एकदम जुनं

मुंबईतल्या पहिल्या गणेशोस्तवाची सुरूवात नेमकी कशी झाली?

गणपती बाप्पा मोरया! असं वाक्य जरी म्हटलं तर अनेकांच्या मनात तेज निर्माण होतं असतं. एक उत्साह निर्माण झालेला असतो. संगीत, परंपरा, खाद्यपदार्थ आणि धूमधामांनी भरलेली मुंबई असं काहीसं चित्र आपल्याला दरवर्षी मुंबईत पाहायला मिळत असतं. परंतु या सगळ्या गोष्टींची सुरूवात जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आधुनिक काळातील मंडळे आणि ग्लॅमरपासून खूप मागे जावं लागेल.

How did the first Ganeshotsav start in Mumbai?

सन 1893 मध्ये संपुर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून गणेश चतुर्थी साजरी करण्यास सुरूवात झाली होती, त्याच वर्षी गिरगावातील केशवजी नाईक चाळीत देखील सार्वजनीक गणपतीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पर्यावरणपूरक उत्सव आणि छोट्या गणेश मूर्तीसाठी हे मंडळ आजही प्रसिध्द आहे. 1992 मध्ये केशव नाईक चाळत गणेशोस्तवाचा शताब्दी उत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा याच गणेशोस्तवाचं 127 वं वर्ष आहे.

मुंबईत जर कोणी विचारलं, की मुंबईतला पहिलं गणेश मंडळ कोणतं? आणि पहिली मुर्ती कुठे स्थापन झाली? त्याचं उत्तर आहे, खाडीलकर मार्ग, चर्णी रोड येथील केशवजी नाईक चाळीत गणपती उत्सवाची सुरूवात झाली.

1892 मध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र यावे व त्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम एकत्रित साजरा करावा असे आवाहन केले होते, तेव्हापासून इथे उत्सव सुरू झालाय, त्यावेळी टिळक यांचे काही अनुयायी आमच्या चाळीत राहात होते, अशी माहिती या सर्वजनीक गणेशोत्सव संस्थेचे अध्यक्ष विनय रहाटेकर यांनी दिली.

लोकमान्य टिळकांना लोकांना एकत्र करायचे होते. त्यांचे अनुयायीदेखील आमच्या चाळीत तेच करत होते. लोकमान्य टिळकांचे अनुयायी राओबाहादुर लिमये आणि नरहरिश्तरी गोडसे हे त्यावेळी आमच्या चाळीत राहायचे. या महोत्सवाच्या सुरूवातीसाठीदेखील त्यांनीच पुढाकार घेतला. असे मत श्री सर्वजनीक गणेशोत्सव संस्थेचे विश्वस्त विनोद सातपुते मांडले आहे.

इथल्या मूर्तीचा आकार हा जास्तीत जास्त दोन फुटांचा असतो. मुर्ती शाडू-मातीपासून बनवलेली असते आणि पर्यावरणाशी अनुकल असलेलं साहित्य आम्ही पुजेला वापरत असतो. ज्या कुटुंबाने पहिली मूर्ती बनविली त्याच कुटुंबातील चौथी पिढी दरवर्षी या मंडळासाठी मुर्ती बनवत असते. अशी माहिती रहाटेकर यांनी दिली. त्यामुळे मुंबईच्या ग्लॅमर दुनियेतही आपलं भुतकाळातील अस्तित्व टिकवून ठेवणारं एकमेव आणि सर्वात जुनं मंडळं म्हणजे श्री सार्वजनिक गणेशोस्तव मंडळाची ओळख आहे, हे नक्की!

The story of the first Ganapati and the first article in Keshari

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments