आपलं शहर

मुंबईत उभारतय जगातील सर्वाधिक खाटांच रुग्णालय, पण कोरोनासाठी नाही तर ‘या’ आजारांसाठी…

आगीत तेल ओतायचे काम म्हणजे कोरोना संकटाच्या काळात पावसाळा ऋतूत होणारे आजार. मुंबई महापालिका कोरोनापासून बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नांना बऱ्या प्रमाणात यशही मिळत आहे. आता पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यात अनेक साथीचे आजार उदभवत असतात त्यामुळे मुंबईने याकडेही वाट फिरविणे गरजेचे होते. यावर नुकतेच मुंबई महापालिकेची नऊ रुग्णालये ही कोरोना सोडून बाकी आजारांवरील उपचारासाठी दिली आहेत. काय आहे ही बातमी, पाहूया सविस्तर.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई अनेक संकटांना तोंड देत असते, मग ते रस्त्यावरील खड्डे असो की पावसाळ्यात होणारे साथीचे आजार. 2020 हे वर्ष मुंबईसाठी फार महत्त्वाचे आहे. पावसाळ्यापूर्वी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये तसेच विलीगिकरण क्षेत्र कमी पडत होते त्या वेळी मुंबई महापालिकेने एप्रिल महिन्यापासून राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा अशी 16 रुग्णालये कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केली होती आणि त्यांचा पुरेपूर वापर हा कोरोनाग्रस्त रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी केला जात होता. आता सदर 16 रुग्णालयांपैकी 9 रुग्णालये ‘नॉन कोव्हिड’ म्हणजेच आता तेथे कोणत्याही कोरोना रुग्णाचा उपचार केला जाणार नाही, ती रुग्णालये पूर्णतः इतर आजारांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे कोरोना शिवाय इतर आजार झालेल्या रुग्णांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

पावसाळ्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येबरोबरचं दूषित पाण्यामुळे साथीचे रोग हे जास्त बळावत असतात. मलेरिया, डेंगू, डायरिया, कावीळ, कॉलेरा, स्वाईन फ्लू यांसारखे साथीचे रोग मोठ्या प्रमाणावर आपले डोके वर काढतात. पाहू तिथे कोरोना आजाराची भीती ही मुंबईकरांमध्ये होती. आपल्या आजाराचे निदान करण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि कोणा कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलो तर काय होईल? या भीतीने अनेक डायबिटीस व अन्य आजाराचे रुग्ण घरी बसून शक्य होईल तितकी काळजी घेत होते. परंतु आता, कोरोना रुग्णांसाठी व अन्य आजारांवर उपचारासाठी हॉस्पिटल हे वेगवेगळे करण्याचा मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना सोडून इतर आजारांसाठी राखीव करण्यात आलेली 9 रुग्णालये 20 जुलैपासून रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. तेथे कोणत्याही प्रकारची कोरोनारुग्ण नव्याने दाखल करून घेतली जाणार नाहीत.

मुंबई हळूहळू कोरोनावर मात करायला यशस्वी होत आहे. यामध्ये बेड्सची संख्या वाढविणे, झिरो मिशनची संकल्पना राबविणे, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हॉस्पिटल तसेच विलीगिकरण क्षेत्र त्वरित उभे करणे या सर्व नियोजनामुळे हळूहळू मुंबईतून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे.

पावसाळा ऋतूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 186 पैकी 160 दवाखानेही आता नॉन कोव्हिड करण्यात आले आहेत. तर 28 प्रसुतिगृहांपैकी आता केवळ तीन प्रसुतिगृहे कोव्हिड तर उर्वरित 25 हे नॉन कोव्हिड करण्यात आली आहेत. या रुग्णालयात आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना कोव्हिड सेंटर आणि नायर, केईएम, सायन रुग्णालयात दाखल करण्यात येईल. संबंधित निर्णयावर माहिती देताना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी “अधिकाधिक कोरोना रुग्णांना आता कोविड सेंटरमध्येच सामावून घेण्यात आहोत” असे सांगतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments