आपलं शहर

सर्वाधिक पीपीई कीट बनतात धारावीत, तेही फक्त 170 रुपयांना एक

कोरोनाचा पादुर्भाव सुरू झाला तेव्हापासून पीपीई किटची चर्चा सुरू आहे. सुरुवातीला भारतामध्ये पीपीई किटची निर्मिती होत नसल्यामुळे चीनकडून आपल्याला पीपीई किट मागवण्यात आले होते. तेव्हाही महाराष्ट्रात किटचा तुटवडा होता. दिवसेंदिवस कोरोनाचा ससंर्ग वाढला असून राज्यात पीपीई किटच्या उपलब्धतेचा तुटवडा भासत असताना राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत, राज्यातील 632 दुकानांना पीपीई किट विकण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यातील 121 दुकानं एकट्या मुंबईत आहे. ज्या धारावीवर ताशेरे ओढले जात होते त्याच धारविचे कौतुक देखील जागतिक आरोग्य संघटनेने केले. याच धारावीत महाराष्ट्रात सर्वाधिक पीपीई किट बनवण्याचे 20 कारखाने सुरू केले आहेत.

गेल्या चार महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या भीतीनं खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले होते. रुग्णांना तपासताना संसर्ग होऊ नये यासाठी पीपीई किटची मागणीही डॉक्टरांकडून तसेच सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांकडून सातत्याने होत होती. त्याच पार्श्वभूमीवर धारावीतील गारमेंट व्यावसायिकांनी पीपीई किट बनवण्याचा हा निर्णय घेतला. अंत्यत कमी दरात धारावीत पीपीई किट बनत आहेत. दिवसाला सर्व धारावीतुन 60 ते 70 हजार पीपीइ किट बनत असतात.

आमचा सुरवातीला गारमेंटचा व्यवसाय होता परंतु लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवसाय बंद झाले, त्याचवेळी पीपीई किटची मागनीदेखील वाढू लागली त्यामुळे आम्ही पीपीई किट बनवण्याचा निर्धार केला. तेव्हा पासून आतापर्यंत आम्ही मोठ्या प्रमाणात पीपीई किट बनवले आहेत. दिवसाला 60 ते 70 हजार पीपीई किट बनवत आहोत. – राजेश केवाट, विक्रेता

धारावीत जे पीपी किट बनत आहेत, त्यांना देशभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. उत्तम क्वालिटीचे पीपीई किट धारावीत मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत. अत्यंत कमी दरात सर्व व्यवसायिक हे काम करत आहेत. गेल्या तीन महिन्यात राज्यात व देशभरात पीपीई किटचा तुटवडा होता ते पाहाता व्यवसायीकांचे गारमेंट व्यवसाय बंद होते त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी एकत्र येत कीट निर्मिती करण्याचा निर्णय घेत कीट बनवण्यास सुरुवात केली. परंतु योग्य तो मोबदला आम्हाला मिळत नाही. अस व्यावसायिकांच म्हणणं आहे.

आम्ही दिवसरात्र मेहनत घेऊन पीपीई किट बनवत आहे. आमच्याकडे परवानगी आहे. परंतु काही व्यावसायिक विनापरवाना हा धंदा करत आहेत. आम्ही केलेल्या कामाला योग्य मोबदला मिळत नाही. आमच्याकडे एका पीपीई किटची किंमत 170 आहे, परंतु हॉस्पिटलमध्ये किंवा इतर ठिकाणी चढ्या भावात विकले जात आहेत. त्यामुळे मेहनत करणारा उपाशी आहे. – सुनील सोनवणे, विक्रेता

लॉकडाऊनच्या काळात पोलीस, डॉक्टर, नर्स, हे यांना देवदूत म्हटले जात होते. त्या देवदूतांना वाचवण्याचे काम पीपीई किट करत होते. हेच पीपीई किट बनवणाऱ्यांना योग्य हमीभाव दिला जात नाही ही शोकांतिका आहे.

हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा. अजून अशा वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मिडीयाला नक्की भेट द्या.

हेही वाचाच…

मुंबईत कोरोना आटोक्यात येऊ शकतो; मग ठाणे, पुण्यामध्ये का नाही? पाहा कारणे…

शाब्बास मुंबईकर! तब्बल 45% कोरोना पॉझिटीव्ह मुंबईकर घेतात घरातच उपचार! पाहा कसे घेतात उपचार?

खरच दादरमध्ये भाजी विक्रेत्यांमुळे वाढतेय का कोरोना रुग्णांची संख्या? काय ते सत्य…

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments