कारण

लॉकडाऊन नसताना जपानने केली कोरोनावर मात! भारताने काय शिकावं?

आतापर्यंत भारतात कोरोना संक्रमणाचे एकूण 1.75 लाख रुग्ण आढळले आहेत आणि जवळपास पाच हजारहून अधीक लोकांचा मृत्यू झाला आहे. 24 मार्चपासून भारतात लॉकडाऊन सुरू आहे. परंतु जसजसा लॉकडाऊन वाढत आहे, तसतसा रुग्णांचा आकडादेखील वाढताना दिसत आहे.

 

भारत, यूएसए, रशिया, यूके, चीन, दक्षिण कोरिया यांसारख्या महान राष्ट्रांसोबत अनेक छोट्या राष्ट्रांनीही लॉकडाऊन लागू केला, त्यांच्याजवळ कोरोनाचं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी हाच एकमेव पर्याय होता, मात्र कोरोनाचं महासंकट असूनही जपानने संपूर्ण लॉकडाउन लागू केलाच नाही, नेमकं याचं कारण काय आणि त्यांनी यावर कसं नियंत्रण आणलं, हेच पाहाणे आता गरजेचे असेल.
जपानमध्ये संपुर्ण लॉकडाऊन लावलाच नव्हता, मात्र तिथे अत्यावश्यक सुविधांसोबतच लोकांना घराबाहेर जाण्याची आणि  इतर कामांनादेखील मुभा देण्यात आली होती. तिथल्या स्थानिक राज्यपालांनी व्यवसाय करणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या अेनक लोकांना घरीच राहाण्याचे आवाहन केले होते, मात्र  त्याचे पालन न केल्याबद्दल कोणतीही शिक्षा किंवा दंड तिथल्या लोकांना लागू केला नव्हता. तिथली रुग्णांची आकडेवारी समोर येऊ लागली, तस काही लोकांनी संक्रमणाच्या भितीमुळे घराबाहेर पडणं टाळलं होतच.
जागतिक आरोग्य संघटना आणि सर्व देशांनी संक्रमण टाळण्यासाठी जास्तीत जास्त चाचणी करण्याचा आग्रह धरला. भारतात आणि महाराष्ट्रातही तसच सुरू आहे, मात्र जपानने केवळ त्याच लोकांची चाचणी केली, ज्यांच्यात गंभीर लक्षणे दिसून आली होती. जपानने एकूण लोकसंख्येपैकी केवळ 0.2 टक्के लोकांच्या चाचण्या केल्या.
जपानमध्ये झालेल्या या कमी चाचणीबद्दलही  अनेक प्रश्न सरकारवर उपस्थित करण्यात आले होते, परंतु पंतप्रधान शिंझो आबे यांच्या म्हणण्यानुसार संपर्क ट्रेस करण्याचे त्यांचे धोरण जपानच्या अनेक भागात प्रभावी माध्यम ठरले, ज्यामुळे ज्यांना लागण झाली आहे आणि जे संक्रमणाचा प्रसार करत आहेत, त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊ लागले.
जगामध्ये संक्रमण सुरू झाले त्यावेळी, डायमंड प्रिन्सेस क्रूझ शिपमध्ये देखील कोरोनाचे संक्रमण झाले होते, त्यामुळे जपान सरकारवर टीका करण्यात आल्या होत्या. अनेक अभ्यासकांनी असाही अंदाज लावला होता की इथल्या संसर्गामुळे कोट्यावधी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. परंतु सरकारने त्यांनी ठरवलेल्या धोरणानुसार काम केले आणि कोरोनावर विजय मिळवला. तेव्हा ‘दीड महिने सुरू असलेली जपानची कोरोनाविरुध्दची लढाई संपली,’ अशी घोषणा पंतप्रधान शिंजो आबे यांनी केली.
जपानने नेमकं काय केलं?
●जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जपानमध्ये कोरोना संक्रमणाचे एकुण 16 हजार 716 रुग्ण समोर आले. त्यातील 888 लोकांचा मृत्यू झाला, काहींवर उपचार सुरू आहेत.
●आरोग्य क्रमवारीत जपान दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यातील किमान 26 टक्के लोकसंख्या 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच या वयोगटातील लोकांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका आहे, हे जाणून त्यांची काळजी घेण्यास सुरुवात करण्यात आली.
● जपानमध्ये जरी चाचण्या जास्त झाल्या नसल्या तरी आरोग्य सेवा इतक्या चांगल्या आणि कमी दरात आहेत की थोडीशी समस्या उद्भवल्यास लोक लगेचच डॉक्टरकडे जातात, आपोआप बरं होण्याची कोणतीच वाट पाहात नाहीत.
● कोरोनाच्या संक्रमणात निमोनियाचंही लक्षण महत्वाचं असतं, तो आजार सिटीस्कॅनच्या माध्यमातून ओळखला जातो आणि त्यावर लगेचच इलाज केला जातो.
● मोबाईल अॅपच्या माध्यमातून सामुदायिक संसर्गाचं निधान केलं जातं आणि लगेच त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले जाते आणि उपचार सुरू होतात.
● जपानमध्ये बरेच लोक पहिल्यापासूनच मास्क घालत होते, खासकरून हिवाळ्याच्या दिवसात. त्यामुळे या व्हायरसचा प्रसार जास्तप्रमाणात झाला नाही.
● जपानमधील जवळजवळ 60 टक्के लोक दरवर्षी आरोग्य तपासणी करतात आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करतात.
या सगळ्या मुद्यानुसार याचा अर्थ असा नाही की पुढे कोणताही धोका जपानवर येणार नाही, अजूनदेखील जपानच्या  अनेक रुग्णालयात कोविड -19 चे रुग्ण दाखल आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यामुळे पुर्व तयारी म्हणून जपानच्या अनेक रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा, अशेच अनेक वंटास लेख वाचण्यासाठी आमच्या वंटास मुंबईला नक्की भेट द्या.

हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Unknown

Mast chan