फेमस

धारवीचा पॅटर्न फिलिपाईन्समध्ये राबवणार; WHO, New York Times कडून होतय कौतूक…

धारावी कोरोनातून मोकळी होत असताना जगासमोर एक वेगळा आदर्श ठेवत आहे. धारावी ही जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी माणली जाते. कमी क्षेत्रात सर्वाधिक लोक या ठिकाणी राहातात. सुरूवातीला WHO नेदेखील या धारावीत कोरोना पसरला तर हाहाकार माजेल, असे मत जगासमोर मांडले होते. मात्र त्याच धारावीचे काही दिवसांआधी WHO ने विशेष कौतूक केले. त्यामुळे अनेक देश धारावीबाबत जाणून घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

धारावीत दाटीवाटीने लोक राहातात. जिथे 70 टक्क्यांपेक्षा अधिक लोक हे सार्वजनिक शौचालय वापरतात. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्ससिंग शक्य नसतं. लोकसंख्या जास्त असते, या सगळ्या समस्या समोर ठेवून एक वेगळ्या पॅटर्न धारावीला कोरोनामुक्तीकडे नेण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने केलं. ज्या ठिकाणी धारावीसारखी दाटीवाटीची लोकवस्ती आहे, अशा अनेक ठिकाणी धारावी पॅटर्न लागू करणं योग्य आहे.

हा पॅटर्न फक्त मुंबई, राज्यात किंवा देशभर पसरला नाही, तर त्याच्याही पार फिलिपाईन्स, न्यूयॉर्क अशा देशांपर्यंत पोहोचला आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की हा पॅटर्न मनीलामध्ये राबविण्यात येणार आहे.

मनीलाची परिस्थिती काय आहे?
फिलिपाईन्सची राजधानी मनीला शहर हे मुंबईतल्या धारावी इतकं आहे. मनिलाचे भौगोलिक क्षेत्रफळ 38.55 वर्ग किलोमीटर इतके आहे, साधारण इथली लोकवस्ती 16 लाख इतकी आहे. फिलिपाईन्समधलं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं दुसऱ्या नंबरचं शहर म्हणून मनीलाची ओळख आहे. याच शहरातल्या 1 लाख 40 हजाराहून अधीक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 हजाराहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती तिथल्या एका वृत्तपत्राने दिली आहे.

मनीलाचं पुढचं पाऊल कोणतं?
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार WHO च्या म्हणण्यानंतर धारावी पॅटर्न समजून घेण्यासाठी फिलिपाईन्सच्या सरकारने मुंबई महानगरपालिकेला संपर्क केला आहे. धारावीत राबवण्यात आलेलं ‘चेस द व्हायरस’ हे मिशन आता फिलिपाईन्सच्या मनीला शहरातही राबवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे धारावीतल्या चेस द व्हायरस मिशनच्या अंतर्गत राबवलेल्या सर्व गोष्टी मनीलामध्ये होतील.

https://www.nytimes.com/2020/05/14/world/asia/mumbai-lockdown-coronavirus.html
mumbai lockdown coronavirus

न्यूयॉर्क टाईम्सने का घेतली दखल?
न्यूयॉर्क टाईम्सने स्वत:च्या आणि मुंबईच्या कोरोना संक्रमणाचा आलेखामध्ये तफावत पाहिली आहे. ज्या गतीने रुग्णांचे संक्रमण न्यूयॉर्कमध्ये पसरत आहे, त्याच्या कितीतरी कमी पटीने मुंबई शहरात रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे न्यूयॉर्कने मुंबईसह धारावीचं कौतूक केलं आहे.

धारावी विभागाचे सहायक आयुक्त किरण दिगावकर काय सांगतात?
अनेक राज्यांमधून; देशांमधून आमच्याशी संपर्क साधून विचारणा केली जाते. आपण काय उपाय योजना केल्या, कशाप्रकारे केल्या, असे अनेक प्रश्न त्यांचे असतात. आम्ही त्यांना माहिती देत असतो. माध्यमांना देखील आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांच्यामुळेच धारावी पॅटर्न लोकांपर्यंत पोहोचला. अशी प्रतिक्रिया जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिगावकर यांनी दिली.

बृह्मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल काय सांगतात?
धारावीतील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आमच्यापुढे मोठं आव्हान होतं. धारावीत चांगल्या प्रकारे कोरोना आटोक्यात आला आहे. त्याचे कौतुक देखील होत आहे; याचा आम्हाला आनंद तर आहेच; पण पुढेही याचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. कोरोना रोखत असताना मुख्यमंत्री आणि राज्यसरकारचे प्रयत्नदेखील महत्वाचे आहेत. असे मत बृह्मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments