फेमस

लॉकडाऊनमध्ये भाकरीचं काम करणाऱ्या पार्लेनं फक्त एका गोष्टीमुळे कमवला नफा…

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या अधिकाधिक वाढत आहे. या आजारपुढे संपूर्ण जगाने हातपाय टेकले आहेत, अमेरिकेसारखा बलाढ्य देशदेखील या महामारीपासून वाचलेला नाही. 
भारतात जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला, त्याच्या काही दिवसानंतर महाराष्ट्रातून परप्रांतीय मजूर हे आपल्या राज्यात मिळेल त्या साधनाने जाऊ लागले. इतकच काय, तर देशात अनेक कामगारांचं स्थलांतर सुरू झालं.
काही लोक चालत तर काहीजण कोणाच्या ना कोणाच्या मदतीने आपल्या घरट्यात जाण्यास सुरू झाले, पण या काळात काही जणांकडे पैशाची चुन-चुन असल्यामुळे जाताना खाण्याची व्यवस्था होणे, अवघड होते. शेकडो किलोमीटर चालल्यावर लहान मुलांसह मोठ्यांची भूकदेखील या बिस्किटने भागवली. या काळात कामगारांना पार्ले-जी बिस्किटने तारले, असच म्हणावं लागेल.
संस्था व मदत करणार्यांनीदेखील पार्ले-जी बिस्किटांचे वाटत करत, अनेकांच्या जगण्याचा आधार बनणअयाचं काम केलं. तर लॉकडाऊनमध्ये असणाऱ्या मध्यम वर्गीयांनीदेखील आपल्या घरी पार्लेजीचे पुडे ठेवण्यास सुरूवात केली. कारण लॉकडाऊन केव्हा संपेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. साहजिकच याचा परिणाम आकड्यांमध्ये दिसला.
1938 साली सुरू झालेली ही कंपनी भारताच्या घरा घरात ओळखली जाते. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये पार्ले-जीने एक नवीन विक्रम केला. इकॉनॉमिक टाइम्सच्या आकडेवारीनुसार पार्ले-जीने विक्रीचे आकडे अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरी पार्ले-जीचे विक्रीच्या बाबतीत मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात मागील 80 वर्षातील उत्पादन मोठं आहे, हे नक्की.
दरवर्षीपेक्षा एकूण बाजारापैकी यावर्षी  पाच टक्के अधिक नफा झाला आहे. यामध्ये 80 ते 90 टक्के वाटा पार्ले-जी बिस्किटाचा आहे. लॉकडाऊन लागले तरी पार्लेने आपले काम सुरूच ठेवले होते. कंपनीतील कर्मचार्यांची ने-आन करण्याची जबाबदारी कम्पनीने पार पाडली. जेव्हा कारखाने पूर्ण चालू झाले, तेव्हा कंपनीने ज्या वस्तूची विक्री जास्त झाली, त्या वस्तूकडे जास्त लक्ष दिले.
लॉकडाऊनमध्ये पार्ले-जी हे लोकांसाठी भूक भागवण्याचं साधन होतं. हे सामान्य जनतेचे बिस्किट आहे, हे अनेकांना समजून चुकलं होतं. जे लोक महागाच्या वस्तू घेत नाहीत, ते पार्लेला पसंती देतात. लॉकडाऊनच्या काळात 80 टक्के नफा हेच दाखवतो. जेव्हा बाजारात कमी उत्पादन होते, तेव्हा लोकांनी स्वस्त आणि उपलब्ध असलेल्या वस्तू खरेदी केल्या. पार्लेजीच वितरण मूल्य कमी आहे, पण मागणी आणि वितरण खूप मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे हा नफा कमवणे कदाचित शक्य झालं, असचं म्हणावं लागेल.
पार्ले-जीने आपल्या किंमतीत मोठ्याप्रमाणात कधीच वाढ केली नव्हती, त्यांची तत्व आणि त्यांनी आतापर्यंत राखुन ठेवलेली विश्वासार्ता याचचं फळ आज त्यांना मिळालं, असं म्हणावं लागेल. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशा वंटास लेखांसाठी आमच्या सोशल मिडियाशी कनेक्ट राहा.

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments