एकदम जुनं

पाहा; मुंबईतला पहिला स्वातंत्र्य दिवस कसा साजरा झाला?

आज संपुर्ण देशभरात 74 वा स्वातंत्र दिवस साजरा केला जात आहे. वंटास मुंबईच्या वाचकांनाही स्वातंत्रदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

देशाची राजधानी दिल्ली, हे स्वातंत्र्यदिनाचा केंद्रबिंदू असतो. पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लालकिल्ला इथून स्वातंत्र्य भारताची पहिली घोषणा केली, मात्र अनेकांना ही गोष्ट अद्याप माहित नाही, की मुंबईमध्ये पहिला स्वातंत्र दिवस कसा साजरा केला? हेच आपण आजच्या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

mumbai 1st independence day
मुंबईच्या सचिवालय कार्यालयासमोर पहिलं ध्वजारोहण करण्यात आलं, तो क्षण

सन 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांची फाळणी झाली, मात्र देशातील राज्यांची फाळणी झाली नव्हती. देशातील प्रथम नागरिक म्हणून दिल्लीच्या लालकिल्ल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र देशाचं प्रतिनिधित्व दिल्लीतून केलं, तर प्रांतनुसार त्या त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना राज्याचं प्रतिनिधित्व करण्याचे फर्मान सोडलं. त्यानुसार त्यावेळेच्या बाँबे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर यांनी ही जबाबदारी पार पाडली.

mumbai sachivalay
बाँबे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खरे

15 ऑगस्ट रोजी बाळासाहेब खेर यांनी मुंबईच्या सचिवालयासमोरील मैदानात पहिलं ध्वजारोहण केलं. दरवर्षीप्रमाणे राज्यातील अनेक पथकांनी या मैदानात संचलनही केलं. रॉयल इंडियन नेव्ही, शीख रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, मुंबई पोलीस, ब्रिटिश ट्रूप, होम गार्ड अशा पथकांनी भारतीय ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला.

mumbai 1st independence day
इंडियन नेव्ही ,ध्वजाला सलामी देताना

गिरणगावातला मोठा जनसमुदायही या स्वतंत्रदिनास उपस्थित होता. अनेक महिलांनी इथल्या मिरवणुकीचं प्रतिनिधित्व केलं होतं. तर पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे पोस्टर हातात घेऊन आणि संपुर्ण हिंदी स्वातंत्र्याच्या घोषणा देत, मुंबईतला पहिला स्वातंत्रदिवस पार पडला.

mumbai 1st independence day
मुंबईतल्या गिरणगावात असा उत्साह होता

पाहा मुंबईतला पहिला स्वातंत्र्यदिन…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments