचा विषय बनला आहे. एकता कपूरच्या ‘XXX2’ वेबसीरिजमध्ये भारतीय लष्कराचा अपमान केल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊने या विषयावर सतत व्हिडिओ शेअर केले होते.
एकता कपूरने भारतीय लष्कराची माफी मागावी अशी मागणी त्याने त्याच्या व्हिडिओद्वारे केली होती. सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलेच तापले असून हिंदुस्थानी भाऊच्या फॉलोअर्सने देखील याला चांगलाच पाठींबा दर्शवला. अधिकृतरित्या यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून पुढे जाऊन त्याने खार पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती.
अशा वंटास मुंबईमध्ये राहाणाऱ्या वंटास लोकांविषयी माहिती करून घ्यायची असेल, तर आमचे लेख वाटत राहा आणि आमच्या सोशल मिडीयाल फॉलो करत राहा.
हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments