फेमस

धोनीचे ‘हे’ विक्रम पाहिले, तर त्याला तुम्ही क्रिकेटचा बापमाणूस म्हणाल…

भारतीय क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेल्या महेंद्रसिंग धोनीने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ शेयर करत आपल्या क्रिकेटमधील जुन्या आठवणींना उजाळा देत आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची अधिकृत घोषणा केली आणि संपूर्ण भारतात चाहत्यांना एक दुःखद धक्का बसला.

वयाच्या 23 व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवून भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या सच्चा क्रिकेट भक्ताने आज आपली अंतराष्ट्रीय घोडदौड थांबवली आहे.

भारताला क्रिकेटमध्ये नंबर वनवर पोहचवणं असो किंवा वर्ल्ड कप जिंकून देणं असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी कामगिरी धोनीने वारंवार करत क्रिकेट रसिकांवर आपली विलक्षण छाप पाडली आहे.

आयसीसीच्या सर्व मालिका जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीने 2007 मध्ये टी-ट्वेंटी, 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप तर 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून भारताला अनेक देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर नेऊन ठेवलं आहे.

2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकले आहे. टी-20 प्रकारात सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचा विक्रम आहे. त्याने 72 पैकी 41 टी-20 सामन्यात विजय मिळवला आहे.

धोनी हा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार म्हणून ओळखला जातो आणि ओळखला जाईल, यात शंकाच नाही. त्याने भारतीय संघाला 27 कसोटी, 110 वनडे आणि 41 टी-20 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.

धोनीने अनेक वेळा षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. वनडेत धोनीने 9 वेळा षटकार मारून विजय मिळवून दिला असून हा देखील एक विक्रम धोनीच्या नावावर आहे. अशी कामगिरी करणारा धोनी हा जगात एकमेव खेळाडू आहे.

2015 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत 3-0 असे पराभूत केले होते. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या 140 वर्षाच्या इतिहासात प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर एखाद्या संघाने क्लीन स्वीप केले आहे.

2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीने षटकार मारत 28 वर्षानंतर भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. ज्या बॅटने धोनीने षटकार मारला होता, त्याचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावात बॅटची किमत एक लाख पाऊंड इतकी ठरवण्यात आली होती.

धोनीच्या कारकिर्दीत आतापर्यंत भारताने चार विश्वचषक जिंकले आहेत. यातील 2011मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध 274 धावा करत मिळवलेला विजय हा सर्वोच्च आहे. यात धोनी असा एकमेवर फलंदाज आहे, ज्याने षटकार मारत विजेतेपद मिळवले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्प करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्याने कसोटीत 38, वनडेत 122 आणि टी-20 मध्ये 33 स्टम्प्स विकेट्स घेतल्या आहेत.

भारताचा सर्वात यशस्वी विकेटकिपर अशी धोनीची ओळख आहे. धोनीने कसोटीत 294 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय वनडेत 394 आणि टी-20 मध्ये 87 विकेट घेतल्या आहेत. कसोटीमध्ये विकेटकिपर म्हणून कसोटीत द्विशतक करणारा धोनी एकमेव खेळाडू आहे.

धोनीने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत अशी कामगिरी केवळ 14 खेळाडूंना करता आली आहे. पण 50 हून अधिकच्या सरासरीने 10 हजार धावा करणारा धोनी हा पहिला खेळाडू आहे. अशी कामगिरी विराट कोहलीने देखील केली आहे.

धोनीने आयपीएलमध्ये 104 सामने जिंकले आहेत. त्याच्या विजयाची टक्केवारी 60 टक्के इतकी आहे. या स्पर्धेत 100 हून अधिक सामने जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.

धोनीला चौकार आणि षटकारांचा राजा या नावाने ओळखले जाते. त्याने एकदिवसीय सामन्यात 825, कसोटीत 544 आणि टी-20मध्ये 116 चौकार लगावले आहेत. षटकारांबद्दल म्हणायचे झाल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये 228 षटकार तर, कसोटीत 78 आणि टी-20मध्ये 52 षटकार लगावले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments