आपलं शहर

मुंबईतले ‘हे’ तेरा पुल धोकादायक! गणेशोस्तवाच्या काळात या पुलांचा प्रवास टाळावा…

गणेशोस्तव आला की ज्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असते, त्या ठिकाणांची खबरदारी घेताना मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन पाहायला मिळतं. अशातच यंदाही महानगरपालिकेकडून मुंबईतल्या नऊ पुलांची यादी जाहीर केली आहे आणि त्यासोबतच या पुलांवर गणेशोस्तवाच्या दिवसात गर्दी करू नये, असं आवाहनही मुंबईकरांना करण्यात आलय.

मुंबईत असे अनेक रेल्वे ब्रिज आहेत, जे जुने आहेत किंवा ज्यांचं दुरुस्तीचं काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. अशा रेल्वे उड्डाण पुलांवर गणेशोत्सव कालावधीत अतिभार होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती पोलीसांकडून करण्यात आली आहे.

मुंबईतील ब्रिटीशकालीन पूलांचा किंवा ज्यांचं दुरुस्तीचं काम सुरु असलेले रेल्वे उड्‌डाण पुलांचा गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये वापर करताना गणेश भक्तांनी तसेच जनतेने योग्य काळजी घ्यावी. या पुलांचा मूर्ती आगमन अथवा विसर्जन प्रसंगी उपयोग करताना पुलांवर अतिभार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. जास्तित जास्त 4 फुटांची मुर्ती, आगमन किंवा विसर्जन मिरवणूकीला परवाणगी नाही. विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी सगळ्याचं मिरवणुका टाळाव्यात, उत्सवाच्या निमित्ताने गर्दी होणार नाही याचे भान राखून, उत्सवाचे पावित्र्य जपून गणेशोत्सव साजरा करण्याचे यावर्षी सर्व गणेश भक्तांना करण्यात आलं आहे.

काय आहेत नियम?

  1. मिरवणुकांना परवाणगी नसल्याने मूर्ती आगमन/विसर्जनाच्या वेळेस पुलांवर गर्दी करु नये
    पुलांवर थांबून राहू नये
  2. अनेक ब्रिटिश कालिन पुलांवर एकाच वेळेस भाविक आणि वाहने असं मिळून 16 टनापेक्षा अधिक वजन होणार नाही, याची दक्षता घ्यावी
  3. पुलांवर ध्वनिक्षेपकांचा वापर करू नये
  4. पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरून पुढे जावे
  5. पोलीस व महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे

कोणते पूल अतिदक्षता घेण्यासारखे…
मध्‍य रेल्‍वेवरील
1) घाटकोपर रेल्वे उड्डाण पूल 2) करीरोड रेल्वे उड्डाण पूल 3) ऑर्थर रोड रेल्वे उड्डाण पूल 4) भायखळा रेल्वे उड्डाण पूल

पश्चिम रेल्वेवरील
1) मरीन लाईन्‍स रेल्वे उड्डाण पूल 2) सँडहर्स्‍ट रोड रेल्वे उड्डाण पूल 3) ग्रॅन्‍ट रोड व चर्नी रोडदरम्यानचा उड्डाण पूल 4) केनडी रेल्वे उड्डाण पूल 6) ग्रॅन्‍ट रोड व मुंबई सेंट्रलदरम्यानचा उड्डाण पूल 6) बेलासीस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील उड्डान पूल 7) महालक्ष्‍मी स्‍टील रेल्वे उड्डाण पूल 8) प्रभादेवी- कॅरोल रेल्वे उड्डाण पूल 9) दादर – टिळक रेल्वे उड्डाण पूल

विशेष म्हणजे चिंचपोकळी रेल्वे उड्डाण पूल, करी रोड रेल्वे उड्डाण पूल, व ऑर्थररोड उड्डाणपूल या पूलांवरून ज्यांची रहदारी आहे, अशा अनेक गणेश भक्तांना खबरदारी घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बाप्पाच्या विसर्जनासाठी फक्त एक कॉल; फिरता तलाव येणार सोसायटीच्या दारात…

मुंबई पोलिसांचा अजून एक नियम! तुम्ही रस्त्यावर गाडी चालवत असाल तर तुम्हाला पकडणार आणि…

धारवीचा पॅटर्न फिलिपाईन्समध्ये राबवणार; WHO, New York Times कडून होतय कौतूक…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments