आपलं शहर

खरच दादरमध्ये भाजी विक्रेत्यांमुळे वाढतेय का कोरोना रुग्णांची संख्या? काय ते सत्य…

कोरोनाने भारतासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे. जरी धारावीतील कोरोना कमी होत असला तरी मुंबईतील कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. धारावीपेक्षा दादर आणि माहीम येथील कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. प्रामुख्याने दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळील सेनापती बापट मार्गावर दोन्ही बाजूला घाऊक भाजीचा व्यवसाय सुरू असतो या ठिकाणी घाऊक भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे दादरमध्ये कोरोना वाढतो आहे. अस येथे राहणाऱ्या रहिवाशांचं म्हणणं आहे.

कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून दादरमधील सेनापती बापट मार्गावर भरणारा बाजार बंद करण्यात आला होता, परंतु पुन्हा एकदा अनधिकृतपणे हा बाजार सुरू झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या परवानगीने हा बाजार सुरू असल्याचे बोलले जात आहे. पुन्हा एकदा घाऊक आणि किरकोळ बाजार सेनापती बापट मार्गावर भरू लागल्याने, भाजीपाला खरेदीसाठी लोकांची गर्दी असते आणि परिणामी या गर्दीमुळेच कोरोना बाधितांची संख्या दादर-माहिममध्ये वाढताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.

याठिकाणी दरदिवशी टेम्पोमधून भाजीपाला उतरला जातो. पहाटेपासून भरला जाणारा बाजार सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू असतो. महापालिकेच्या बाजार विभागाने तसेच जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी पोलिसांच्या मदतीने येथील बाजार सर्व प्रथम बीकेसीमध्ये हलवला होता. परंतु तिथे गर्दी होऊ लागल्याने तसेच कोव्हिड उपचार केंद्र सुरू करण्यात आल्याने तो दहिसरला आणि मुलूंड चेकनाक्याच्या जवळ हलवण्यात आला होता. परंतु मागील काही दिवसांपासून दादरमधील बंद असलेला घाऊक बाजार पुन्हा एकदा सुरू झालेला पाहायला मिळत आहे.

याठिकाणी भाजी खरेदीला किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांची संख्या अधिक प्रमाणात असते. सर्वांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या टन महिन्यापासून लॉकडाऊन आहे आम्ही आमचे घर कस चालवायचं. दुसर्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या जातात परंतु आम्हाला जागा उपलब्ध करून दिली जात नाही. या आमच्यावर होणारा अन्याय आहे. असा सवाल भाजी विक्रेते करत आहेत.

काही नागरिकांना जरी वाटत असेल की या भाजी विक्रेत्यांमुळे दादर माहीम मधील कोरोनाचा प्रसार अधिक होतोय हे धाधांत खोट आहे. आपल्या विभागात जास्त टेस्ट होत असल्याने येथे रुग्णांचा आकडा अधिक पाहायला मिळत आहे. जरी भाजी विक्रेते बसत असतील तरी त्यांना पालिका प्रशासन सर्व नियम लावले आहेत. असं मत जी/उत्तर विभागाचे पालिका सहाय्यक आयुक्त, किरण दिघावकर यांनी मांडलं आहे.

दादर स्टेशनच्या बाहेर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांमध्ये परप्रांतीयांची संख्या जास्त आहे. ते येथे रात्रीचे झोपतात व सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात, यामुळे इथे संक्रमणाची भिती अधिक आहे. त्यामुळे यासगळ्यावर पालिका प्रशासन नेमकं काय करते, हे पाहाणेच आता योग्य ठरेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments