आपलं शहर

सावधान! मुंबई सुरू होतेय; घरातून बाहेर पडण्यासाठी ‘या’ गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे…

काही दिवसांमध्ये लॉकडाऊनच्या आधी जशी मुंबई होती, तशी मुंबई पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहे, तशाप्रकारचे नियमदेखील शिथील केले जात आहेत. त्यासाठी अनलॉक-1 च्या स्वरुपात मिशन बिगिन अगेन नावाची संकल्पना सुरू होत आहे.
या सगळ्यात कोरोनाला विसरुन चालणार नाही, कारण मुंबईत कोरोनाचा प्रसारही पहिल्यासारख्या वेगानेच सुरू आहे. त्यामुळे कोरोनासोबत जगायला आपण सुरू करत आहोत. या सगळ्यात मुंबईचे स्वागत आपल्याला कशाप्रकारे करायचं आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून अनलॉक-1 ची घोषणा केली होती. त्यातून आपण कोरोनासोबत जगण्यास सुरुवात करत आहोत आणि मिशिन बिगीन अगेन काही दिवसात सुरू होतय, हेही सांगायला ते विसरले नाही. फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या की तुम्ही त्या शहरात मिशन बिगिन अगेनच्या माध्यमातून कामावर जाणार आहात, ज्या शहरात देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.
लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही नियमावली सादर केली होती, त्या नियमावलीत बदल करून अनलॉक-1 ची घोषणा केली आहे. ते नेमके नियम काय आहेत, त्याची अंमलबजावणी कशी करावी लागणार आहे, तुम्हाला काय खबरदारी घ्यावी लागणार आहे, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
मुंबईतील मेट्रो, मोनो, बेस्ट, लोकल, रिक्षा, टॅक्सी हे सगळं बंद आहे. यातल्या अत्यावश्यक सुविधांकरिता बेस्ट सुरू आहेत, त्यात खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परवाणगी नाही. तुम्हाला टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यावर धावताना दिसत असतील, तर त्याही अत्यावश्यक सुविधांच्या संबंधीत किंवा काही महत्वाच्या कामानिमित्त बाहेर पडल्या असतील. त्यामुळे तुम्हाला जर वसई, विरार, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, बेलापूर अशा तिन्ही मार्गांवरून मुंबईत यायचं असेल, तर तुमच्याकडे कंपनी सुरू झाल्याचं पत्रक किंवा आयडी असणे गरजेचे. तसं विना पास तुम्ही कामानिमित्त मुंबईत फिरू शकता, मात्र पोलिसांना  तुम्ही का फिरत आहात, हे विचारण्याचा अधिकार आहे.
मुंबईत खाजगी कार्यालये येत्या 8 तारखेपासून सुरू होणार आहेत. त्यामध्ये फक्त 10 टक्के कर्मचारी काम करतील. (म्हणजे 100 पैकी फक्त 10 लोक) संपुर्ण ऑफिसचा भार त्या दहा लोकांवर असणार आहे, त्याच्यात कंपनीच्या किंवा कामाच्या ठिकाणापासून जवळ राहाणाऱ्या लोकांना प्रथम प्राध्यान्य दिलं जाईल. या सगळ्यात जे लोक मल्टीटॅलेंटेड किंवा संपुर्ण काम करू शकतील, असेच निवडक लोक कामावर येतील, असा निर्देशही काही कंपनींचा असू शकतो.
एखाद्या कार्यालयात जर 10 टक्क्यांपेक्षा जास्त स्टाफ असला तर संबंधित कंपनीवर कारवाई होऊ शकते. 
जे लोक हॉटेलमध्ये काम करतात त्यांना हॉटेलमध्येच राहाणे अनिवार्य असेल, ते बाहेर कुठेही राहू शकत नाहीत, तशी तयारीही काही हॉटेल्सनी सुरू केली आहे, तर तुम्ही पार्सल देत असाल किंवा घेत असाल, तर हातात न घेता किंवा देता, ते एखाद्या टेबलवर ठेवलेलं असेल, नंतर ते गिर्हाईकाने घ्यावे. प्रत्येक हॉटेलमध्ये साधारणची बैठक क्षमता असते, त्यापेक्षा निम्मे लोक एका वेळेस असावेत, त्यापेक्षा अधीक गिर्हाईक एखाद्या हॉटेल्समध्ये दिसल्यास हॉटेलवर कारवाई केली जाईल.
7 जूनपासून मुंबईत वर्तमान पत्रांचं वाटप सुरू होणार आहे. त्यामुळे जे लोक घरोघरी जाऊन वर्तमानपत्रांचं वाटप करणार आहेत, त्यांनी मास्क वापरणे, सोबत हॅंड सॅनिटायझर ठेवणे, हॅंडग्लोज घालणे, अशा नियमांच पालन करणे गरजेचे आहे. वर्तमानपत्र समोरच्या व्यक्तीच्या थेट हातात देऊ नये, ते एखाद्या वस्तूवर ठेवलेले असावं.
विद्यापिठे, शैक्षणिक संस्था, कॉलेज, शाळा अशांमध्ये काम करणाऱ्या अनेक जणांना त्या त्या संस्थेने दिलेल्या तारखेनुसार हजर राहाणे गरजेचे आहे. कारण विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम सोडून इतर कामं त्यांना करावी लागणार आहेत. या कामांमध्ये ऑनलाईन शिक्षणपध्दती, निकाल लावणे, उत्तरपत्रिका तपासणे, प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करणे, परिक्षा न देता, जे थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत, त्या विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक प्रक्रिया पुर्ण करणे, अशी कामे यादरम्यान होणार आहेत.
मुंबई हळू हळू सुरू होतेये. अनेक क्षेत्रातील कामेही सुरू होत आहेत. काही लोकांनी वर्क फ्रॉम होमशी तंतोतंत जुळवून घेतलं आहे, त्यात ते रमलेदेखील आहेत, मात्र मुंबईत अनेकांची कामे ही घरून करण्यासारखी नाहीत, त्यामुळे त्यांना घरातून बाहेर पडावं लागणार आहे. त्यांच्यासाठीच ही मुंबई सुरू होत आहे.
फक्त इतकच लक्षात असू द्या की मुंबईत कोरोना व्हायरस आजही त्याच पटीने संक्रमित होत आहे. रोज हजारोंच्या पटीने नवे रुग्ण समेर येत आहेत. कदाचित तुम्ही ज्याच्यासोबत काम करणार आहात, तोही कुठल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातून आला असण्याची शक्यता असू शकते, त्यामुळे तुम्ही सोशल डिस्टन्स पाळा. मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, कोणत्याही गोष्टीला स्पर्श करू नका, कामावरून घरी आलात की आधी स्वच्छ साबणाने अंघोळ करा, काळजी घेऊन काम करा आणि रोज अशा वंटास पोस्ट वाचण्यासाठी आमच्या सोशल मिडीयाशी कनेक्ट राहा, अपडेट राहा!
हेही वाचाच…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments