फेमस

अंबानींच्या घरातील Inside Photo; या लक्झरी घरासमोर अरबोंची संपत्तीही ठरली फेल…

मुकेश अंबानी यांचे नाव जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत अगदी टॉपला असतं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी हे जगातील सर्वात महागड्या आणि शानदार घरात राहतात. जेव्हा जगातील सर्वात सुंदर घरे, राजवाडे आणि इमारतींचा विचार केला जातो, तेव्हा अंबानींच्या घराचा नक्कीच अँटिलियाचा उल्लेख आहे.

522b7b29ea31379b2ad50d9faff5ae85

भारतातील ग्लॅमरस आयुष्य जगणाऱ्या अनेक कुटुंबातील एक म्हणजे अंबानी फॅमिली. हे संपुर्ण कुटुंब सहसा बॉलिवूड सेलिब्रिटींसह बघायला मिळते. 27 मजली अँटिलीया इमारत मुंबईच्या दक्षिणेस अल्टमाउंट रोडवर आहे. अँटिलिया 4,00,000 स्क्वेयर फूट (4,00,000 square feet) इतक्या जागेवर उभारण्यात आले आहे.

room660 090914125047

अँटिलियाच्या खाली पहिले सहा मजले पार्किंगसाठी आहेत. त्यामध्ये  एकाच वेळी 168 कार पार्क केल्या जाऊ शकतात. हे घर शिकागो आर्किटेक्ट पार्किन्स अँड विल यांनी बांधले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे घर Mythical Atlantic Island ला नजरेसमोर ठेवून बनवण्यात आलं आहे.

 

पार्किंगच्या वरील मजल्यामध्ये 50 सीटर सिनेमा हॉल आणि त्यावरील मजल्यावर गार्डन बनवण्यात आलं आहे. मुकेश अंबानी कुटुंबासमवेत एकदम टॉपपासून दुसऱ्या मजल्यावर राहतात. येथे राहण्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळे मजले आहेत.

83866614 1070801496587421 319584440549941568 n.jpg? nc ht=scontent lax3 1.cdninstagram

मुकेश अंबानी यांच्या घरात एका मजल्यापासून दुसर्‍या मजल्यापर्यंत जाण्यासाठी तब्बल 9 लिफ्ट आहेत. घरात आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. अँटिलीयामध्ये तीनहून अधिक स्विमिंग पूल असल्याची माहितीदेखील समोर येत आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरात हेलिपॅड, जिम, सिनेमा हॉल आणि अशा अनेक सुविधांची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. हे घर खूपच सुंदर आहे आणि आपण घरातूनच मोकळं आकाश आणि समुद्राच्या लाँग व्ह्यू आपण पाहू शकतो. त्यासाठी समुद्रावर जाण्याची गरजच नाही पडत.

 

गर्मीचा त्रास जाणवू नये म्हणून घरात एक आईस रूमही बनविण्यात आली आहे. प्रत्येक मजल्याचे इंटीरियर हे वेगवेगळ्या प्रकारे बनवले आहे, त्यामुळे या घरात तुम्हाला एकदा जाण्याची संधी मिळाली तर बाहेर येण्याचं नाव तुम्ही कधीच घेणार नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments