फेमस

चेन्नई सुपरकिंग्समधल्या 12 जणांना कोरोनाची लागण…

देशातील सर्वाधिक फॅन फॉलोअर्स असलेला आयपीएलमधील संघ म्हणून चेन्नई सुपरकिंग्ज संघाची ओळख आहे. IPL चे सामने लवकरच सुरू होणार, अशा चर्चांना उधाण आल्यानंतर देशात खेळमय वातावरण निर्माण झालं होतं, मात्र या सगळ्यात एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे, ते म्हणजे चेन्नई सुपरकिंग्ज संघातल्या एका खेळाडूसह 12 सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे.

ज्या संघानी युएईतमध्ये तयारीसाठी उपस्थिती लावली आहे, अशा सर्व संघांना सुरूवातीचे काही दिवस क्वारंटाईन करण्यात आलं. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली, या चाचणीत राजस्थान आणि पंजाबच्या संपुर्ण खेळाडूंसह सपोर्ट स्टाफचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, मात्र चेन्नई सुपरकिंग्जच्या बाबतीत हे धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.

चेन्नई सुपरकिंग्जच्या संघातील कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये एक गोलंदाज आणि 12 सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

भारतात कोरोनाचा प्रसार मोठ्याप्रमाणात होत असल्याने आयपीएलचे तेरावे हंगाम युएईमध्ये होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. तशाप्रकारच्या तयारीलाही अनेक खेळाडूंनी सुरूवात केली आहे. चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्थान आणि पंजाब या संघानी तयारी करण्यासाठी युएईमध्ये उपस्थितीही दर्शवली होती.

इतर संघांनी आपला क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचे सामने रंगणार आहेत. भारतातील क्रिकेटप्रेमींना ऑनलाईन हे सामने पाहाता येणार आहेत. यंदा आयपीएलचे 8 संघ खेळाडू मैदानात उतरणार आहेत. तर भारतातून यासाठी 1 हजाराहून अधीक लोक युएईत गेले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments