आपलं शहर

दरवर्षी लाखोंच्या राख्या विकणाऱ्या व्यापाऱ्यांची परिस्थिती आज खूपच वेगळी आहे…

कोरोनाच्या महामारीमुळे भारतातील उद्योगधंदे उध्वस्त झाले आहेत. कोरोनामुळे छोट्या व्यापाऱ्यांच आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. धारावीने छोट्या उद्योगधंद्यांना चालना दिली आहे. याच छोट्या व्यापाऱ्यांवर कोरोनामुळे आज उपासमारीची वेळ आली आहे.

रक्षाबंधन जवळ येत आहे, या भागात पाटवा समाज वर्षभर राख्या बनवून रक्षाबंधनच्या अगोदर 40 दिवस विकत असतो, परंतु यावर्षी कोरोनामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याने आर्थिक संकटाचा तोटा राखी व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. बहीण जी राखी बांधते ती राखी बणवनाऱ्यांवर कोरोनाने घाव घातला आहे. ज्या प्रमाणे कोरोनाच्या काळातील सण उत्सवावर बंधने व संकटे आली त्याचप्रकारे रक्षाबंधनाला राख्या बनवणाऱ्या धारावीतील पटवा समाजातील राखीच्या व्यापाऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे.

धारावीने अनेक छोट्या उद्योगधंद्यांना चालना दिली आहे, त्याचपैकी एक हे राखी बनवणारे व्यापारी. धारावी येथील पटवा समाजातील जास्तीत जास्त कुटुंब ही वर्षभर राख्या बनवून रक्षाबंधनच्या अगोदर 40 ते 50 दिवस भाड्याने गाळे घेऊन राख्या विकत असतात.

आमच्या घरातील सर्व लोक हे वर्षभर राख्या बणवून रक्षाबंधनच्या 1 महिना आधी विकायला धारावीत असतो. दर वर्षी कमित कमी 20 हजार राख्या विकल्या जातात परंतु यावर्षी कोरोनामुळे दिवसाला 20 राख्याही विकता येत नाहीत. धारावी रेड झोन होती, तेव्हा दुकाने उघडण्यासदेखील परवानगी नव्हती. आता धारावी चालु झाली असली तरी खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. धारावीतील व्यापाऱ्यांच्या राख्या या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाठवल्या जातात. परंतु कोरोनामुळे यावर्षी जिल्हे लॉकडाऊन असल्यामुळे मुंबईच्या बाहेर व्यापार करण्याची संधी मिळाली नाही, यामुळे राखीच्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. असं मत राखीचा व्यापार करणारे विजय पटवा सांगतात.

हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा. अजून अशा काही वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मिडीयाला नक्की भेट द्या.

कोरोनामधलं मोदींच उपरणे (गमछा) आणि त्यामागील त्यांचे छुपे राजकारण; वाचा सविस्तर…

राज्यात सर्वाधिक पीपीई कीट बनतात धारावीत, तेही फक्त 170 रुपयांना एक…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments