कारण

फक्त ‘या’ कारणांमुळेच मुंबईत दरवर्षी पाणी साचतं…

पावसाळा आला की मुंबईच्या नाल्यांबद्दल, त्यांच्या साफसफाईबद्दल अनेक चर्चा सुरू केल्या जातात. त्यासोबतच मुंबईच्या ज्या ठिकाणी पाणी साचतं; अशा ठिकाणांच्या चर्चांनाही उधाण आलेलं असतं. मात्र एक प्रश्नाचं उत्तर कधी आपल्याला मिळत नाही, ते म्हणजे मुंबईत दरवर्षी पाणी का साचतं?

मुंबईत 4 मोठ्या नद्या आहेत आणि 117 नाले आहेत. यातल्या काही नाल्यांच्या शेजारी तुम्हीही राहात असाल. मुंबईच्या काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मुंबईतले रस्ते, इथल्या इमारती किंवा एकंदरितच संपुर्ण बांधकाम हे योग्य नियोजनबध्द किंवा पावसाच्या वाहत्या पाण्याचा विचार करून झालेलं नाही. मुंबई जिथे जिथे पाण्याच्या प्रवाहाचे मार्ग होते, तिथे भराव टाकून बांधकामं करण्यात आलं आणि पाण्याचा मार्ग आडवण्यात आला. मुंबईत जिथे जिथे नाले आहेत, त्या नाल्यांपासून 30 मीटर लांब अंतर ठेवून घरं बांधावीत, असाही बृन्मुंबई महानंगर पालिकेचा आदेश आहे, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली पाहायला मिळत नाही. कारण मुंबईतील अनेक नाल्यांना लागून उभारलेली झोपडपट्टी आपल्याला पाहायला मिळेल.

मुंबई वाचवण्यासाठीचा महत्वाचा मुद्दा समजला जातो तो म्हणजे मॅनग्रोव्हचा. मॅनग्रोव्ह म्हणजे समुद्र आणि जमीन या दोघांच्यामध्ये असलेलं खारफुटीचं जंगल. हे जंगल समुद्राच्या लाटांपासून होणारी जमिनीची झिज थांबवतं. समुद्राच्या किनारी अशी जंगलं असली की समुद्राच्या लाटांमुळे जमिनीला मार बसत नाही, सोबतच समुद्र आणि जमीन या दोन्हींमधला समतोल राखला जातो. मात्र गेल्या काही दशकांमध्ये ही जंगले तोडली जात आहेत आणि यावर बांधकामे केली जात आहेत. मुंबईतील अंतरराष्ट्रीय विमानतळ, हे देखील त्याचाच एक भाग आहे.

तुम्हाला रस्त्याच्या मधोमध, फुटपाथच्या कडेला काही लोखंडी गजांनी झाकलेली गटारे दिसतील. ती संकल्पना ब्रिटिशकालीन आहे. म्हणजे ब्रिटिश लोक जेव्हा भारतात होते, त्यावेळेस त्यांनी भुयारी गटारे बांधली आणि रस्त्यावरचं पाणी गटारांमध्ये जावं यासाठी काही ठिकाणी लोखंडी गज टाकून गटारांना छिद्र ठेवण्यात आली. या गटारांनी 2005 पर्यंत व्यवस्थित काम केलं. 2005 नंतर चितळे समितीने या प्रक्रियेत बदल करण्याचे सुचवले मात्र तसं अद्याप झालं नाही आणि म्हणून रस्त्यांवरच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बराच वेळ लागतो.

सध्या मुंबईत पावसाचं पाणी थेट जमिनीत मुरेल अशी खूप कमी ठिकाणं आहेत, त्यातच भुयारी मेट्रोचेही काम सुरू आहे. त्यामुळे जमिनीवर पडणारे पाणी थेट जमिनीत मुरण्यास मोठी अडचण येऊ शकते. चारी बाजूंनी बांधकाम असल्याने हे पाणी समुद्रास मिळण्यासही अनेक अडचणींना सामना करावा लागेल. याचाच अर्थ मुंबई तुंबलेली दरवर्षी पाहायला मिळेल. त्यामुळे नागरिकांनी सावधानी बाळगावी, हाच एक जिवाभावाचा सल्ला.

हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. अशा अनेक वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मीडियाला भेट द्या.

पावसाळ्यात घरात पाणी शिरतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहात असता, तसच एक वास्तव चित्र

राम मंदिराच्या वादाची सुरूवात आणि संपुर्ण घटनाक्रम

सांधूंच्या समाध्यांवर उभे राहिलेल्या मलबार हिलबद्दल ‘या’ गोष्टी वाचून तुम्हीही थक्क व्हाल…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments