खूप काही

Inside The Crime |02| अंधेरीच्या पब्लिक ब्रिजवर आज तो पुन्हा आला होता; परत कोणाची तरी साडी जाळणार होता, मात्र तितक्यात…

महिलांच्या अंगावर तो द्रव पदार्थ फेकून असुरी आनंद लुटणाऱ्या राक्षसाचा शोध पोलिसांनी सुरू केला होता; पण तो विकृतदेखील पोलिसांना गर्दीतून गुंगारा देत होता. अखेर 15 दिवसांनी हे प्रकरण मिटलं आणि तो नराधम पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

अंधेरीत घडलेल्या त्या प्रकारामुळे मीरा आणि नेहाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या माथेफिरुचा शोध सुरू केला होता. अंधेरीतल्या त्या हजारोंच्या गर्दीतून त्या नराधमाचा चेहरा शोधनं पोलिसांसमोर सगळ्यात मोठ आव्हान होतं. पोलीसांच्या वेगवेगळ्या तुकड्या त्या स्टेशन परिसरात तैनात करून लोकांच्या गर्दीत त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र यश मिळत नव्हतं.

स्टेशन परिसरातले सर्व सीसीटीव्ही फुटेज पिंजूनदेखील हाती कोणतेच धागेदोरे लागत नव्हते; पण दोन दिवसातून एक तरी तशीच तक्रार पोलिसांकडे येत होती. पोलीस चक्रावून गेले होते. त्या विकृताला लवकरात लवकर पकडणे गरजेचे होते. त्यानुसार पोलिसांचे अथक प्रयत्न सुरूच होते.

महिलांच्या अंगावर फेकण्यात आलेल्या त्या द्रव पदार्थाचे फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांच्या ज्यावेळी हाती लागले, त्यावेळी त्यांना धक्काच बसला. कठिण पदार्थ तुटतात त्यावेळी ते चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारे उच्च प्रतीचं फेविक्विक असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते; पण ते फेविक्विक कोण आणि कशासाठी म्हणून महिलांच्या अंगावर फेकतं, हे मात्र अनुत्तरित होतं.

गेल्या 7 दिवसात जवळपास 8 पेक्षा अधिक तशाच प्रकारच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. संपूर्ण अंधेरी स्टेशन परिसरात या प्रकारामुळे गोंधळ उडाला होता. अंधेरी स्टेशनमधून प्रवास करणाऱ्या अनेक महिलांना ही गोष्ट बातमीच्या माध्यमातून समजली होती. त्यांच्या बाबतीत चुकूनही असा प्रकार घडू नये म्हणून त्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. पोलीस त्या विकृताला पकडण्यासाठी जीवाचं रान करत होते.

सोमवारचा दिवस होता. सीसीटीव्ही फुटेज ज्या खोलीतून तपासल जातं आणि संपूर्ण स्टेशनवर जिथून नजर ठेवली जाते, त्या खोलीत पोलीस बसले होते. महिलांच्या एका घोळक्याच्या मागे निळा शर्ट घातलेला एक पचवीशीतला तरुण त्या घोळक्याच्या मागे मागे चालताना दिसत होता.

एका अधिकाऱ्याची नजर त्याच्यावर पडली आणि ते बारकाईने त्याच्याकडे पाहू लागले. तो आजूबाजूला पाहून वातावरणाची चाहूल घेत होता. आपल्याकडे कोणी बघत नाही याची खात्री करत होता. अचानक त्याने खिशातून कसलीतरी बाटली काढली आणि ती समोरच्या दिशेने करून त्यातील द्रव एका महिलेच्या पाठीमागच्या बाजूला टाकला. हे पाहताच तो अधिकरी खडबडून उभा राहिला. इतके दिवस आपण शोधत असलेलं सावज त्याला सापडलं होत. लागलीच टीमला याची खबर देण्यात आली आणि पोलिसांच्या दोन तुकड्या घटना घडलेल्या पब्लिक ब्रिजवर पोहोचल्या.

ज्या महिलेवर द्रव फेकण्यात आलं होतं तिला महिला पोलिसांनी बाजूला नेलं. त्या अधिकर्यांची नजर त्या गर्दीत निळा शर्ट असलेल्या त्या तरुणाला शोधत होती; मात्र जवळपास एक तास शोधूनही तो सापडला नाही. तो निघून गेला होता. नजरेत आलेलं सावज पकडण्यात अपयश आल्याने तो पोलीस अधिकारी निराश झाला होता. संपूर्ण टीमसुद्धा काहीशी असमाधानी होती. त्या अधिकाऱ्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं.

आरोपी ज्यावेळी ब्रिजवर दिसला ती वेळ सकाळी साडेनऊच्या आसपासची होती. ज्या प्रकारे गेल्या काही दिवसात या घटना घडल्या आहेत, त्या सकाळी साडेनऊ आणि संध्याकाळी 6 च्या सुमारास घडल्या होत्या. याचा अर्थ आरोपी रोज सकाळी कुठेतरी जातो आणि संध्याकाळी पून्हा याच वाटेने परत येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या आसपास रेल्वे स्थानकात त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्याचा प्लॅन बनवण्यात आला. त्याप्रमाणे महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सध्या वेशात तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले.

मंगळवारी सकाळी अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा आज काही करून छडा लावलाच हवा याबद्दल तयारी सुरू होती. सर्व अधिकारी तयारीत होते. पावणे नऊच्या सुमारास सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन योग्य त्या ठिकाणी तुकड्या तैनात करण्यात आल्या. काही करून आरोपी सुटणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्या असंख्य गर्दीत तो नराधम आज पोलिसांच्या हाती लागण्याची आशा पोलिसांना होती.

पोलीस निरीक्षक सावंत आदल्या दिवशीप्रमाणे कंट्रोल रूममध्ये सीसीटीव्ही वर नजर ठेवत बसले होते. 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास त्याच निळ्या रंगाचा शर्ट घालून तो नराधम गर्दीत घुसला. सावंत यांच्या नजरेने त्याला वेधलं. लगेच वॉकीटॉकी वरून टीमला खबर देण्यात आली. निळ्या रंगातलं ते लक्ष असल्याचं सांगून त्याला काही करून पकडा असे आदेश देण्यात आले.
पोलिसांच्या टीमने आरोपीवर झडप घातली. ताबडतोब त्याच्या खिशात असणारी ती फेविक्विकची बाटली पोलिसांनी ताब्यात घेतली. पुढच्या 10 मिनिटात आरोपी सावंत यांच्या समोर उभा होता. समोर येताच सावंत यांनी त्याच्या दोन कानाखाली वाजवल्या आणि प्रश्नांचा भडिमार सुरू केला.

आरोपीला खाकी वर्दीचा दणका बसताच तो बोलायला लागला. मूळचा उत्तरप्रदेशचा असणारा दीपक कनोजिया दोन वर्षांपासून मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरात राहात होता. लोवर परेलजवळ एका फर्निचरच्या दुकानात काम करत असल्यामुळे त्याच्याकडे ही उच्च दर्जाची फेविक्विकची बाटली होती; पण कामाच्या ठिकाणावर ती बाटली न ठेवता तो नेहमी त्याच्या सोबत ठेवत होता.

रेल्वे स्टेशनवर चालत असताना महिलांच्या अंगावर फेविक्विकचा मारा करायचा आणि थोडे पुढे जाऊन पीडितेच्या अस्वस्थ हालचाली न्याहाळण्याची विकृत सवय त्याला लागली होती. या प्रकारात राक्षसी आनंद लुटणाऱ्या दीपक कनोजियाने दर दोन दिवसात हा प्रकार करायाला सुरुवात केली होती. परिणामांची कसलीही पर्वा न करता स्वतःच्या आनंदासाठी तो अनेक महिलांना सावज बनवत होता, अखेर या पर्वाचा शेवट झाला. अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी या प्रकारचा छडा लावून त्याला तुरुंगात धाडलं, आणि स्टेशनमधून प्रवास करणाऱ्या महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला.

समाप्त…

मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वाचं रुप मांडण्यासाठी | Inside The Crime | हा नवा अध्याय आपण सुरू करत आहोत. मुंबईच्या मायानगरीत घडणाऱ्या अनेक घटना, ज्या तुमच्याही आयुष्यातल्या अविभाज्य घटक बनून जातात, त्या संपुर्ण घटना समजून घेण्यासाठी रोज वंटास मुंबईला नक्की भेट द्या…

या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…????????

Inside The Crime | ती अंधेरीच्या पब्लिक ब्रिजवर चालत होती, अचानक तिच्या मागे कसलातरी स्पर्श झाला, ती थबकली आणि… (Part 01) 

Inside The Crime मधल्या याही घटना नक्की वाचाच…

Inside The Crime |01| ती अंधेरीच्या पब्लिक ब्रिजवर चालत होती, अचानक तिच्या मागे कसलातरी स्पर्श झाला, ती थबकली आणि…

Inside The Crime |02| अंधेरीच्या पब्लिक ब्रिजवर आज तो पुन्हा आला होता; परत कोणाची तरी साडी जाळणार होता…

Inside The Crime |03| बायकोने साखर नाही दिली आणि एचडीएफसी बँकेच्या चेअरमनचा खूण झाला…

Inside The Crime | 04 | सीटखालच्या रक्त लागलेल्या रुमालमुळे सिध्दार्थ संघवीच्या खून्याचा शोध लागला…

Inside The Crime |05| शोध 23 वर्षे न सापडलेल्या घराचा…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments