एकदम जुनं

एका हाफकिनमुळे कायमची बंद होणारी मुंबई वाचली…

युक्रेनच्या ओडेसा येथे जन्मलेल्या वाल्डेमर मॉर्डेकई हाफकिन यांचे भारतात येणं हा केवळ एक योगायोग होता. आपल्या आयुष्यातील 22 वर्षे त्यांनी भारतात घालवली. त्यांना सेंट पिट्सबर्ग कडून डॉक्टरेट पदवी मिळाली होती, परंतु ते प्राध्यापक होऊ शकले नाहीत, कारण जारच्या रशियन साम्राज्यातील यहुदींना इतके मोठे पद कधीच मिळत नसे, या घटनेमुळे त्यांनी आपला देश सोडण्याचा निर्णय घेतला.

आपला देश सोडल्यानंतर हाफकिन जिनिव्हाला पोहोचले. येथे त्यांना शरीरविज्ञानच्या (फिजियोलॉजी) विद्यार्थ्यांना शिकवण्याची नोकरी मिळाली, मात्र यात ते समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी रशियाचे आपले गुरू लुई पाश्चर यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.

हाफकिन यांना पाश्चर संस्थेत सहाय्यक ग्रंथालयाचे पद मिळाले, ते पद सांभाळत त्यांनी बॅक्टेरियोलॉजीचा अभ्यास सुरू केला, जे कॉलरा सारख्या महाभयंकर रोगावर लस शोधण्याच्या कामास मदत करणार होते. हाफकिनने पहिल्यांदा कोंबडीची पिल्ले आणि जिन पिग यांच्यावर या लसीची चाचणी करण्याचे ठरवले. त्यानंतर स्वत:वर त्या लसीचा प्रयोग करून पाहिला. त्यांनी तयार केलेली लस ही दोन इंजेक्शनच्या स्वरुपात होती, जी ठराविक वेळेनंतर रुग्णाला एकापाठोपाठ एक देणे गरजेचे होते.

ही लस यशस्वी ठरणार आहे, हे फक्त हाफकिन सोडून बाकी कोणालाच मान्य नव्हतं. हाफकिन यांनी या लशीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा विचार केला, तेव्हा सर्व शास्त्रज्ञ त्यांच्याशी सहमत नव्हते. इतकच काय, त्यांचे गुरू लुई पाश्चरसुद्धा याला सहमत नव्हते.

या लसीचा दावा चुकीचा ठरला जात होता कारण असे म्हटले जात होते की कॉलरा हा मुख्यतः आतड्यांसंबंधी रोग आहे आणि ही लस त्यासाठी लागू होऊ शकणार नाही. त्याचदरम्यान, हाफकिनने लॉर्ड फ्रेडरिक हॅमिल्टन डफरीन यांची भेट घेतली, लॉर्ड हे त्यावेळी पॅरिसमध्ये ब्रिटीश राजदूत होते आणि काही वर्षांपूर्वी त्यांनी भारताचे व्हाइसराय म्हणून काम पाहिलं होतं.

भारतातल्या कोलकात्यात क्वालरा तर मुंबई आणि पुण्यात प्लेगच्या साथीने जोर धरला होता. त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता. लॉर्ड फ्रेडरिकचा असा विश्वास होता की ही लस बंगालमध्ये वापरली जावी. लॉर्डच्या प्रयत्नांनी लवकरच हाफकिन भारतात येणार होते.

मार्च 1893 मध्ये जेव्हा हाफकिन कोलकात्यात पोहोचले, तेव्हा तेथे अनेक प्रकारचे विरोध त्यांना होऊ लागले होते. जर ही लस यशस्वी ठरली नाही, तर असाही संशय त्यांच्यावर घेतला जाऊ लागला होता. सोबतच देवांवर आणि दैवी शक्तींवर विश्वास ठेवणारे भारतीय दोन वेदनादायक इंजेक्शन्स घेण्यास कसे तयार होतील? असाही प्रश्न हाफकिन यांना उलट विचारण्यात आला होता. तरीही हाफकिन यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

देशात सामान्य नागरिकांसोबत सैनिकांनाही प्लेगच्या साथीने गाठलं होतं, त्यामुळे सैनिकांनी हाफकिनच्या लशीसाठी तयारी दाखवली, कारण त्यावेळी भारतात दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. आग्रापासून सुरूवात केलेल्या हाफकिनने मुंबईमध्ये येईपर्यंत सुमारे 10 हजार सैनिकांना इंजेक्शन दिले आणि हा प्रयोग यशस्वी झाला होता. त्यानंतर हाफकिनने प्लेगचं केंद्रस्थान असलेल्या मुंबईकडे आपलं लक्ष वळलं. 1896 सालात ते मुंबईला आले.

मुंबईतल्या सध्याच्या जे.जे. रुग्णालयात प्रयोगासाठी आणि चाचण्यांसाठी एक खोळी मिळवली. या खोलीत प्रयोग करणे हाफकिन यांना अवघड होऊ लागलं होतं. त्यामुळे त्याकाळच्या खोजा जातीच्या धर्मगुरुंनी भायखळा येथे असणारं खुश्रोलॉज हे राहातं घर हाफकिन यांना वापरायला दिलं. तिथे हाफकिन यांनी मोकळेपणाने प्रयोग करण्यास सुरूवात केली.

मुंबईत आल्यानंतर हाफकिनने रशियाप्रमाणेच प्रयोगांना सुरूवात केली. त्यांनी पहिली चाचणी झुरळावर आणि दुसरी चाचणी आपल्यावर केली. त्यानंतर खरी परीक्षा शेजारी असलेल्या भायखळा कारागृहातील कैद्यांवर करण्यात आली. त्या दिवसांत कैद्यांवर औषध चाचणी ही नवीन नव्हती.

या चाचणीसाठी 154 कैद्यांना तयार करण्यात आले, पहिल्यांना त्यांना प्लेगची लागण होऊ दिली आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यास सुरूवात केली. लसीच्या पहिल्याच दिवशी तीन कैद्यांचा मृत्यू झाला. पुढच्या काही आठवड्यांत आणखी काही कैद्यांचा मृत्यू झाला, पण काही कैद्यांनी प्लेगवर मात केली, त्यामुळे मुंबईतल्या प्रमुख डॉक्टरांनी हा प्रयोग यशस्वी मानला आणि त्यानंतर लवकरच संक्रमित भागातील एक हजार लोकांना ही लस देण्यात आली आणि असं करत अनेकांनी प्लेगवर यशस्वीपणे मात केली.

हाफकिनच्या या कारकिर्दीमुळे 1925 मध्ये ग्रँट हॉस्पिटलच्या प्रयोग शाळेचे नाव हाफकिन इंस्टीट्यूट ठेवण्यात आलं, तर मुंबईच्या परळ भागात हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था सुरू करण्यात आली.

हा लेख तुम्हाला कसा वाटला, तसेच अशा अनेक विषयांची माहिती तुम्हाला हवी असेल, तर आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. आणि आमच्या फेसबुक, युट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या चॅनेलला भेट द्या.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments