कारण

18 वेळा भारताच्या पंतप्रधानांनी चीनी राष्ट्राध्यक्षांना भेटूनही; चीन भारतासोबत…

15 जून रोजी भारत आणि चीन यांच्यात असलेल्या LAC वर दोन देशांमध्ये वाद निर्माण झाला आहे आणि त्या वादात भारताचे काही जवान शहीद झाले. या सगळ्यांमुळे कुरापती चीनच्या नांग्या पुन्हा दिसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून तब्बल 18 वेळा त्यांनी चीनच्या पंतप्रधानांची भेट घेतली आहे, तरीही हा प्रकार चीनकडून का घडतो. याच प्रश्नाचं उत्तर आपण या लेखातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

18 वेळा भेट घेण्यामागच कारण..

1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालं, ज्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या युद्धानंतरही भारत आणि चीनच्या मध्ये असलेल्या म्हणजचे LAC भागात या दोन देशांचे सैनिक एकमेकांशी विनाशास्त्र लढत असतात, मात्र त्याचं रूपांतर मारामारीत किंवा चकमकीत कधीच होत नाही. 15 जून रोजी झालेल्या चकमकीबद्दल दोन्ही देश एकमेकांना जबाबदार ठरवत जरी असले, तरी प्रश्न असा निर्माण होतो की ज्या दोन देशांचे संबंध औद्योगिक आणि सीमाभागासाठी चांगले व्हावेत, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची तब्बल 18 वेळा भेट घेतली, मात्र या भेटीतून काहीच गमक उलगडलं नसल्याचं 15 जून रोजी झालेल्या घटनेतून समोर येत आहे.

चीनला नेमकं काय हवय?
सध्या चीनमध्ये अनेक अंतर्गत वाद सुरू आहेत, ज्यामुळे तिथली राजकीय फळी विस्कळीत होण्याचीदेखील चिन्हे आहेत, त्यातच भर म्हणजे चीनमध्ये जन्मलेला कोरोना व्हायरस. असं म्हटलं जातं आहे की चीन, त्याच्या शेजारी राष्ट्रांना पुढे जाऊ देण्यास मज्जाव करत आहे. राजकीय हुकूमत गाजवणे, हादेखील त्यामागचा उद्देश असू शकतो, मात्र या सगळ्यावर फक्त शंकाच उपस्थित केली जात आहे. चीनची भारतातली गुंतवणूक ही जरी आपल्यासाठी जास्त असली तरी चीनच्या दृष्टीने ती कमी असल्याची म्हटलं जातय.

निवृत्त लष्कर व्ही. पी. मलिक म्हणतात…
व्ही. पी. मलिक यांनी बीबीसी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की पहिला चीनकडून भारतीय सैन्याला भडकवल जातं, स्वतःहुन त्यांना आखून दिलेली बोर्डर ओलांडून भारतीय सीमेमध्ये येण्याचा चिनी सैन्याकडून वेळोवेळी प्रयत्न केला जातो, मात्र ते फक्त भारतीय सैन्याकडून चूकीच पाऊल उचललं जावं, याच हेतून असतं.

चीन भडकण्याचं कारण काय?
भारताने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून भारत आणि चीनच्या सीमेलगत असलेल्या लडाखमध्ये रस्तेबांधणीचे काम सुरू केले आहे. लडाखमध्ये होणारा विकास, तिथे वाढणारी वाहतूक आणि रस्त्याचं दुरुस्तीकरण, या सगळ्यांबरोबर भारतावर दबाव टाकण्यासाठी आखलेली रणनीती हेच चीन भडकण्याचं कारण असल्याचं भारतीय लष्कर दलातील तज्ज्ञ सांगतात.

याची सुरुवात ‘मे’ महिन्यामध्येच
भारताने लडाखमध्ये रस्त्यांसोबतच विकास कामांना सुरुवात केल्यानंतर मे महिन्यातच चीनने गलवान खोऱ्यात भारताच्या हद्दीत कुरघोडी करण्यास सुरुवात केली होती. भारताच्या हद्दीत तंबू ठोकणे, अनेक हत्यारं आणि जड साहित्य LAC वर घेऊन येणे, अशाप्रकारच्या कुरापती चीनकडून सुरू झाल्या होत्या.

अखेर चीनने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर 15 जून रोजी मोठी दुर्घटना घडली. असं म्हटलं जात आहे की या घटनेत चीनच्या बाजूने 300 तर भारताच्या बाजूने फक्त 50 जवान यावेळी घटनास्थळी उपस्थित होते.
चीनने ज्या रॉडने भारतीय सैनिकांवर हल्ला केला त्या रॉडचा फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामुळे 18 वेळा पंतप्रधानांनी चीनच्या प्रमुखांशी भेटून काय मिळवलं? हा सवाल उभा राहातो.
IMG 20200613 WA0013

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments