आपलं शहर

लोकलबद्दल ‘या’ गोष्टी मिस करत नसाल, तर कधी तुम्ही लोकलमध्ये बसलाच नाही…

“पुढील स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडीचे पायदान व फलाटावरील अंतर याकडे लक्ष द्या” हा आवाज मुंबईकर कोरोनाच्या काळात नक्कीच मिस करत असतील.
कोरोनामुळे संपूर्ण भारत लॉकडाऊनच्या सावलीत आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल बंद आहे. मुंबईची लोकल बंद म्हणजे मुंबई बंद हा समज संपूर्ण मुंबईकरांचा असतो. जरी रविवारी दुरुस्तीसाठी मुंबईची रेल्वे बंद असेल तर मुंबईकरांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. लॉकडाऊनमुळे लाईफलाईन बंद असल्यामुळे मुंबईकर नक्कीच आपल्या मुंबई रेल्वेला मिस करत असतील. लोकलमधील किस्से असो अथवा उभ्याने प्रवास, हा प्रत्येक मुंबईकरांची दररोजची लस असते. लोकल विषयी जास्तीत जास्त जणांना कुतूहल वाटतं की एवढे प्रवासी येतात तरी कुटून? असेच काही लोकलविषयी विनोद मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यापैकीच काही हटके फॅक्टस आपण पाहणार आहोत.
 
१. स्वित्झर्लंडच्या लोकसंख्येएवढे लोकलचे प्रवासी
स्वित्झर्लंडच्या लोकसंख्येएवढे मुंबईतल्या लोकलचे प्रवासी आहेत. रोज लोकलमधून 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात अशी आकडेवारी सांगते. आश्चर्य म्हणजे स्वित्झर्लंडची लोकसंख्यादेखील याच्या आसपास आहे. म्हणजे स्वित्झर्लंड देश आपल्या लोकलमध्ये राहू शकतो.
२. फोर्थ सीट्ससाठी अट्टहास
आपल्या मुंबई लोकलमध्ये अनेक अलिखीत नियम आहेत, ते मुंबईकरांना पाळावे लागतात त्या पैकी एक म्हणजे फोर्थ सीट्स. ट्रेनमध्ये फोर्थ सीट न दिल्यास भांडण काढणे आणि हे भांडण अगदी विकोपाला जाऊन हाणामारी करणे, हे लोकल मुंबईकरांचं रोजचच.
३. चालत्या ट्रेनमधून उतरणं अथवा चढणं
‘चालत्या लोकलमधून चढू अथवा उतरू नये’ अशी सूचना नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून केली जाते. पण खरतर चालत्या लोकलमधून चढलं अगर उतरलं नाही तर आपण मुंबई लोकल मधून प्रवासच केला नाही असं काहींना वाटतं.
४. फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेन यामधला फरक काय?
मुंबईत आलेल्या नव्या प्रवाशाचा पहिला प्रश्न असतो की फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेन यामधला फरक काय, त्याचं उत्तर त्याला मिळालं की त्यानंतर त्याची कसरत सुरू होते, ती म्हणजे फास्ट लोकल ट्रेन नेमक्या कोणत्या स्टेशनवर थांबतात. हे जाणून घेण्याची.  काही स्थानक वगळता महत्वाची स्थानकं घेत जाणारी ट्रेन केव्हाच वेळेवर आपल्या स्थानकावर पोहचत नाही, हेदेखील त्या नव्या प्रवाशांना लगेच कळतं.
५. दरवाज्यात उभे राहणे 
संपूर्ण ट्रेन खचाखच भरलेली असो वा नसो; पण लोक दरवाज्यात उभं राहायला अगदी अट्टहास करत असतात. या दरवाज्यात जागा नसली तरी जागा करून दरवाज्यात उभे असतात. थोड्याशा जागेत उभं राहणारे प्रवासी आयुष्यात मोठी मजल मारणार, असे अनेक जोक सोशल मीडियावर व्हायरल होतात.
६. मोकळी ट्रेन स्वर्गाचा अनुभव
सरकारी सुट्टीच्या दिवशी ट्रेनमधून जाणारे अनेक लोक आपल्याला नशीबवान समजतात. मोकळी ट्रेन, धक्का बुक्की नाही, कोणतीही समस्या नाही हे दृश्य अगदी स्वर्गाहुन कमी नाही, असं मुंबईकर म्हणतात.
७. लोकलमधील सण आणि उत्सव
एखाद्या सणाला महिला जशा आपलं घर सजवतात, त्याप्रकारे ट्रेन सजवुन अनेक मुंबईकर आनंद साजरा करत असतात. दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, अशा सणांना तर फुलांनी गाडी व आपला नेहमीचा डबा सजवून एकमेकांना शुभेच्छा देतात.
सध्या जरी अत्यावश्यक सुविधेतील लोकांसाठी ट्रेन सुरू झाल्या असल्या तरीमात्र हे सगळं मिस करणारे लोक अजूनही बसने आणि टॅक्सीने प्रवास करत आहेत. मुंबईवर असलेलं कोरोनाचं सावट लवकर दूर व्हावं आणि सगळ्यांना त्याच आपल्या लाडक्या लोकलचा प्रवास अनुभवायला मिळावा, इतकीच काय ती वंटास टीमची अपेक्षा.
IMG 20200613 WA0013

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments