कारण

मुंबई सुरू; आता गावाकडचे लोक मुंबईत आणि मुंबईतले लोक बाहेर जाऊ शकतात का?

आजपासून राज्यातल्या अनलॉकची तिसरी फेज सुरू होत आहे. अनेक सुविधा आजपासून सुरू होणार आहेत, तुमची कामं, तसेच अनेक सरकारी कामं, तुम्हाला बाहेर मॉर्निंग वॉकसाठी परवाणगी मिळणार आहे. 
तुम्ही मुंबईत कुठेही तुमच्या कामानिमित्त फिरु शकणार आहात. मुंबईतल्या मुंबईत बेस्ट तर मुंबई उपनगरातून मुंबईत येण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या बसेस असणार आहेत. अजून खूप सुविधा तुमच्या सेवेसाठी असतील. यात एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे तुम्ही मुंबईतून शहराबाहेर जाऊ शकता का किंवा बाहेरून मुंबईत येऊ शकता का?
मुंबईत अनेक गोष्टी सुरू झाल्या असल्या तरी एक गोष्ट लक्षात असू द्या की, हे सगळे इथली आर्थिक परिस्थिती सुरळीत करण्यासाठी चाललेले प्रयत्न आहेत. मुंबई आणि ठाणे सारखी शहरं कालही रेड झोनमध्ये होती आणि आजही रेड झोनमध्येच आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्यांसाठी, घराबाहेर फिरणाऱ्यांसाठी, कामावर जाणाऱ्यांसाठी किंवा या शहरातून बाहेर जाणार्यांसाठी कोरोना संक्रमणाचा धोका कायम आहेच.
जर तुम्ही मुंबईतून गावी जात असाल तर?
तुम्ही जर मुंबईत अडकून असाल तर तुम्ही तुमच्या परिसरातल्या पोलिसांची परवाणगी घेऊन तुमच्या गावी जाऊ शकता, ही पध्दत याआधीपासूनही सुरू आहे. मात्र तुम्हाला तुमच्या गावी जाण्यासाठी कोणतीही सरकारी यंत्रणा मदत करणार नाही (सध्यातरी), ती सुविधा तुमची तुम्हालाच उभी करावी लागणार आहे. तुम्ही इथल्या इ-पाससाठी अप्लाय करू शकता, त्यासाठी आधी तुम्हाला तुमचं वाहन नोंद करावं लागेल, काही दिवसात तुम्ही जर मुंबईतल्या रेड झोनमध्ये नसाल तर मग तुम्हाला परवाणगी मिळू शकते.
गावी गेल्यानंतर तुम्ही संशयित वाटत असाल तर तुमची चाचणी होईल, रिपोर्ट येईपर्यंत तुम्हाला शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये राहावं लागेल. जर तुम्ही ठिकठाक दिसत असाल तर तुमच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाईल आणि तुम्हाला जबरदस्तीने पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहाण्यास सांगितलं जाईल.
जर तुम्ही गावाकडून मुंबईत येत असाल तर?
तुम्ही जर गावी अडकून आहात, तुम्हाला मुंबईत यायचं आहे, तर तुम्ही तुमच्या ग्राम पंचायत / तलाठीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज करू शकता, त्यांच्याकडून काही दिवसांमध्ये उत्तर येईल, त्यानंतर तुम्ही नोंद केलेलं वाहन घेऊन मुंबईला रवाणा होऊ शकता.
ओडिसा, दिल्ली, चेन्नई, बेंगलुरू अशा ठिकाणांहून अनेक लोक मुंबईत आले आहेत, तर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना मुंबईकडे रवाणा होण्यासाठी अध्याप कोणतीही परवाणगी मिळत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागातून मुंबईत येण्यासाठी अजून कोणताही निर्णय सरकारने घोषित केला नाही.
परराज्यातील लोक, जे फक्त विमानाच्या माध्यमातून मुंबईत येत आहेत, त्यापैकी ज्यांना लक्षणे नाहीत, अशांना जबरदस्तीने होम क्वारंटाईन राहाण्यास सांगण्यात येत आहे. राज्यातून राज्याबाहेर जाण्यास शासनाकडून लोकांसाठी अनेक सुविधा राबवल्या गेल्या, मात्र राज्यातल्या राज्यात अशा सुविधा अजून का नाही, असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत,  यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या लाईव्हच्या माध्यमातून ‘तुम्ही माझी माणसं आहात, त्यामुळे तुमच्यासाठीही मी प्रयत्न करत आहे, असं म्हटलं होतं.

हेही वाचाच…
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments