फेमस

कोरोनामधलं मोदींच उपरणे (गमछा) आणि त्यामागील त्यांचे छुपे राजकारण; वाचा सविस्तर…

कोरोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ज्या क्रमवारीत भारताला अव्वल यायचं नाही या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. अनुक्रमाणे अमेरिका आणि ब्राझील यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत भारताचा क्रमांक लागतो. भारतात 22 मार्चला जनता स्करफ्यु घोषित करण्यात आला होता. त्या नंतर संपूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये आहे. मध्ये-मध्ये देश अनलॉक केले जाईल, पुन्हा लॉकडाऊन वाढवले जाईल याची चर्चा नेहमी महिन्याच्या मध्यभागी किंवा महिन्याच्या शेवटी अगदी गावागावातल्या गल्ली-गल्लीतून होत होती. सर्वजण वाट पाहायचे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांयकाळच्या भाषणाची. मोदींनी कोरोनाच्या सुरुवातीला तोंडाला मास्क अथवा काहीही न लावता देशाला संबोधित केले परंतु काही कालावधी नंतर मोदी स्वतः हे नियम पाळू लागले. देशाला संबोधित करताना मोदी स्वतः मास्क न वापरता गमछा म्हणजेच उपरणे वापरू लागले.

गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहत आहोत, की पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनासंदर्भातल्या घडामोडींबद्दल देशाला संबोधित करताना, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना विषयी चर्चा करताना किंवा एखाद्या महत्त्वाच्या बैठकीला हजेरी लावताना मास्कऐवजी वेगवेगळ्या रंगाची उपरणं (गमछा) वापरत होते. त्यामुळेच सोशल मीडियावर देखील ‘मोदी गमछा’ हा ट्रेंडही पहायला मिळाला. जशी नेहरूंच्या जॅकेटची चर्चा देशभर होत होती त्यापेक्षा अधिक चर्चा ही मोदी यांच्या ड्रेसिंग होते, मग तो मोदी कुर्ता असो वा मोदी जॅकेट. त्यात आता या उपरण्याची भर पडली. विशेष म्हणजे मोदींनी आपल्या भाषणात सुद्धा गमछा अथवा घरी तयार केलेले सुती मास्क वापरण्याचा आग्रह केला होता. पण मोदींच्या वेशभूषेचा हा नवीन ट्रेंड फॅशन पुरताच मर्यादित आहे की त्याची अजून ही कारणं आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

मोदींनी व्हीडिओद्वारे देशवासीयांना संबोधित करताना सुरुवातीला तोंडाला गमछा बांधतात. मात्र थोड्याच वेळात त्यांनी तो बाजूला करतात. कोरोनाला रोखण्यासाठी घरातील गमछा, रुमाल यांचा मास्कसारखा वापर करता येऊ शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न मोदींनी केला. यासाठी पांढऱ्या रंगाच्या कापडावर लाल रंगातील अथवा इतर रंग डिझाइन अशा साध्या पारंपरिक रुपातला गमछा ते निवडतात. त्यांनी देशाला संबोधित करताना अथवा महत्वाच्या बैठकांना हजेरी लावतात वेगवेगळे उपरणे वापरले आहेत. मोदींनी 11 एप्रिलला देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळीही त्यांनी घरगुती पद्धतीचा मास्क वापरला होता.

त्याबद्दल बोलताना सेलिब्रिटी फॅशन डिझायनर म्हणतात  “असे गमछे वापरुन पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीच साऱ्या विश्वासमोर आणली आहे. नैसर्गिक सूतापासून तयार करण्यात आल्यामुळे तो घाम शोषून घेतो. उष्ण दिवसांमध्ये हा अधिक फायद्याचा ठरतो.”

“मोदींनी गमछा घातल्यामुळे ते सर्वसामान्यांशी डायरेक्ट जोडले जातात. गमछा हा भारतीय संस्कृती, वेशभूषेचा एक मोठा भाग आहे. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत सगळीकडे गमछा वापरला जातो. मोदी बऱ्याचदा आपल्या सभांमध्ये देखील प्रांतीय भाषा आणि पेहराव परिधान करताना दिसतात,” –  शायना एनसी फॅशन डिझायनर आणि भाजप प्रवक्त्या

उपरण्यामागील मोदींचे छुपे राजकारण?
पंतप्रधानांनी असा गमछा वापरल्याने लोकांना पण आपलसं वाटतं. पण यात त्यांचा काही छुपा अजेंडा असेल तर काही सांगता येत नाही. कारण बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि गमछा हा बिहारच्या लोकांच्या रोजच्या पेहरावातला एक महत्त्वाचा भाग आहे. लोकांना अपील व्हावं म्हणून फार पूर्वीपासून नेते मंडळी आपल्या ड्रेसिंगमध्ये किंवा भाषणात लोकांना आवडेल असे बदल करायचे.” असा जुना आणि महत्वपूर्ण ट्रेंड चालत आला आहे.

उद्योगाला चालना की निवडणुकीसाठी युक्ती?
मोदींच्या या उपरण्याचा थेट परिणाम बिहारमधील उद्योगांवर झाला. बिहारचे उद्योग मंत्री हिंदी चॅनलवरील एका चर्चेत बोलताना बिहारमधील विणकरांना मोठ्या प्रमाणावर उपरणे विणण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं. सध्या एक लाख गमछे विणून तयार आहेत आणि ते स्वस्त किमतीत ग्राहकांना विकले जातील, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या काळात मास्क वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने मास्कची कमतरता भासत होती त्यामुळे अनेक लोक उपरणे अथवा रुमाल हेही वापरताना दिसत होते.

उपरण्याच्या माध्यमातून कोरोनापासून बचाव होईलच, पण लॉकडाऊन असल्यानं विणकरांना रोजगारामध्ये ज्या अडचणी येत आहेत, त्या दूर होणार आहेत. उपरण्यांची मोठी ऑर्डर मिळाल्याने त्यांना आपोआप रोजगार मिळेल. पण, हे उद्योगाला चालना देण्यासाठी आहे की बिहारच्या निवडणुकीची गणितंही त्यामागे आहेच?

हेही वाचाच…

मुंबईत कोरोना आटोक्यात येऊ शकतो; मग ठाणे, पुण्यामध्ये का नाही? पाहा कारणे…

मुंबईत उभारतय जगातील सर्वाधिक खाटांच रुग्णालय, पण कोरोनासाठी नाही तर ‘या’ आजारांसाठी…

तुम्हीही Work From Home करता का? मग पाहा; कोरोनानंतर अशी होतील ऑफीसची कामे…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments