फेमस

एका सिगारेटमुळे अमेरिका जळते; काय आहे जॉर्ज फ्लॉइड प्रकरण?

25 मे 2020 पासून अमेरिकेच्या ट्रेंडिगमध्ये मिनीॅपोलिस, मिनेसोटा, संयुक्त राष्ट्र आणि जॉर्ज फ्लॉइड ही नावं चर्चेत आहेत. एका सिगारेटवरून आणि दुकानदाराच्या तक्रारीवरून सुरू झालेला वाद अमेरिकेच्या जीवावर उठला आहे, तो नेमका वाद काय आहे,  जॉर्ज फ्लॉइड ही व्यक्ती कोण आहे आणि या सगळ्यात व्हाईट हाऊसचा काय संबंध आहे, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्युनंतर अमेरिकेत अजूनही हिंसाचार सुरुच आहे. अमेरिकेतील बऱ्याच शहरांमध्ये तणाव आहे. आता तर आंदोलकांनी व्हाईट हाऊसवर दगडफेक केलीय. त्यामुळे डोनाल्ड ट्रंप यांना व्हाईट हाऊसच्या बंकरमध्ये हलवावं लागलं होतं.
अमेरिकेतील बऱ्याच शहरांमध्ये हा तणाव सुरू आहे. तिथलं मिनेसोटा हे राज्य हिंसाचाराचं प्रमुख केंद्र बनत चाललं आहे. नेमकं काय असं कारण होतं, की कोरोनाच्या महासंकटात अनेक लोक कोणतीही सुरक्षा न बाळगता  रस्त्यावर आले आहेत, त्या आंदोलकांना ‘ना कोरोनाची भिती आहे, ना मरनाची.
काय आहे जॉर्ज फ्लॉइड प्रकरण?
अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीची धरपकड सुरू असताना 25 मे रोजी मृत्यू झाला. ही घटना मिनेसोटा राज्यातील मिनिआपोलिस शहरात एका पोलिसाकडून घडली, तो कृष्णवर्णीय म्हणजेच जॉर्ज फ्लॉइड होय. जॉर्ज त्या पोलिसाला आपला श्वास कोंडत आहे आणि मला श्वास घेऊ द्या अशी विनंती करत होता, मात्र त्याच्या प्रयत्नांना अपयश आलं आणि तो मृत्यू पावला.
ज्या पोलिसाकडून ही घटना घडली त्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. जॉर्ज फ्लॉइड हा कृष्णवर्णीय होता म्हणून त्या पोलिसाने जॉर्जवर अन्याय केला, असं तिथल्या कृष्णवर्णीय समाजाचं म्हणनं आहे आणि वारंवार त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध म्हणून अमेरिकेमध्ये हे आंदोलन, जाळपोळ, मोडतोड, इमारती पेटवणे आणि देशाची मुख्य इमारत माणली जाणाऱ्या व्हाईट हाऊसच्या बाहेर दगडफेक सुरू आहे. (व्हाईट हाऊसवर दगडफेक होणे ही इतिहासातली पहिली घटना आहे.) या घटनेमुळे आणि कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेच्या ३० पेक्षा अधिक शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.

जॉर्ज फ्लॉईड हे मूळचे हस्टन मधले. हस्टन हे टेक्सासमध्ये येतं. ते काही वर्षांपुर्वी कामानिमित्ताने मिनियापोलीस येथे आले होते. इथे ते बाऊंसरचे काम करत होते.

त्या रात्री नेमकं काय झालं?
जॉर्ज 24 मे रोजीच्या संध्याकाळी एका कप फूड्सच्या दुकानातून सिगारेट घेण्यासाठी गेले होते. त्या सिगारेटची किंमत होती 20 डॉलर. ते रुपये त्यांनी दिले आणि सिगारेट आपल्या ताब्यात घेतली. दुकानदाराला नोट खोटी वाटली म्हणून त्याने नोट देऊन सिगारेटचे पॉकेट परत घेण्याचा प्रयत्न केला मात्र जॉर्ज तसं करण्यास तयार नव्हता, अखेर दोघांमध्ये वाद वाढला आणि दुकानदाराने पोलिसांना बोलावले, तिथे आलेल्या पोलिसाने जॉर्जवर बंदुक रोखली आणि हात वर करण्यास सांगितले, जॉर्जला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रस्त्यावर पाडले आणि त्याच्या मानेवर गुडघा ठेवला, त्यामुळे जॉर्जचा श्वास कोंडू लागला, मात्र पोलीस कर्मचाऱ्याने त्याचं काही ऐकलं नाही आणि त्यात जॉर्जचा मृत्यू झाला.
संबंधीत पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तरीही तिथले कृष्णवर्णीय लोक आंदोलन का करत आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर असं आहे की अनेकवेळा अमेरिकेत कृष्णवर्णीयांवर अन्याय झाला आहे, प्रत्येकवेळी त्यांच्यावर अत्याचार केले जातात, दुय्यमस्थानदेखील त्यांना दिलं जातं. हे असं का, याचा संताप म्हणजे आता पेटत असलेली अमेरिका होय.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशा अनेक पोस्टसाठी आमच्या फेसबुक, युट्यूब, ट्विटर, हेलो या सोशल मिडीयाला नक्की भेट द्या.
हेही वाचाच… 
 
 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments