फेमस

‘माझ्या विठ्ठलाभोवती बडव्यांची गर्दी जमा झाली आहे’; असं म्हणत ठाकरे पक्षाबाहेर पडले आणि…

स्वरराज श्रीकांत ठाकरे म्हणजे अनेकांच्या गळ्यातले ताईत असणारे राज ठाकरे, यांचा आज वाढदिवस. जन्म 14 जून 1968 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला, आज ते 52 वर्षांचे आहेत.
घरातच राजकारणाची तालिम असल्याने राज ठाकरे यांना लहानपणापासूनच राजकारणातले बाळकडू मिळू लागले होते. आज आपण अशाच चपळ राजकारणी आणि शिवसेनेतून बाहेर पडून स्व:ताचं असत्तित्व निर्माण करणाऱ्या एका मराठी नेत्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार, सामना या मराठी दैनिकाचे संस्थापक, बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी उभे केलेल्या शिवसेनेचा वारसदार म्हणून चर्चेत असलेले राज ठाकरे हे सुरूवातीला शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचे काम पाहात होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखाच तडफदार स्वभाव, हा त्यांचा आकर्षणाचा भाग म्हणावा लागेल.
शिवसेनेचं काम अगदी जोमाने करत असताना राज ठाकरे यांचं नाव रमेश किनी या हत्याकांडात जोडलं गेलं होतं. त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली खरी, मात्र त्या काळात राज ठाकरे राजकारणातून बाजूला सारले गेले. त्याच्यातच भर म्हणजे राज ठाकरे यांनी स्वत:हून उध्दव ठाकरे यांचे नाव शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच, शिवसेना विस्तार मंडळाला सुचवलं आणि तिथून सुरूवात झाली शिवसेनेतून एक्जिटची आणि मनसेच्या स्टार्टअपची.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून एकिकडे उध्दव ठाकरे यांनी राजकारणात येण्यास सुरूवात केली तर दुसरीकडे राजकारणात अत्यंत सक्रिय असेलेले राज ठाकरे शिवसेनेतून बाजूला सरकत असल्याच्या बातम्यांनी वेग घेतला. 2004 साली राजकारणात आपली ताकद वाढवण्यासाठी आणि मुंबईतल्या उत्तर भारतीयांची मतंदेखील आपल्याकडे वळवण्याच्या उद्देशाने  शिवसेनेने संजय निरुपम यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले, मात्र दुसरीकडे मुंबईत रेल्वेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तर भारतीयांना राज ठाकरेंच्या भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचं प्रकरण घडलं. हेही राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्याचं कारण समजलं जातं.
हळू हळू करत शिवसेना पक्ष आणि राज ठाकरे अशी दुफळी अनेक ठिकाणी पाहायला मिळू लागली, नोव्हेंबर 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या होत्या त्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर महिन्याभरात त्यांनी पक्षातूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
या सगळ्यात मातोश्रीवरून कृष्णकुंजवर अनेक समजूत काढणाऱ्या नेत्यांची येजा सुरू झाली. मनसेचे दिग्गज नेते मनोहर जोशी, सध्याच्या राजकारणाच्या पटलावरचे मातब्बर आणि चपळ नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय राऊत, यांनीदेखील त्यावेळी राज ठाकरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र राज ठाकरे यांच्या समर्थकांनी संजय राऊत यांना घेऊन आलेल्या गाडीचीच तोडफोड केली आणि नेत्यांची सगळी धावाधाव निष्फळ ठरली.
2005 च्या डिसेंबरमध्ये शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी लगेचच महाराष्ट्राचा दौरा केला आणि मुंबईसाठी रिटर्नगिफ्ट ठरलं ते म्हणजे राज ठाकरे यांचा नवा पक्ष. 2006 च्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र दौरा संपवला आणि परत येऊन म्हणजेच 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्रातल्या नव्या राजकीय पक्षाला जन्म दिला. मनसेची पहिली सभा मुंबईतल्या दादरमधल्या शिवतिर्थावर घेण्यात आली आणि तिथूनपुढे सुरू झाला ‘राज’कारणाचा नवा प्रवास. याच सभेमधलं राज ठाकरे यांचं पहिलं आणि गाजलेलं वाक्य ठरलं ‘माझ्या विठ्ठलाभोवती बडव्यांची गर्दी जमा झाली आहे’.
हा लेख कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. अशा वंटास पोस्टसाठी वंटास मुंबईच्या युट्यूब, ट्विटर, फेसबूक आणि पोर्टलला भेट द्यायला विसरू नका…

IMG 20200613 WA0013

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments