कारण

पावसाळा येतोय, त्यामुळे ‘हे’ घरगुती उपाय जरा लवकर तयार ठेवा…

[et_pb_section admin_label=”section”] [et_pb_row admin_label=”row”] [et_pb_column type=”4_4″][et_pb_text admin_label=”Text”]
20200616 171126
कोरोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या स्पर्धेमध्ये भारताला जिंकायचं नाही अशा स्पर्धेत भारत म्हणजेच कोरोना रुग्णांच्या संख्येत चौथ्या स्थानी येऊन पोहोचला आहे. यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. पावसाळ्यात डेंगू, मलेरिया, टायफॉईड आणि श्वसनासंबंधी तक्रारी वाढतात
लहानापासून थोरांपर्यंत सर्वच जण पावसात भिजण्यास आतुर असतात. पावसाने हजेरी लावली की सगळ्यांच्या आनंदाला उधानच येते. या पावसात भिजल्यानंतर कितीही मज्जा आली तरी नंतर आजार होण्याची भीती असते. 
पावसाळ्यात आजारी न पडण्यासाठी हे पदार्थ उपयोगी 
दालचिनी
पावसात होणाऱ्या आजारांसाठी दालचिनी हा एक उत्तम पर्याय आहे. एक पाण्याच्या ग्लासमध्ये अर्धा चमचा वाटलेली दालचिनी किंवा दालचिनी पावडर आणि मध मिक्स करून दिवसातून दोन वेळा पिल्याने पावसातून आजारी पडण्याचा धोखा कमी असतो.
कडुलिंब
पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन झाल्यास कडूलिंबाची दहा ते बारा पाने उखळून घ्या. याचे दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोखा कमी होतो. 
तुळस
तुळस ही अनेक कारणांसाठी गुणकारी आहे. हिंदू धर्मामध्ये देखील तुळशीचे महत्व अधिक आहे. अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणांमुळे ताप किंवा मलेरिया यासारख्या आजारांपासून बचाव करता येतो. त्यामुळे चहामध्ये काही तुळशीची पाने घातल्यास आराम मिळतो.
मध
खोकला अथवा कफ झाला असल्यास एक चमचा गरम पाण्यात मध घेऊन पिल्यास सर्दी खोकला यापासून आराम मिळतो. जास्त खोकला असल्यास हळद आणि दूध अथवा गरम पाणी मिक्स करून पिल्यास आराम मिळतो. 
लसूण
लसूनमध्ये अँटीबॅक्टेरियलचे गुण असतात. तीन ते चार लसणाच्या पाखळ्या वाटून घेतल्यास किंवा कच्च्या खाल्यास थंडी तापापासून बचाव करता येतो. 
ग्रीन टी
पावसाळा आणि चहा यांचं एक अतूट नात आहे. पावसाळ्यात चहा मोठ्या प्रमाणात पिला जातो. पण ग्रीन टी ही पावसाळ्यात खूपच फायदेशीर ठरते. ग्रीन टी दिवसातून दोन वेळा पिल्यास सर्दी किंवा घसा दुखीपासून आराम मिळतो. 
डेंगू मलेरिया यासारख्या पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आपले स्वतःचे घर व आजूबाजूचा परिसर प्रथमतः स्वच्छ ठेवावा. आपल्या घराच्या आसपास पाणी साठू नये, याची खबरदारी मुख्यता प्रत्येकाने घेतली पाहिजे.
IMG 20200613 WA0013

 
[/et_pb_text][/et_pb_column] [/et_pb_row] [/et_pb_section]

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments