आपलं शहर

तुमच्या घरी बाप्पा आलेत? मग ‘या’ गोष्टी केल्या नाहीत; तर होऊ शकते कारवाई ….

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणपती उत्सव सुरू झाला आहे. दरम्यान, कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने गणेशोत्सवाचे विसर्जन करण्यापूर्वी सर्व गणेश मंडळे व नागरिकांना ऑनलाइन बुकिंग करण्यास सांगितले आहे. यासाठी बीएमसीने श्रीगणेशविसर्जन.कॉम (shreeganeshvisarjan.com) नावाची वेबसाइटही सुरू केली आहे.

या वेबसाइटमध्ये, गणेश भक्तांना गणपती विसर्जनासाठी तारिख, ठिकाण आणि वेळ याबद्दल माहिती द्यावी लागणार आहे. तसेच महापालिकेने देखील काही नियम व अटी लागू केल्या आहेत, नेमके काय नियम लागू होणार आहेत, हेच आपण पाहाणार आहोत.

काय सांगते मुंबई महापालिका?
विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी बीएमसीकडून ऑनलाईन अर्जदारांसाठी विसर्जनाची वेळ ठरवण्यात येईल. मागील वर्षापर्यंत गणेश विसर्जनाच्या दिवशी 50 लाख भाविक रस्त्यावर येत असत. परंतु यावेळी विसर्जनासाठी कडक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये सार्वजनिकपणे कोणतेही गणपती सोपवू नका, असे आवाहन महापालिका सर्व गणेश भक्तांना करत आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बीएमसीने म्हटले आहे की दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर “महामारी रोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड” नियमांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे महापालिकेने सर्वांना आवाहन केले आहे की, आपण हा सण साध्या पद्धतीने साजरा करावा.

कंटेन्मेंट झोनसाठी महापालिकेची विशेष मार्गदर्शक तत्त्वे
महापालिकेने कंटेनमेंट झोनसाठी विशेष नियम व अटी लागू केल्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये असणारे नागरिक आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करू शकतात. परंतु कंटेनमेंट झोनमधील गणेश भक्तांना मूर्ती विसर्जन घरीच करणे अनिवार्य राहणार आहे.

गणेशोत्सव म्हणजे खूप उत्सव आणि खूप सारी गर्दी, याच गर्दीचा रेकॉर्ड गणपती विसर्जनाच्या दिवशी मोडला जातो. कोरोना संकटाच्या काळात इतकी गर्दी करून चालणार नाही. त्यामुळे गर्दी होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेकडून काही नियम व अटी जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवांना आता गणपती विसर्जनासाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे.

कशी कराल तुम्ही ऑनलाइन बुकिंग
● मुंबई महापालिकेकडून गणपती विसर्जनासाठी नुकतीच एक वेबसाईट बनविण्यात आली आहे तीच नाव श्री.गणेशविसर्जन.कॉम
● त्यामध्ये जाऊन आपल्याला दोन पर्याय दिसतील, मंडळ अथवा घरगुती, आपल्यानुसार आपण पर्याय निवडायचा आहे.
● पुढे जाऊन आपले नाव अथवा मंडळाचे नाव नोंदीत करायचे आहे.
● खाली संपर्क साधण्यासाठी आपला मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा आहे.
● खाली जाऊन आपली सिटी, आपला वॉर्ड आणि विसर्जन स्थळ अशी संपूर्ण माहिती भरायची आहेत.
● पुढे जाऊन आपल्याला विसर्जनाची तारीख आणि विसर्जनाची वेळ असे दोन पर्याय मिळतील जे आपल्याला आपल्या बाप्पाच्या पाहुणचाराच्या दिवसानुसार भरायचा आहे. तसेच आपल्याला विसर्जनाची हवी ती वेळसुद्धा आपण यात टाकू शकतो.
● अशी संपूर्ण ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर आपल्या मोबाइल क्रमांकावर आपल्याला एक कॉन्फमेशन मेसेज आणि विसर्जन कशा प्रकारे होईल याचा तपशील येईल.

गोष्ट पहिल्या गणपतीची आणि केसरीतल्या अग्रलेखाची…

तुम्हाला माहित आहे का? बाप्पाला ‘या’ पदार्थांचा प्रसाद का दाखवतात…

पाहा : 127 वर्षांपुर्वी मुंबईतल्या पहिल्या गणेशोस्तवाची सुरूवात कशी झाली?

गणेशोत्सवाचे जनक कोण; टिळक की भाऊ रंगारी?

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments