आपलं शहर

असे असेल अनलॉक २.०; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा

चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे दिवस संपण्यासाठी थोडे दिवस बाकी असताना लॉकडाऊन पुढे कायम ठेवण्यात येईल की शिथिल केला जाईल, असे प्रश्न चर्चेत आहेत. कोरोना आजाराची एकूण परिस्थिती पाहता लॉकडाऊन विषयी नागरिकांच्या मनातील संभ्रम गूढ होत चालला असताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या अफवांवर लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी आव्हानांपासून सावधगिरी बाळगताना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अनलॉक 2.0 साठी तयार होण्यास सांगितले आहे.
पंतप्रधानांनी राज्यांना त्यांच्या विद्यमान चाचणी क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून आरोग्याच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाची एकूण परिस्थिती पाहता, “आपल्याला आता अनलॉक प्रक्रियेच्या दुसर्‍या टप्प्यावर लक्ष देण्याची गरज आहे. त्याच वेळी नागरिकांना होणार्‍या नुकसानाची शक्यता कशी कमी करावी लागेल, याकडे लक्ष दिले गेले पाहिजे” असे मोदी म्हणाले.
कोरोना आजारावर अद्यापही कोणता ठोस उपाय मिळाला नसल्याने, ही कोरोना महामारी कधी संपेल हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. अर्थव्यवस्थेचा विचार करता, आपली अर्थव्यवस्था जितकी अधिक उघडेल, आपली कार्यालये उघडतील, बाजारपेठा उघडतील, वाहतुकीचे साधन खुले होतील तशा रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. योग्य ती खबरदारी घेऊन काम केले तर नक्कीच कोरोनाला आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो.
आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, अनलॉक 2.0 मध्ये कोण कोणत्या गोष्टींना परवानगी दिली जाईल. एक नजर टाकूयात अनलॉक 2.0 मध्ये कोण कोणत्या गोष्टींना परवानगी दिली जाईल.
● अनलॉक 1.0 मध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांसोबत इतर दुकानांना उपाय योजना करून सुरू करण्यास परवानगी दिली गेली होती. अनलॉक 2.0 मध्ये सर्व प्रकारच्या दुकानांना नियम व अटींचे पालन करून दिवसभर उघडण्यास परवानगी दिली जाऊ शकते.
● सोशल डिस्टनसिंगचे पालन करून, मंदिर, चर्च, मशीद इत्यादी देवस्थाने उघडण्यास परवानगी देण्यात येऊ शकते.
● राज्यांतर्गत प्रवासाला परवानगी मिळणे सोपे होईल.
● शॉपिंग मॉल्स, थिएटर, जिम्स, पार्लर सलून हे व्यवसाय गर्दी व सुरक्षेचे भान ठेवून चालू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते.
● व्यवसायाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची 10% असलेल्या उपस्थितीत वाढ केली जाऊ शकते, अथवा सोशल डिस्टनसिंगचे पालन करून गरज असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यास परवानगी मिळू शकते.
● सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेली लोकल सेवा सुरक्षेच्या दृष्टीने सामान्य नागरिकांसाठी बंदच ठेवली जाऊ शकते. कारण, कोरोना संसर्ग वाढण्याचा अधिक धोका हा लोकल ट्रेनमधून उदभवण्याची शक्यता आहे.
● अनलॉक 2.0 मध्ये वाहतुकीला चांगल्या प्रमाणात चालना मिळू शकेल जेणेकरून त्यामुळे अर्थव्यवस्थेस उसळी मारण्यास एक स्रोत उपलब्ध होईल.
● शाळा, महाविद्यालयांबाबत अनलॉक 2.0 मध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल.
● पर्यटन स्थळे ही काही प्रमाणात शिथिल करण्यात येऊ शकतात, जेनेकरून त्या भागात रोजगार संधी वाढतील.
● खाद्य पदार्थ व्यवसायाला परवानगी मिळू शकते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments