आपलं शहर

कोरोना चाचण्यांच्या बाबतीत दिल्लीपेक्षा मुंबई परवडली; कशी? ते पाहा…

कोरोना टेस्टिंग प्रकरणात मुंबईच्या तुलनेत दिल्लीची परिस्थिती मोठी दयनिय झाल्याचे म्हटले जाते आणि आकडेवारीतून तशाच प्रकारचे संकेत दिसत असतात.
शुक्रवारी कोरोना व्हायरस प्रकरणावर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले आहे. कोरोनाचे वाढते संकट असूनही दिल्लीत चाचणी कमी करण्यात आली असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. संपुर्ण दिल्लीभरात दररोज सुमारे पाच हजार चाचण्या केल्या जातात. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई आणि चेन्नईसारख्या शहरांचे उदाहरणही दिले आहे.
अशा परिस्थितीत जर आपण दिल्ली आणि मुंबईतील चाचण्यांमध्ये तुलना केली त्यातून समोर आलेली एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर मुंबईच पुढे असल्याचे दिसून येते. जर आपण राज्यांच्या आधारे तुलना केली तर महाराष्ट्र दिल्लीपेक्षा टेस्टिंगच्या बाबतीत खूप पुढे आहे. दिल्ली राज्यात दररोज 5500 च्या आसपास चाचण्या केल्या जातात, पण महाराष्ट्रात जवळपास त्याहून अधीक चाचण्या होत असल्याची माहिती समोर आली आहे.
काय सांगतो दिल्लीतल्या चाचण्यांचा आकडा? (11 जूनपर्यंत)
गुरुवारी दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या वैद्यकीय आकडेवारीनुसार 11 जूनपर्यंत दिल्लीत एकूण 2,71,516 चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत दिल्लीत जवळपास 5300 चाचण्या झाल्या. आतापर्यंत दिल्लीची एकूण आकडेवारी पाहिल्यास दिल्लीमध्ये एकूण टेस्टिंगपैकी 34687 जणांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे पाहायला मिळते. तर आतापर्यंत 1085 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही वृत्त समोर येत आहे. दिल्लीमध्ये 11 जूनपर्यंत 12,731 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर इतर 20, 871 जणांवर सध्या उपचार सुरू आहे.
काय आहे, मुंबईची परिस्थिती? (11 जूनपर्यंत)
मुंबईतील आकडेवारी बीएमसीकडून दररोज जाहीर केली जाते, त्यानुसार ११ जूनपर्यंत मुंबईत (MMR) अडीच लाखांपर्यंत चाचण्या पुर्ण करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त मुंबईत दररोज 4 ते 5 हजार चाचण्या केल्या जात असल्याचे म्हटले जात आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आकडेवारी एकट्या एमएमआर प्रदेश म्हणजेच मुंबई शहराची आहे, जी पुर्णरित्या दिल्ली राज्याच्या आसपास आहे, त्यामुळे कोरोना संक्रमणाच्या बाबतीत दिल्लीपेक्षा मुंबई परवडली, हे नक्की.

 

मुंबईत सध्या जरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी ती इथले टेस्टिंगचे प्रमाण वाढल्यामुळे आहे, हे नक्की. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशा अनेक वंटास लेखांसाठी आमच्या वंटास मुंबईच्या सोशल मीडियाला नक्की भेट द्या…

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments