फेमस

सर्वांचे लक्ष वेधून घेतोय चॉकलेटचा बाप्पा; चक्क दुधात केलं जातंय, बाप्पाचे विसर्जन

घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. दीड दिवसाच्या बाप्पाला मनोभावे पूजा करून भक्तांनी निरोपही दिला. पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणाऱ्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तींना गणेश मंडळांसह घरगुती गणपतीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती. यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवावर सावट असताना पर्यावरण पूरक गणपतीची मागणी बाजारात वाढू लागली. याचाच एक भाग म्हणून मुंबईत रिंकू राठोड यांनी चॉकलेटपासून गणेशमूर्ती बनवली.

घरोघरी अशा मुर्त्या बनवण्यात याव्यात म्हणून मूर्तिकार रिंकू राठोड या विनामूल्य ऑनलाइन प्रशिक्षण देत होत्या. तब्बल भारतासह एकूण 45 देशांतील गणेश भक्तांनी या ऑनलाईन सेमिनारमध्ये भाग घेतला. स्वतः रिंकू राठोड यांनी चॉकलेट पासून बाप्पा बनवला असून त्याचे विसर्जन दुधात केले जाणार आहे.

कोरोनामुळे मुंबईत गणपती होईल की नाही असा प्रश्न होता, परंतु मुख्यमंत्री आणि गणेशोत्सव मंडळांच्या समन्वयामुळे गणपतीचे उत्सवावरचे विघ्न दूर झाले. त्याच्यावर काही निरबंध आहेत; पण गणेशोत्सव साजरा करायला मिळतोय यामुळे गणेशोत्सव मंडळात आनंदाचे वातावरण आपण पाहतोय. गणेशोत्सवात पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारे पर्यावरण पूरक गणपतींना मोठी मागणी असते. शाडूच्या मुर्त्या, कागदाच्या मुर्त्या आणि आता चॉकलेटची मूर्ती. मुंबईत राहणाऱ्या रिंकू राठोड या दरवर्षी चॉकलेटच्या पर्यावरण पोषक मुर्त्या बनवत असतात. चॉकलेट पासून बनवण्यात येणाऱ्या गणेश मूर्त्यांच विसर्जन हे पाण्यात न करता दुधात केलं जातं.

दुधात विरघळलेलं चॉकलेट हे न टाकता ते प्रसाद म्हणून अनाथ बालकांना दिला जातो. हा प्रयोग करणाऱ्या रिंकू राठोड यांनी यंदा घरी चॉकलेटचा गणपती बनवण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा मानस धरला आणि याला मुंबई, भारतासह परदेशातून अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन चॉकलेटचा बाप्पा साकारला.

गेली 10 वर्षे मी चॉकलेट पासून गणपती बनवते. मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे खंड पडतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता; पण नवीन कल्पना लढवत मी ऑनलाईन सेमिनार घ्यायचं ठरवलं. गणपती आगमनाच्या 8 दिवस अगोदर या ऑनलाईन सेमिनारचे आयोजन केले, या सेमिनारला परदेशातून देखील पाठिंबा मिळाला. भारतासह 45 देशातील 2500 भक्तांनी यामध्ये सहभाग नोंदवून चॉकलेटचा बाप्पा साकारला. आमचा बाप्पा कोरोनाच्या महामारीवर विजय प्राप्त करेल अशी आमची आशा आहे. -रिंकू राठोड, मूर्तिकार

दरवर्षी रिंकू राठोड स्वतः 5 फुटांची चॉकलेटच्या बाप्पाची मूर्ती बनवतात; पण यावर्षी कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर असल्यामुळे छोटी मूर्ती बनवली आहे. यावर्षीची मूर्ती कोरोना विनाशक बाप्पा असून कोरोनाचे संकट आहे ते विघ्न बाप्पा दूर करेल. अशी रिंकू राठोड यांना अपेक्षा आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments