कारण

कोरोनाच्या महामारीचं संकट; पावसासाठी मुंबई किती सज्ज?

पाऊस म्हटलं की मुंबईकरांना आठवण येते ती म्हणजे 26 जुलै 2005 ची; पुराचे थैमान आणि बरच काही.
‘पावसाळा आणि मुंबई’ हे एक अतूट नातं आहे. पावसाळा आला की मुंबईकर बीचवर जाऊन पावसाचा मनमुराद आनंद घेत असतात. तसा पाऊस मुंबईसाठी नवीन नाही. मुंबईत पाऊस दरवर्षी पडतो, अगदी लोकांना झोडपून काढतो, यात मुंबईकर आपला जीव मुठीत घेऊन जगत असतात. मुंबईत पाणी भरतं, केव्हातरी लाईफलाईन बंद होते, हे दरवर्षीच चित्र असतं, परंतु या वर्षी कोरोनाचे संकट अजूनही आपल्या मायानगरीत घट्ट पाय रोवून उभं आहे. यामध्येच गुरुवारी पावसाने मुंबईत हजेरी लावली. त्यामुळे पावसाळ्यात कोरोनाचा संकट उभच आहे. त्यामुळे कोरोनासोबत पावसाळ्यातील आजारांशी लढण्यासाठी मुंबईकर, महापालिका आणि राज्य सरकार सज्ज आहे का? हे पाहाण्याचा या लेखातून आपण प्रयत्न करणार आहोत.
मुंबईतील नाले सफाई
मुंबईतील नाले सफाईचे काम केवळ 40 टक्केच झाले आहे, असा दावा मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईतील साचलेलं पाणी हे मिठी नदी आणि दहिसर नदी यामध्ये सोडलं जात; त्यामुळे यांची साफसफाई करणं गरजेचं असतं. साधारणपणे ‘एप्रिल किंवा मे’मध्ये नाले सफाईच काम सुरू होतं; पण यावर्षी मार्चमध्ये कोरोनाच संकट असल्यामुळे हे काम लांबणीवर पडलं आणि काहीसं धिम्या गतीने सुरू झाले.
मोठे नाले व्यवस्थितरित्या साफ केले जातात, परंतु झोपडपट्टी भागातील गटारे पावसाळ्यात तुंबण्याचे प्रमाण अधिक असते. यावर्षी कोरोना असल्यामुळे या संकटाला अधिक सामोरे जावे लागणार आहे. मुंबईतील नेमकी किती सफसफाईची कामे केली, याची आकडेवारी महापालिकेने सादर केली नाही. परंतु पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे जवळची गटारे नाले सफाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेत करण्याचे आदेश दिले होते. तसेच पावसाच्या पाण्याचे पंप 25 मेपर्यंत बसवावेत, असे आदेश दिले होते, त्यांचं काम पूर्ण झालं असल्याचं आयुक्तांनी सांगीतलं आहे.
नाले सफाई सोबत झाडांची छाटणी आणि रस्त्यांची दुरुस्ती ही कामही नियमित सुरू आहेत असं पालिकेच म्हणणं आहे. पण निसर्ग चक्री वादळामुळे मुंबईत अनेक झाड कोलमडून पडली होती. लॉकडाऊनच्या काळात कीटकनाशक विभागातील दीड हजार महापालिका कर्मचारी कामगार व अधिकारी सर्वोक्षण करत आहेत, असं महापालिकेच म्हणणं आहे. पण “आपल्या आजूबाजूला कुठेही पाणी साचणार नाही, याची काळजी आपण स्वतः घ्या” अस आवाहन पालिकेने केलेलं आहे.
मुंबईतील रुग्णालये आणि आरोग्य सुविधा
पावसाळ्यात पूर आला किंवा पाऊस जास्त झाला, तर त्याचा परिणाम हा मुंबईच्या लोकांवर होत असतो. कोरोनासाठी मुंबईत अनेक तात्पुरती रुग्णालयेदेखील उभारलेली आहेत. परळचे के.इ.एम आणि सायनचे लोकमान्य टिळक हॉस्पिटल ही महापालिकेची दोन मुंबईतील मुख्य हॉस्पिटल आहेत. इथे सध्या कोरोनासोबत अनेक आजारांचे रुग्णदेखील आहेत. गेल्या काही वर्षात या रुग्णालयांमध्ये पाणी गळती झाली किंवा हॉस्पिटलच्या परिसरात पाणी साचलेलं पाहायला मिळत होतं. यावर्षी कोरोना आहे आणि इतर पावसाळी आजार देखील आहेत त्यामुळे या सर्वांची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे.
कोरोना संकटासोबत पावसाळ्यात मुंबईत अनेक साथीच्या रोगांची चिंता मुंबईला असणार आहे. मुंबईत पावसाळ्यात डेंगू, मलेरिया, कावीळ असे अनेक आजारांनी मुंबईकर त्रस्त असतात. कोरोनावर सर्वांचे लक्ष आहे त्यामुळे अशा रोगांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मुंबईत पावसामुळे सायन, दादर, परेल अशा अनेक ठिकाणी पाणी साचत असत. या साचलेल्या पाण्यामुळे डेंगू, मलेरिया, कावीळ यासारखे आजार फैलण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून चालू नका तसेच अस झाल्यास घरी जाऊन स्वच्छ पाण्याने अंघोळ करा. आपल्या आजूबाजूला परिसरात घरात कुठेही पावसाचे पाणी साचू देऊ नका, तसेच शक्यतो पाणी उकळून प्या. यामुळे पावसाळ्यातील आजारांवर आपण मात करू शकतो. असे न केल्यास कोरोनाच्या महामारिसोबत हे नवे आरोग्य संकट आपल्या मुंबईवर ओढवेल.
IMG 20200613 WA0013

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments