फेमस

बाप्पा; स्वतःच घेणार भक्तांची काळजी, मुंबईत सॅनिटायझर बाप्पाची चर्चा…

गणेशोत्सव जवळ आलेला असताना यंदा गणेशभक्तांना कोरोना बाबतची चिंता आहे. मुंबईचा गणेशोत्सव अनेक कारणांमुळे जगात प्रसिद्ध आहे. यावर्षी देखील आपल्या बाप्पाचा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. गणेशोत्सव आला असला तर कोरोनाच संकट अजून घोंगावत आहे. त्यामुळे गणपतीच्या दर्शनाला जाताना सामाजिक अंतर ठेवणे, मास्क लावणे आणि मुख्य म्हणजे सॅनिटायजरचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र घाटकोपर मधील नितीन चौधरी आणि संगीता चौधरी या दाम्पत्यांनी चक्क गणपतीच्या समोर दर्शनाला गेल्यास तुमच्यावर आपोआप सॅनिटायजर उडेल, अशी व्यवस्था केलो आहे.

घाटकोपर येथील अमृतनगर विभागात असलेल्या प्रांजल गणेश कला केंद्रात गणेश भक्तांसाठी अनोखी गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सेन्सर आणि स्प्रे चा उपयोग करून गणपतीच्या मूर्तीच्या हातात असलेल्या शस्त्रातून म्हणजे त्रिशूळातून चक्क सॅनिटायजर स्प्रे करण्याची प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याच बरोबर या मूर्तीच्या मुकुट आणि दागिन्यात एलईडी लाईट्स बसविल्या आले आहेत. यातून रंगीत लाईट्सचे रंग, त्यांचा वेग आणि चमकण्याचे प्रकार रिमोट कंट्रोलद्वारे बदलता येणे शक्य आहे.

आम्ही गेली 10 ते 11 वर्ष गणेशमूर्ती बनवण्याचे काम करत आहोत. दरवर्षी काहीतरी नवीन ग्राहकांना देण्याचं आमचं उद्दिष्ट असतं. यावर्षी कोरोना आहे, त्यामुळे भक्तांची काळजी घेणारा बाप्पा ही संकल्पना आम्हाला सुचली. बाप्पाच्या अवजारातून जर सॅनिटायझरचा वर्षाव झाला, तर कसं वाटेल? अशी कल्पना आम्हाला सुचली. दर्शनाला येणारे भक्त हे पूर्ण सॅनिटाईझ होतील. आता आपण कोनाच्या घरी जातो, तेव्हा सॅनिटायझर दिलं जातं; पण या संकल्पनेमुळे हे काम कमी होणार आहे. कोरोनावर आपण मात करत असताना बाप्पादेखील आपल्या मदतीला आहेत. बाप्पा देखील जनजागृती करून जाईल, असा आमचा हेतू होता. अशी माहिती मुर्तीकार संगीता चौधरी यांनी दिली आहे.

नाट्य क्षेत्रात लाईट्स सप्लायर म्हणून काम करणारे नितीन चौधरी गेले दहा वर्ष गणेशमूर्ती विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. गणपतीची मूर्ती अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी ते पूर्वी मोती, मनी, डायमंड इत्यादींचा वापर करीत होते. परंतु मागील पाच वर्षांपासून गणपतीच्या मूर्तींमध्ये एलईडी लाईट्स लावून त्या मूर्त्या आणखी रेखीव बनवण्याचं काम चौधरी फॅमिली करत आहे.

याला मोठा प्रतिसाद मिळत असून गणपती भक्तांकडून अशा मुर्तींची मागणी अधिक वाढली आहे. यंदा कोरोनाचे संकट आणि त्यावर गणपती बाप्पाने मात करावी, या साठीची संकल्पना त्यांना राबवायची होती. यासाठी गणपतीच्या शस्त्रातून कोरोनाचा नाश होत आहे, ही संकल्पना प्रत्यक्ष सॅनिटायजरचा स्प्रेच करून राबविता येईल का? यासाठी त्यांनी प्रयोग सुरू केले.

त्यातून सेन्सरचा वापर करून स्प्रे करता येईल, असे त्यांना सुचले आणि त्यांनी गणपतीचे त्रिशूल तसेच इतर शस्त्रात स्प्रे बसविले आणि त्याला सेन्सर जोडले. ज्या वेळेस गणेशभक्त मूर्ती समोर जातात तेव्हा आपोआप गणेशभक्तांवर सॅनिटायजरचा स्प्रे होतो आहे. या मूर्तींच्या मागणीत आता वाढ झाली असून अशा प्रकारची ही अनोखी संकल्पना पाहण्यास त्यांच्या गणेश चित्र शाळेत लोकांची गर्दी होत आहे.

मुंबईच्या गणपतींचा डंका संपूर्ण जगात वाजत असल्याचं आपण पाहात आलो आहोत, कोरोनाच्या काळात गणेशोत्सव होईल की नाही हा प्रश्न होताच; पण हार मानलीत ते मुंबईकर कसले? मुंबईकरांनी या संकटावरदेखील मात करत यावर उपाय शोधून बाप्पाच्या आगमनाला सज्ज झाले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments