आपलं शहर

मुंबई जिंकली! मुंबईतले 80 टक्के रुग्ण झाले कोरोनामुक्त!

राज्यात कोरोनाची सुरूवात जरी पुण्यातून झाली असली, तरी त्यानंतर कोरोनाचे रुग्ण मुंबईत भयंकररित्या वाढत होते. अनेक बातम्यांच्या माध्यमातून त्याचं कारणही तुम्हाला समजलं असलेच. मात्र आता घाबरण्याचं कोणतंच कारण नाही. कारण आतापर्यंत मुंबईतील 80 टक्के कोरोना संक्रमित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे आणि लवकर संपुर्ण मुंबई कोरोनावर मात करेल, असा विश्वास मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना दिला आहे.

आकडेवारी काय सांगते?
मुंबईत आतापर्यंत 1 लाख 28 हजार 726 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 03 हजार 468 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत मुंबईतल्या 7 हजार 130 जणांना प्राण गमवावा लागला आहे. मुंबईतला रिकव्हरी रेट हा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मागील 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत रुग्ण वाढीचा दर 0.82 टक्के इतका आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत 6 लाख 53 हजार 593 कोव्हिड-19 संदर्भातल्या टेस्ट करण्यात आल्या आहेत, यावरून समोर आलेली माहिती अशी की मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 85 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतल्या कोणत्या ठिकाणी रुग्ण जास्त?
मुंबईतल्या महबार हिल, नानाचौक, गिरगाव, मुंबादेवी, बोरिवली, वांद्रे पश्चिम, चेंबुर, दहिसर, कांदिवली, मस्जिद बंदर, डोंगरी, गोरेगाव, कुलाबा, भायखळा अशा दहा ठिकाणी अजूनही कोरोना रुग्णांचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आहे. मुंबईतल्या या दहा विभागांमध्ये कोरोनाचे संक्रमण जास्त होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने जास्तप्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे.

एकेकाळी 2 ते 3 हजारांपेक्षा अधीक पटीत कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर येत असताना आता ती सरासरी कमी झाली आहे. रविवार (16 ऑगस्ट)ची आकडेवारी पाहिल्यास 16 तारखेच्या 24 तासात 1 हजार 010 नवी रुग्णांचे निदान झाले आहे तर 47 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे, त्यात दिलासादायक बातमी अशी की 719 जणांना कालच्या 24 तासात डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलं. त्यामुळे मुंबईची कोरोनामुक्तकडे वाटचाल सुरू झाली आहे, असं म्हणण्यास हरकत नाही.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा आणि अशा खास वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मिडीयाशी कनेक्ट राहा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments