आपलं शहर

मुंबईत 4 दिवसात 2000 गाड्या जप्त; सगळ्यांना सांगितलं एकच कारण…

आज गणपतीचा सण असताना अनेकांना हा सण घरात कुटुंबासोबत नाही तर पोलीस ठाण्यात पोलिसांसोबत साजरा करावा लागत आहे. कारणही अगदी तसच आहे. कारण अनलॉकच्या तोंडावर मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना चांगलच गोत्यात घातल्याचं पाहायला मिळत आहे.

कोणतंही काम नसताना, किंवा बाहेर पडण्याचा कोणताही परवाना सोबत नसताना जे मुंबईकर घराबाहेर पडत आहेत, अशांना खाकी वर्दी दाखवण्यास मुंबई पोलिसांनी सुरूवात केली आहे. मुंबई वाहतुक पोलिसांनी गेल्या 4 दिवसात तब्बल 2000 हून अधीक गाड्या जप्त केल्या आहेत. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून ही वाहने जप्त केली असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तुमच्याकडे कोणता अत्यावश्यक सुविधेमध्ये काम करत असल्याचा पुरावा नसला तर वाहन चालवू नका.

काही दिवसांपुर्वी मुंबई पोलिसांनी स्वत:च्या ट्विटर हँडलवरून एक माहिती दिली होती. जर विनाकारण किंवा विनापरवाना तुम्ही रस्त्यावर गाडी चालवत असाल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, अशाप्रकारचं ते ट्विट होते, मात्र त्याचवेळी अनेक नागरिकांनी संतापही व्यक्त केला होता. आता मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे मुंबईकर पुन्हा वैतागले आहेत.

सगळेचजण आपल्या कामासाठी घरातून बाहेर पडत आहेत. अनेकांवर उपाशी राहाण्याची वेळ आली आहे, त्यामुळे पैसा कमवण्यासाठी जर सगळे बाहेर पडले असतील, तर त्यांची काय चुक आहे. नेमकंविनाकारण आणि विनापरवाना यामधल्या फरक पोलिसांनी सांगितला तर बरं होईल, असा सवाल नागरिक विचारताना दिसत आहेत.

सध्या वाहतुकीच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. रिक्षा सारख्या तीन चाकी वाहनांमध्ये फक्त दोन प्रवासी आणि चालक तर चार चाकी वाहनांमध्ये 3 प्रवासी आणि 1 चालक अशी परवानगी दिली आहे. मात्र मुंबईतल्या अनेक भागांमध्ये यापेक्षा काही वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. पण ही मर्यादा पाळली जात नसल्याचं पोलिसांचं समजण्यात आलय, त्यामुळे मुंबई पोलिसांनी ही धडक कारवाई सुरू केलीआहे.

मंगळवारी 250, बुधवारी 92, गुरुवारी 636 आणि शुक्रवारी सायंकाळी 550 आणि याआधी आणखी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत आणि मुंबई पोलिसांची ही कारवाई सुरूच आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments