फेमस

प्रिय तुकाराम मुंढे, शाससाने आपली बदली केली असून आता तुम्ही…

नेहमीच चर्चेत असणारे कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिनांक 26 ऑगस्ट रोजी बदली झाली आहे. त्यांची बदली मुंबईतल्या सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे. ते सध्या नागपूरच्या महापालिकेचे आयुक्त म्हणून काम सांभाळात होते.

21 जानेवारी 2020 रोजी तुकाराम मुंढेंची बदली महापालिका आयुक्त, नागपुर महापालिका, नागपुर येथे करण्यात आली होती, तर त्याआधी ते एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहात होते. राज्याचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या आदेशाने ही बदली करण्यात आली आहे. आता तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

14 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 14 वेळेस बदली होणारे तुकाराम मुंढे हे पहिले IAS अधिकारी आहेत. 2005 सालच्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत, तर कामाच्या बाबतीत तत्पर असलेल्या तुकाराम मुंढेवर नागपुरात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

नियमांच्या बाबतीत काटेकोर असणाऱ्या तुकाराम मुंढेंचा काय आहे इतिहास…
2005 सालात झालेल्या केंद्रिय आयोग परिक्षेत ते 20 व्या क्रमांकाने पास झाले आणि देशाच्या सेवेत रुजू झाले.

2006-07 महापालिका आयुक्त, सोलापूर – IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची सुरूवात सोलापुरातून झाली.

2007 प्रकल्प अधिकारी, धारणी – सोलापुरनंतर त्यांची बदली धरणी या अदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली.

2008 उपजिल्हाधिकारी, नांदेड – धरणी इथून त्यांची बदली नांदेडच्या उपजिल्हाधिकारी पदी झाली.

2008 सीईओ, नागपूर जिल्हा परिषद – 2008 साली नागपुरच्या जिल्हा परिषदेवर सीईओ म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी अनेक शाळांना भेटी दिल्या आणि गैरहजर असलेल्या शिक्षकांना निलंबित केलं. तेव्हापासून नागपुरमध्ये 10 ते 12 टक्के गैरहजर असलेलं शिक्षकांचं प्रमाण 1 ते 2 टक्क्यांवर आलं. त्यानंतर नागरपुरातल्या वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून काही डॉक्टरांनाही निलंबित केलं. इतिहासात पहिल्यांदाच सीईओ यांनी डॉक्टरला निलंबित केलं होतं.

2009 अति. आदिवासी आयुक्त, नाशिक – 2009 साली नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ या पदावर झाली. या पदाची सुरूवातच तुकाराम मुंढे यांच्यापासून करण्यात आली होती.

2010 के. व्ही. आय. सी. मुंबई – मे 2010 साली त्यांची बदली मुंबईतल्या KVIC च्या CEO पदी झाली.

2011 जिल्हाधिकारी, जालना – मुंबईत काही काळ काम केल्यानंतर जालन्याच्या कलेक्टर पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. इथे एक मोठा प्रश्न सहा वर्षांपासून रखडला होता, तो म्हणजे जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचा. हे काम त्यांनी तिथे गेल्याच्या तीन महिन्यांत पूर्ण केले.

2011-12 जिल्हाधिकारी, सोलापूर – 2011-12 या सालात त्यांची बदली सोलापूर जिल्ह्याच्या कलेक्टर पदी करण्यात आली. तिथेही अनेक कामांचा सपाटा त्यांनी लावून धरला होता. जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापूरातील 282 गावांची जबाबदारी आपल्याकडे घेतली होती. या गावातील कामे त्यांनी फक्त 150 कोटी रूपयांमध्ये केली. यात लोकांचे योगदान 50-60 टक्क्यांचेही होतेच. वर्षाला 400 टँकर ज्या सोलापुरात लागत होते, त्याच सोलापूरात टँकरची संख्या फक्त 30 ते 40 टक्क्यांवर वर आली.

2012 विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई

2016 आयुक्त, नवी मुंबई महापालिका – नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना Walk With Commissioner हा कार्यक्रम लोकप्रिय झाला होता. रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे अनेक अधिकाऱ्यांचे बेशिस्त वागणूक, कामातील अनियमितता इत्यादी कारणामुळे निलंबन करणे, नवी मुंबई मधील रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व अनधिकृत विक्रेते यांना चाप लावणे अशा कामांना उचलून धरलं होतं.

2017 पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे – 2017 साली पुणे महानगरपालिकेच्या पीएमपीएमएलच्या अध्यक्ष पदी त्यांनी निवड करण्यात आली होती. दर महिन्याला पीएमपीएमएलची ६ लाख लोकांची असणारी ग्राहकसंख्या ९ लाखांवर गेली. पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रियल टाइम इ -टिकीटींग बस म्हणून तेव्हापासून उदयास आली.

2018 नाशिक महापालिका आयुक्त – 2018 मध्ये नाशिकमधल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे सत्ताधारी आणि मुंढे यांच्यात संघर्ष पेटला होता. नाशिकच्या नागरिकांनी सातत्याने मुंढे पाठिंबा दिला मात्र तरीही तेथून त्यांची बदली झाली.

2018 नियोजन विभाग, मंत्रालय

2019 एडस नियंत्रण प्रकल्प संचालक

21 जानेवारी 2020 नागपूर महापालिका आयुक्त

26 ऑगस्ट 2020 सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई

14 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 15 वेळा बदली होणारे तुकारम मुंढे हे एकमेव अधिकारी आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments