आपलं शहर

…म्हणून कोरोनाचं लक्ष औद्योगिक वसाहतीच्या शहरांकडे आहे

psudo B3kCZp8p Ez
भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक अॅड. गिरीश राऊत यांनी महाराष्ट्र तसचे देश आणि जगाच्या पाठीवर औद्योगिक वसाहतीच्या शहरांमध्येच कोरोनाचं प्रमाण जास्त का, यावर लिहलेला हा लेख आहे.
प्राणवायुची कमी, मोटार, उद्योग व बांधकामांच्या प्रदूषणाने खराब झालेली फुफ्फुसे व श्वसनमार्ग, यामुळे औद्योगिक शहरे कोरोना विषाणुची लक्ष्य झाली. मे २०१५ मधे आलेल्या जागतिक हवामान संघटनेच्या अहवालाप्रमाणे पृथ्वीवर सर्वत्र ४०० पीपीएम ही धोकादायक पातळी कार्बन डायऑक्साईड वायुने ओलांडली. उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत गेल्या २५० वर्षांत या वायुच्या प्रमाणात सुमारे ४३% ने वाढ झाली. आता ४६% ने वाढ झाली आहे.
माणसं समजत आहेत की, आपण प्रगतीच्या वाटेवर आहोत, परंतु प्रत्यक्षात, काळाचे चक्र वेगाने उलट फिरवले गेले आहे. आपण करोडो वर्षे मागे जात आहोत. त्या काळातील विषाणु बाहेर येत आहेत. जनुकीय प्रयोगाने देखील प्राणवायु कमी असलेल्या स्थितीतील विषाणु येणार.
माणुस मात्र आपली शरीराची लाखो वर्षांची घडण अचानक बदलू शकत नाही. व्हेंटिलेटर व मास्क हे यावरील खरे उपाय नाहीत. उपाय एकच कार्बन डायऑक्साईड व इतर वायूप्रदूषण ताबडतोब थांबवणे आणि डोंगर जंगलांचा नाश थांबवुन प्राणवायु देणाऱ्या, झाडे, जंगल, नद्या व समुद्रातील  हरितद्रव्याची वाढ विनाअडथळा होऊ देणे, हा एकमेव पर्याय असणार.
या दृष्टीने जगातील सर्व औद्योगिक प्रकल्प थांबवले जावे. मुंबईत मेट्रो-३ भूयारी रेल्वे हा प्रकल्प ३२. २° c तापमानावर बेतला असल्याने ऊच्च तापमानात वीजपुरवठा बंद झाल्यास व इतर कारणांनी शेकडो हजारो माणसांचे बळी घेऊ शकतात. 
लोकांनी जागे व्हावे. १९८०-९० सालापासुन आलेली सुस्ती व मस्ती टाकुन द्यावीH. व्यक्त व्हावे. यात, नेहमी मन व्यापणाऱ्या राजकारणाचा विचार आणू नये.
अॅड. गिरीश राऊत
निमंत्रक, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
9869023127
IMG 20200613 WA0013

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments