खूप काही

Inside The Crime |03| बायकोने साखर नाही दिली आणि एचडीएफसी बँकेच्या चेअरमनचा खूण झाला…

सिद्धार्थ संघवी. नाम तो सुनाही होगा! उंच, तगडा, हसऱ्या चेहऱ्यावर नेहमी तेज असलेला हायप्रोफाईल व्यक्ती. मुंबईतल्या एचडीएफसी बँकेत चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळत होता. स्वभाव गोड असल्यामुळे त्याच्याभोवती नेहमी माणसांचा गलका होतच असायचा.

अगदी कमी वेळात त्याने प्रगतीची शिखरं गाठली होती. त्याचं यश पाहून काहींना भारावून येत होतं तर काहींची जळजळ होत होती. बँकेतल्या वरिष्ठांना डावलून सिद्धार्थच्या मेहनतीमुळे त्याला ही खुर्ची मिळाली होती. त्याच्या या यशावर जळणाऱ्या लोकांची मनस्थिती द्विधा झाली होती. सिद्धार्थ बँकेत आला की यांच्या चेहऱ्यावर उदासी पसरण्याच नित्याचाच झालं होतं; पण भविष्यात सिद्धार्थच्या जीवनात काय घडणार याची कल्पना कदाचित त्यालाही नव्हती.

24 डिसेंबर 2018. सिद्धार्थ नेहमीप्रमाणे आपल्या चारचाकी गाडीतून ऑफिसला जाण्यास निघाला. त्या दिवशी त्याची बायको नेहमीप्रमाणे घरातून निघताना तोंडात साखर घालायला विसरली. सिद्धार्थची पत्नी नेहा, घरातून कामाला जाण्यासाठी निघताना त्याला रोज साखर भरवते. यावर प्रश्नाचा भडिमार न करता सिद्धार्थ ते पाळायचा. पत्नीच्या इच्छेसाठी इतकी लहानशी गोष्ट त्याने कायमस्वरूपासाठी स्वीकारली होती; पण त्या दिवशी काय झालं माहीत नाही, नकळत दोघेही ही गोष्ट विसरले होते.

सिद्धार्थ बँकेच्या कंपाउंडमध्ये पोहोचला, त्यावेळी त्याच्या बायकोचा दोन वेळा फोन येऊन गेला होता. त्याला समजलं की आपण आज तिच्या हातची साखर खायला विसरलो आहोत, म्हणून कदाचित कॉल आला असेल. नंतर कॉल करता येईल म्हणून गाडी पार्किंगमध्ये लावून नेहमीप्रमाणे त्याने चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून बँकेत प्रवेश केला.

बँकेच्या रिसेप्शनजवळ बसलेल्या महिलेपासून आत जाईपर्यंत त्याला अनेकांनी गुड मॉर्निंग सर असा आदर दिला होता. दिवसभर कामाचा ताण, तरी चेहर्यावर आंनद आणि स्मितहास्य करून इतरांशी बोलणं हा सिद्धार्थचा स्वभाव. त्यादिवशी ते 8 तास सिद्धार्थला बैचेन करत होते. सिद्धार्थची मुलगी कृतिका हीचा कानात गुंजनारा आवाज, बायकोने वारंवार केलेले फोन आणि इतर गोष्टींनी त्याला अस्वस्थ केलं होतं.

भविष्यात काहीतरी अनपेक्षित घडणार याची जणू ती चाहूल होती. संध्याकाळी काम आवरून सिद्धार्थ घरी जण्यासाठी ऑफिसमधून बाहेर पडला. पार्किंगमधून गाडी काढवी म्हणून तो तिकडे गेला आणि पुढच्या 20 मिनिटानंतर त्याची काळ्या काचा असलेली लाल रंगाची गाडी वेगाने बँकेच्या गेटमधून बाहेर पडली. बँकेच्या गेटमधून एवढ्या वेगाने बाहेर पडणारी गाडी पाहून गेटवरचा वॉचमनदेखील गोंधळला होता, पण महत्वाचं काम असेल या हिशोबाने त्याने विचार करणं बंद केलं.

त्या दिवशी नेहा जवळपास 11 वाजेपर्यंत सिद्धार्थच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती. एरवी 8 च्या आत घरी येणारा सिद्धार्थ आज 11 वाजले तरी परतला नव्हता. त्याला फोन करावा तर सारखा फोन बंद येत होता. नेहाचं मन तिला अस्वस्थ करत होत. 12 वाजेपर्यंत वाट बघून नेहा बाबांना घेऊन काळजीने घरातून बाहेर पडली आणि सरळ पोलीस ठाणे गाठलं. पोलीस ठाण्यात सिद्धार्थ गायब झाल्याची रीतसर तक्रार तिने नोंदवली आणि घडलेला प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. एचडीएफसी या नामांकित बँकेचा वरिष्ठ पदावरचा अधिकारी अचानक गायब झाल्याने पोलिसांच्या पथकाने कसून तपास सुरू केला.

सिद्धार्थ कुठे आहे? काय करतोय याबद्दल कोणालाच काहीही माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी पोलिसांना सिद्धार्थच्या मोबाईल नंबरचे लोकेशन ट्रेस करण्यात यश आलं; पण काही काळासाठीच त्याचा फोन सुरू करण्यात आला होता. ते ठिकाण होतं नवी मुंबईतलं कोपरखैरणे.

पोलिसांच्या पथकाने जे लोकेशन ट्रेस केलंय तिकडे आपली गाडी वळवली. पुढच्या दोन तासात पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. लाल रंगाची सिद्धार्थची गाडी नवी मुंबईतल्या कोपरखैरणे भागात एका निर्जन स्थळी लावण्यात आली होती. गाडीत रक्ताचे डाग होते. त्यावरून नक्की कोणालातरी संपवण्यात आलंय याचा अंदाज पोलिसांना आला. मात्र तो सिद्धार्थच असेल याची खात्री कोणीच देऊ शकत नव्हतं. पोलिसांनी संपूर्ण गाडी धुंडाळून काढली; मात्र त्यामध्ये विशेष असं त्यांना काहीच मिळालं नाही.

गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या खाली एक रक्ताने माखलेला पांढरा रुमाल पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तो रुमाल ताब्यात घेऊन फॉरेन्सिक रिपोर्टसाठी लॅबला पाठवला. हातावरचे रक्ताचे डाग पुसण्यासाठी खुन्याने हा रुमाल वापरला होता. त्यामुळे या रुमलावर त्याच्या हाताचे ठसे मिळण्याची दाट शक्यता होती. पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढच्या तपासाला सुरुवात केली.

आतापर्यंतच्या तपासात फक्त एक रुमाल आरोपींपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल अशी आशा पोलिसांना होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात सकाळी आठच्या सुमारास फोन खणाणला. ठाण्यातल्या एका निर्जन स्थळी कमरेभर गवतात एक कुजलेला मृतदेह नागरिकांना आढळला होता. हा मृतदेह सिद्धार्थच्या चेहऱ्याशी मिळताजुळता होता. ठाणे ग्रामीण पोलिसांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याची माहिती दिली होती, लागलीच पोलिसांचे एक पथक तिकडे रवाना झाले. मृतदेहाची ओळख पटली होती आणि तो मृतदेह होता सिद्धार्थ संघवीचा.

एका बड्या बँकेच्या चेअरमनला ठार करण्याचं कारण काय, कोण होते आरोपी, आरोपीला पैसा हवा होता, पद हवं होतं की प्रतिष्ठा या सगळ्यांचा उलघडा समजून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचाच…

क्रमश:

Inside The Crime मधल्या याही घटना नक्की वाचाच…

Inside The Crime |01| ती अंधेरीच्या पब्लिक ब्रिजवर चालत होती, अचानक तिच्या मागे कसलातरी स्पर्श झाला, ती थबकली आणि…

Inside The Crime |02| अंधेरीच्या पब्लिक ब्रिजवर आज तो पुन्हा आला होता; परत कोणाची तरी साडी जाळणार होता…

Inside The Crime |03| बायकोने साखर नाही दिली आणि एचडीएफसी बँकेच्या चेअरमनचा खूण झाला…

Inside The Crime | 04 | सीटखालच्या रक्त लागलेल्या रुमालमुळे सिध्दार्थ संघवीच्या खून्याचा शोध लागला…

Inside The Crime |05| शोध 23 वर्षे न सापडलेल्या घराचा…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments